मोफत निर्धुर चुल वाटप योजना विषयी माहीती – Free nirdhur Chul Yojana information

मोफत निर्धुर चुल वाटप योजना विषयी माहीती

मित्रांनो केंद्र सरकार अणि विविध राज्ये आपापल्या राज्यातील वायु प्रदूषण कमी करायचा अथक प्रयत्न करत आहे.

इतर राज्ये जशी वायु प्रदुषण दुर करायला थांबवायला विविध उपाय करीत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य देखील आपल्या वतीने अनेक प्रयत्न करत आहे.

याच करीता महाराष्ट्र सरकार महाराष्टातील 38 जिल्हयात पर्यावरणास अनुकुल असे मोफत निर्धुर चुल वाटप करत आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच योजनेविषयी माहीती जाणुन घेणार आहे.

शासनाने मोफत निर्धुर चुल योजना राबविण्याचे का ठरवले आहे?ही योजना राबविण्याचा सरकारचा मुख्य हेतु काय आहे?

मित्रांनो दिवसेंदिवस गँस सिलेंडरच्या किंमती ह्या वाढतच आहे अणि वाढत्या किंमतीत गँस विकत घेणे सर्वसामान्य गरीब व्यक्तीस न परवडणारे आहे.

म्हणुन गँस सिलेंडर घेणे सर्वसामान्य व्यक्तीला शक्य होत नाहीये.त्यामुळे खुप जण चुलीवर स्वयंपाक करीत असतात.पण चुलीवर स्वयंपाक केल्याने नागरीकांचा गँसचा खर्च वाचतो पण पण याचा पर्यावरणावर वाईट परिणाम पडत असतो.

● वायु प्रदूषणात वाढ होत असते.कारण चुलीवर स्वयंपाक तयार करताना जो धुर चुल्यातुन निघतो तो हवेत पसरत असतो.

● याचसोबत वायु प्रदूषण तर ह्या धुराने होतेच शिवाय आपल्या आरोग्यास देखील हा धुर घातक ठरत असतो.कारण चुलीवर स्वयंपाक बनवताना चुलीतुन जो धूर निघतो तो चुल फुकताना महिलांच्या नाका तोंडात देखील जात असतो.

See also  द्रौपदी मुर्मू जीवन परिचय - बायोग्राफी Draupadi Murmu Information In Marathi

● अणि हा धुर आपल्या नाका तोंडात गेल्याने आपणास श्वसनाशी संबंधित आजार जगत असतात ज्यात दमा खोकला असे अनेक आजार समाविष्ट होतात.

● याचसोबत चुलीवर स्वयंपाक बनवायला भरपुर लाकडांची आवश्यकता असते ज्यामुळे आपण जंगलात जाऊन जंगलातील लाकडे तोडत असतो.अणि आपल्याला तर माहीतच आहे की जंगलतोडीचा पर्जन्य मानावर किती भयंकर परिणाम होत असतो.पावसाचे पाणी जमीनीत न मुरणे,जमिनीत ओलावा न राहिल्याने विहीरींचे पाणी आटणे अशा अनेक समस्या उदभवत असतात.ज्याचे परिणाम स्वरूप खेडयात राहत असलेल्या लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो.

या वरील सर्व प्रदुषणाच्या,आरोग्याच्या नैसर्गिक संकटाच्या अडचणींवर समस्येवर उपाययोजना म्हणुनच महाराष्ट्र सरकारने ही मोफत निर्धुर चुल वाटप योजना सुरू केली आहे.

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेअंतर्गत कोणाला चुल वाटप केले जाणार आहे?

मोफत निर्धुर चुल वाटप योजना ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व अनुसुचित जाती मधील पात्र परिवारास कुठलेही शुल्क न आकारता मोफत चुल वाटप केले जाणार आहे.

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेचे प्रमुख फायदे –

● ह्या योजनेअंतर्गत खेडया पाडयातील सर्व अनुसुचित जातीतील गरीब कुटुंबास मोफत अणि निर्धुर चुल वाटप केले जाणार आहे.

● ह्या योजनेमुळे राज्यात वायु प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

● चुल फुकताना चुलीवरचा धुर नाका तोंडात गेल्याने ग्रामीण भागातील महिलांना ज्या श्वसनविषयक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागायचा तो ह्या निर्धुर चुल वाटप योजनेमुळे कायमचा बंद होणार आहे.

● स्वयंपाक बनवताना चूलीवर लाकडे जाळण्यासाठी राज्यात जी भरमसाठ जंगलतोड केली जात होती अणि त्याचा पर्यावरणावर जो वाईट परिणाम होत होता तो ह्या योजनेमुळे संपुष्टात येणार आहे.

● खेडया पाडयातील महिला ह्या योजनेमुळे सशक्त अणि आत्मनिर्भर बनतील.त्यांच्या जीवनमानात देखील याने सुधारणा होऊ लागेल.

मोफत निर्धुर चुल वाटप योजना कोणाकडुन सुरू करण्यात केली आहे?

मोफत निर्धुर चुल वाटप ही योजना महाप्रीत कडुन सुरू करण्यात आलेली योजना आहे.

See also  जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस विषयी माहीती - World Day to Combat Desertification and Drought in Marathi

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेसाठी अर्ज करण्याची पदधत ?

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेसाठी अर्ज करण्याची पदधत आँनलाईन आहे.आँनलाईन आपण ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेत सहभागी होण्यासाठी महत्वाचे कागदपत्र

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेत सहभागी होण्यासाठी तसेच तिचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने कोणकोणते महत्वाचे कागदपत्र जोडायला हवेत?

● आधार कार्ड

● कास्ट सर्टिफिकेट

● रहिवासी दाखला

● शपथपत्र अँफिडेव्हीट

● स्वताचा एक ई मेल आयडी असावा

● मोबाइल नंबर देखील लागतो.

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेची प्रमुख वैशिष्टये कोणती आहेत?

● ही योजना खेडया पाडतातील ग्रामीण भागात राहणारया अनुसुचित जातीमधील महिलांसाठी विशेषकरून सुरू करण्यात आली आहे.

● महाराष्ट राज्यातील वायु प्रदूषणास काहीसा आळा ह्या योजनेमुळे बसणार आहे.

● चुलीवर स्वयंपाक बनवायला भरपुर लाकडे लागत असतात अणि लाकडासाठी जी जंगलतोड केली जाते तिला अणि जंगलतोडीमुळे उदभवणारया पर्यावरणीय संकटांना याने आळा बसण्यास हातभार लागणार आहे.

● ह्या योजनेसाठी आपणास आँनलाईन अर्ज करायचा आहे याने आपला अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्या येण्याचा पेट्रोल डिझेलचा खर्च वाचतो याने आपल्या वेळेची देखील बचत होते.सरकारी कार्यालयाच्या फेरया मारण्यात आपली उर्जा वाया जाणार नाही.

मोफत निर्धुर चुल वाटप योजना पात्रतेच्या अटी नियम कोणते?

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या पुढील काही अटी ठेवण्यात आल्या आहेत-

● मोफत निर्धुर चुल वाटप योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मुळ रहिवासी असायला हवे.

● अर्जदार हा अनुसुचित जातीचा असणे अनिवार्य आहे अन्यथा आपणास ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

● ह्या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीमधील परिवारालाच घेता येणार आहे.

● मोफत निर्धुर चुल वाटप योजनेसाठी अर्ज करणारया अर्जदाराकडे एल पी जीचे गँस कनेक्शन घेतलेले नसावे.

● जर एखाद्या अर्जदाराकडुन केंद्र सरकारने राज्य सरकाने आयोजित केलेल्या मोफत चुल वाटप योजनेचा लाभ घेण्यात आला असेल तर तो ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

See also  अंग्रेजी मे फुल,सब्जी और फलो के नाम और उनका हिंदी मे मतलब - Flower,Vegetables,Fruits Names In English With Hindi Meaning

● अर्ज करण्याची शेवटची तारीख संपण्याअगोदर ह्या योजनेसाठी आपण अर्ज करणे गरजेचे आहे.

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेत सहभागी होण्यासाठी आपला केलेला अर्ज कधी रदद केला जाईल?

● जेव्हा अर्जदाराने योजनेसाठी आवश्यक अशी विचारण्यात आलेली त्याची संपुर्ण आवश्यक असलेली पर्याप्त माहीती जर अर्जात नाही दिली तर अपुर्ण माहीती दिल्याने आपला अर्ज रदद केला जाऊ शकतो.

● तसेच अर्जदाराने अर्जात खोटी अणि चुकीची माहीती भरलेली असेल तर अशा परिस्थिति मध्ये देखील त्याचा अर्ज रदद केला जाऊ शकतो.

● अर्जदार अनुसुचित जातीमधील नसला तरी देखील त्याने मोफत निर्धुर चुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर अशा परिस्थिति मध्ये देखील आपला अर्ज नाकारला जाऊ शकतो.

● योजनेसाठी अर्ज करत असलेल्या अर्जदाराने जर आधीपासुन एल पी जी गँस कनेक्शन घेतलेले असेल तर त्याला ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.अणि त्याचा अर्ज रदद केला जाईल.

● एका कुटुंबासाठी दोन अर्ज करण्यात आले तर अशा वेळी देखील आपला अर्ज नाकारला जाऊ शकतो.

● किंवा मोफत निर्धुर चुल योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदाराने आधीच केंद्र किंवा राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेदवारे चुल प्राप्त केले असेल तर अशा परिस्थिति मध्ये देखील त्याचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

मोफत निर्धुर चुल वाटप योजनेत आपले नाव नोंदवायला अर्ज कसा अणि कोठे करायचा?

● अर्ज करण्यासाठी आपल्याला सरकारच्या mahapret.in ह्या योजनेच्या आँफिशिअल वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

● वेबसाइटला व्हिझिट केल्यावर आपणास एक होम पेज दिसुन येईल तिथे क्लीक करायचे.

● यानंतर अजुन एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल.ज्यात आपणास latest notice ह्या आँप्शनवर जावे लागेल

● Latest notice मध्ये आपणास clean coking cookstove distribution ह्या आँप्शनवर क्लीक करावे लागेल.

● यानंतर अजुन एक नवीन पेज आपल्यासमोर येईल ज्यात योजनेचे सर्व अटी नियम दिलेले असतील.

● मग आपल्यासमोर एक अर्ज येईल त्यात विचारलेली सर्व माहीती आपणास व्यवस्थित अचुकरीत्या पुर्ण भरायची आहे.

● सर्व माहीती व्यवस्थित भरुन झाल्यानंतर खाली दिलेल्या सबमीट बटणावर ओके करायचे आहे.