राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना विषयी माहीती Rajashri Shahu Maharaj scholarship

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना विषयी माहीती Rajashri Shahu Maharaj scholarship

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती ही काय आहे?

राजर्षी शाहु महाराज ही एक जनकल्याण विभागाकडुन सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना आहे.

असे विदयार्थी जे अनुसुचित जाती तसेच नवबौदध घटकात येतात.गरजु अणि गुणवत्ताधारक आहेत पण त्यांची आर्थिक परिस्थिति हलाखीची आहे.

त्यांना परदेशातील नामांकीत विद्यापीठात प्रवेश मिळाल्यावर पदव्युत्तर तसेच पीएचडीचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.म्हणजेच परदेशात जाऊन शिक्षण घ्यायला ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

राजर्षी शाहु शिष्यवृत्ती योजनेच्या अटी अणि नियम काय आहेत?

● योजनेचा लाभार्थी महाराष्टाचा रहिवासी असायला हवा.

● सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या विदयार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त नसावे.

● पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी 35 वर्षे अणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्ष इतकी जास्तीत जास्त वयोमर्यादा असेल.

● जागतिक क्रमवारीत प्रथम 100 विद्यापीठांमध्ये लंडन स्कुल आँफ इकोनाँमिक मध्ये प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांना उत्पन्नाची मर्यादा लागु होणार नही.

● परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्ष इतकाच कालावधी असलेला एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहणार.

● विदयार्थी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या आँफिशिअल साईटवरील एम डी एम एस अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहे.

● परदेशातील शिक्षण संस्था जिथे आपण प्रवेश घेतो आहे ती जागतिक क्रमवारीत तीनशेच्या आत असावी.

See also  जागतिक पृथ्वी,वसुंधरा दिन कोटस शुभेच्छा अणि घोषवाक्ये -World Earth day quotes and slogan in Marathi

● याआधी जर विदयार्थ्याने शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत परदेशामध्ये पदव्युतर तसेच पदवीचा अभ्यासक्रम पुर्ण केला असेल तर असे विदयार्थी देखील पुन्हा ह्या योजनेंतर्गत पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विदयार्थ्यांना कोणकोणते लाभ प्राप्त होतील?

● विदयार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता दिला जाईल अमेरिका तसेच इतर देशांसाठी युएस डाँलर 15 हजार 400 तर युके करीता जीबी पौंड 9 हजार 900 इतका देण्यात येईल.

● विदयाथ्यास आकस्मिक खर्चाकरीता यु एस ए व इतर देशांसाठी यु एस डाँलर 1 हजार 500 तर युके साठी जी बी पौंड 1 हजार 100 शंभर इतका दिला जात असतो.

शिष्यवृत्ती अंतर्गत थोडक्यात प्राप्त होणारे महत्वाचे फायदे –

परदेशात ज्या विद्यापीठात आपण शिक्षण घेत आहे त्या विद्यापीठातील शिक्षणाची संपुर्ण फी शैक्षणिक सामग्री खर्च,तेथे राहण्यासाठी भरावा लागणारा व्हिसाचा खर्च, आरोग्य विमा देखील शिष्यवृत्ती धारकास दिला जात असतो.

परदेशात जाण्यासाठी केलेला विमान खर्च दिला जात असतो.

परदेशात राहण्याचा सर्व खर्च म्हणजेच वार्षिक निर्वाह निधी दिला जात असतो.

परदेशात शैक्षणिक कामाकरीता जा ये करण्यासाठी विदयार्थ्याला इकाँनाँमी क्लास मधील विमानाचा खर्च सुदधा दिला जात असतो.

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत?

● राजर्षी शाहु महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा भरलेला अर्ज

● आधार कार्ड

● रेशन कार्ड झेराँक्स

● बँकेतील खाते पासबुक

● नँशनँलिटी सर्टिफिकेट

● डोमाईसिल सर्टिफिकेट

● उपस्थिती प्रमाणपत्र

● मागील शेवटच्या वर्षाची शैक्षणिक गुणपत्रिका

● मागील वर्षाचा शाळा सोडल्याचा दाखला

● जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र

● परदेशात ज्या महाविद्यालयात विद्यापीठात आपण प्रवेश घेतला आहे त्यासंबंधी डिटेल माहीती असलेले कागदपत्र

● करारनामा हमीपत्र

● भारतातील दोन भारतीय नागरीकांनी दिलेले जामीनपत्र

● कुठल्याही दोन राजपत्रित अधिकारींचे शिफारसपत्र

● परदेशात शिक्षण घेत असताना लागणारया संपुर्ण खर्चाचे वर्षभराचे अंदाजपत्रक सादर करावे लिखते ज्यात परीक्षा फी शैक्षणिक खर्च,वहया पुस्तकांचा खर्च,तेथील राहण्या खाण्याचा प्रवासाचा जाण्या येण्याचा खर्च

See also  कृषि पर्यटन व्यवसाय माहिती - Agriculture tourism business information in Marathi

योजनेच्या इतर अटी –

● राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असलेल्या विदयाथ्याला मागील वर्षी कमीत कमी 60 टक्के असणे गरजेचे आहे.

● पात्र विदयार्थ्यास उत्पन्नाची अट लागू होत नही.

● राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्याने आपल्या नियमित अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असणे गरजेचे आहे.

● चालु शैक्षणिक वर्षात त्याची 75 टक्के हजेरी असायला हवी.

● विदयाथ्याने इतर कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला नसावा.

● ज्या बँकेतील खात्यात आपणास शिष्यवृत्ती हवी असेल त्या बँकेचे नाव बँकेचा खाते क्रमांक आय एफसी कोड वगैरे देणे गरजेचे आहे.

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कसा अणि कोठे करायचा?

जर आपणास देखील ह्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण पुढील प्रक्रिया करावी –

● यासाठी आपल्याला महाराष्ट शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन राजर्षी शाहु महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना हा अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा.

● अर्ज डाऊनलोड केला की त्यात विचारलेली सर्व माहीती व्यवस्थित भरायची आहे.

● मग भरलेल्या अर्जास आवश्यक ते डाँक्युमेंट जोडायचे अणि सदर अर्ज swfs.application.2122@gmail.com ह्या ईमेलवर पाठवायचा आहे.

● मग त्याच अर्जाची हार्ड काँपी काढुन ती पोस्टादवारे समाज कल्याण आयुक्तालय चर्च पथ पोलिस आयुक्त कार्यालय शेजारी 411001 पाठवायची आहे.

● आपला अर्ज ईमेलदवारे अणि पोस्टाने दिलेल्या पत्यावर निर्धारीत वेळेत पोहचणे गरजेचे आहे.