महिला बचत गट समृदधी कर्ज योजना विषयी माहीती – Mahila Bachat Gat Samrudhi Karj Yojana

Table of Contents

महिला बचत गट समृदधी कर्ज योजना विषयी माहीती – Mahila Bachat Gat Samrudhi Karj Yojana

महाराष्ट्र शासनाकडुन महाराष्ट राज्यातील स्त्रियांकरीता घर गृहिणींकरीता विविध योजना राबवल्या जात असतात.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजना ही सुदधा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अशीच एक योजना आहे.

आजच्या लेखात आपण ह्या महिला बचत गट समृदधी योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजना काय आहे?

महिला बचत गट समृदधी कर्ज ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे.

ह्या योजनेच्या माध्यमातुन ज्या महिला स्वताचा लघु उद्योग व्यवसाय प्रारंभ करू इच्छित आहे.त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अणि त्यांच्या लघु उद्योगास अधिक चालना प्राप्त व्हावी यासाठी कमी व्याज दराची आकारणी करून कमीत कमी अटी नियम लागु करून अशा महिलांना आपला लघुउद्योग सुरू करायला ह्या महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते.

जेणेकरून महिला वर्गास स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करता येईल.अणि त्यांना स्वताचा अणि आपल्या देशाचा अधिकाधिक विकास करता येईल.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेचा लाभ कोणत्या राज्यातील महिला घेऊ शकतात?

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांना घेता येणार आहे.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकणार आहे?

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेचा लाभ महिला बचत गटामधील सभासद असलेल्या महिला घेऊ शकणार आहे.

See also  जागतिक महासागर दिवस 20 घोषवाक्ये -World Ocean Day 20 Slogans In Marathi

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी किती कर्ज दिले जाणार आहे?

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना स्वताचा लघुउद्योग सुरु करायला पाच ते वीस लाख इतके कर्ज दिले जाणार आहे.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी दिल्या जाणारया कर्जावर किती व्याजदर आकारले जाणार आहे?

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी दिल्या जाणारया कर्जावर चार टक्के इतके व्याजदर आकारले जाणार आहे.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेचा मुख्य लाभ काय आहे?

महिला बचत गट समृदधी कर्ज योजना ह्या योजनेअंतर्गत महिलांना आपला स्वताचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदर आकारून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागाकडुन महिला बचत गट समृदधी कर्ज योजना का सुरू करण्यात केली आहे?

आज आपल्या महाराष्ट्र राज्यात खुप स्त्रिया अशा आहेत ज्या उच्चशिक्षित आहे,साक्षर आहे ज्यांना लिहिता वाचता येते.

अणि ह्या महिला रोजगार देखील शोधत असतात पण जसे अणि जितके शिक्षण त्यांनी केले आहे तसा रोजगार तसे वेतन असलेली नोकरी त्यांना उपलब्ध होत नाही.

अशावेळी ह्या शिक्षित महिला स्वताचा एखादा लघुउद्योग सुरू करायचा विचार करतात.पण आर्थिक परिस्थिति कमकुवत असल्याने लघुउद्योग सुरू करायला भांडवलासाठी देखील त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नसतात.ज्यामुळे त्यांना स्वताचा लघुउद्योग सुरू करता येत नसतो.

कारण बँकेकडून वित्तीय संस्था कडुन देखील अशा स्त्रियांना कर्ज दिले जात नाही.कारण बँकेला कर्जफेडीची गँरंटी हवी असते अणि महिलांकडे ही गँरंटी नसल्याने बँक त्यांना कर्ज देत नसते.

अणि स्वताचा लघुउद्योग सुरू करायचे आपले स्वप्र ह्या घर गृहिणींना पुर्ण करता येत नसते.महिलांच्या ह्याच समस्येस लक्षात घेऊन सामाजिक न्याय अणि विशेष साहाय्य विभागाकडुन महिला बचत गट समृदधी कर्ज योजना ही योजना सुरू केली आहे.

जेणेकरून स्त्रियांना,घरगृहिणींना स्वताचा रोजगार लघुउद्योग सुरू करायला आर्थिक मदत प्राप्त होईल.

See also  महाराष्ट्र दिन कोट्स मराठीत । Maharashtra Day Quotes In Marathi

महिला बचत गट समृदधी कर्ज योजना सुरु करण्याचा सरकारचा मुख्य हेतु काय आहे?

● महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटाच्या सभासद असलेल्या महिलांना स्वताचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे.महिला उद्योजकांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करणे

● ह्या योजनेच्या माध्यमातुन महिलांचा आर्थिक अणि सामाजिक विकास घडवून आणने.अणि त्यांना आर्थिक अणि सामाजिक दृष्टया मजबुत बनविणे.

● स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अधिकाधिक महिलांना प्रोत्साहित करणे तसेच ह्या योजनेअंतर्गत महिलांना सक्षम अणि आत्मनिर्भर बनविणे.महिलांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणने महिलांना स्वताचा हक्काचा रोजगार प्राप्त करून देणे हा हेतू ही योजना सुरू करण्याचा आहे.

● महिलांना स्वताच्या पायावर उभे करणे अणि लघुउद्योगाच्या माध्यमातुन राज्यामधील शिक्षित अणि तरूण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे.

● लघुउद्योगास अणि लघु उद्योग करणारयांना अधिकाधिक चालना देणे.

● शहरी अणि ग्रामीण दोघे ठिकाणच्या महिला ह्या योजनेचा लाभ उठवू शकतात.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेचे फायदे अणि मुख्य वैशिष्ट्ये-

● ही योजना खास महाराष्ट्र सरकारने बचत गटातील महिलांसाठी आरंभ केलेली योजना आहे.

● ज्यांना स्वताचा लघुउद्योग सुरू करायचा आहे अशा बचत गटातील महिला ह्या योजनेचा लाभ घेऊन उद्योगासाठी कर्ज घेऊन स्वताचा लघुउद्योग सुरू करू शकतात.

● ह्या योजनेमुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे.

● महिलांची सामाजिक अणि आर्थिक स्थिति उंचावणार आहे.त्यांच्या जीवनमानात बदल घडुन येणार आहे.

● योजनेसाठी अर्ज करायची पदधत देखील खुपच सहज आणि सोपी आहे अणि कागदपत्रे देखील महिलांना खुप मोजकेच लागणार आहेत.

● ह्या योजनेचा लाभ घेऊन स्वताचा उद्योग सुरू करून महिला स्वताचा आत्मविश्वास वाढवू शकतील इतर महिलांना लघु उद्योग सुरू करायला प्रेरित करू शकतील.

● ह्या योजनेअंतर्गत खुप कमी व्याजदरात 4% मध्ये महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.अणि हे कर्ज फेडायला महिलांना तीन वर्षाचा कालावधी दिला जाणार आहे.

● महिलांना स्वताचा उद्योग सुरू करायला कोणाच्या आधाराची गरज पडणार नाही.शिवाय महिलांचे आर्थिक उत्पन्न देखील वाढणार आहे.

● ह्या योजनेअंतर्गत आर्थिक परिस्थिति हलाखीची असलेल्या गरीब महिलांना आर्थिक साहाय्य प्रदान करून स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजना साठी अर्ज कशापदधतीने करायचा आहे?

महिला बचत गट समृदधी कर्ज योजना मध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी आँफलाईन पदधतीने अर्ज करायचा आहे.

See also  मुंबईत नवीन ॲपल स्टोअर ची १० वैशिष्ट्ये - Apple BKC first store in India.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजना मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी अणि नियम –

● ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्यातीलच मुळ रहिवासी असायला हवी. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना ह्या योजनेचा लाभ उठविता येणार नाही.

● ह्या योजनेतील दिले जाणारे 95 टक्के इतके कर्ज राष्टीय महामंडळ देते तर पाच टक्के कर्ज राज्य महामंडळ देते.पण समजा राज्य महामंडळाकडुन एखाद्या वेळेस कर्ज नाही मिळाले तर पाच टक्के रक्कम आपणास स्वता भरावी लागते.

● अर्जदार महिला बचत गटाची सदस्य असायला हवी.आपण बचत गट स्थापित करून तसेच त्याच्या सभासद होऊन किमान दोन वर्ष पुर्ण झालेली असावी.

● योजनेच्या माध्यमातुन अधिकाधिक वीस लाख लघु उद्योग सुरू करण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात दिले जातील.

● अर्जदार महिलेचे वय किमान 18 अणि कमाल 50 असायला हवे.अणि तिचे नाव दारिद्रय रेषेच्या खाली असायला हवे.

● योजनेसाठी अर्ज करत असलेल्या खेडयातील महिलेचे उत्पन्न हे 98 हजार पेक्षा अणि शहरी भागातील महिलेचे उत्पन्न दीड लाखाच्या खाली असावे त्यापेक्षा अधिक नसावे.

● अर्जदार महिलेला तिची सर्व बँक डिटेल बँक खाते क्रमांक आय एफसी कोड कुठल्या बँकेत खाते आहे ही सर्व माहीती द्यावा लागणार आहे.

● अर्जदार महिलेचे सिव्हील रेकाँर्ड चांगले असावे म्हणजे तिने याधी कुठल्याही बँकेचे कर्ज बुडवलेले नसावे.

● महिलेने केंद्र अणि राज्य शासनाकडुन सुरू केलेल्या कुठल्याही स्वयंरोजगार योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल तर त्या ह्या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही.

● योजनेसाठी अर्ज करताना योग्य अणि अचुक माहीती भरावी कुठलीही खोटी बनावट चुकीची माहीती भरणे कायद्याने गुन्हा ठरेल.सदर महिलेकडुन अशी फसवणुक करून योजनेचा लाभ घेतला गेल्यास लाभाची रक्कम जेवढी असेल तितका दंड वसुल केला जाऊ शकतो.

महिला बचत गट समृदधी कर्ज योजना मध्ये सहभागी होण्यासाठी महत्वाची कागदपत्रे

● अर्जदाराचे आधार कार्ड

● महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला

● रेशन कार्ड झेराँक्स

● इन्कम सर्टिफिकेट

● बर्थ सर्टिफिकेट

● पासपोर्ट साईज दोन फोटो

● व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचे अंदाजपत्रक

● मोबाइल नंबर

● स्वताचा एक ईमेल आयडी देखील असायला हवा

महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेसाठी अर्ज कसा अणि कोठे करायचा?

● सर्वप्रथम महिलेने जिल्हा कार्यालय तसेच सामाजिक न्याय,विशेष साहाय्य विभागात जावे अणि महिला बचत गट समृदधी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा.

● अर्ज व्यवस्थित भरून घ्यायचा त्यात खाडाखोड करू नये चुकीची माहीती देखील भरू नये.

● अर्ज भरून झाल्यानंतर त्याला आवश्यक ते डाँक्युमेंट जोडायचे अणि अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.

● अर्ज जमा केल्यावर आपणास पोच पावती म्हणुन एक रिसिप्ट दिली जात असते.

योजनेसाठी केलेला आपला अर्ज रदद केला जाऊ शकतो का?

होय आपला योजनेसाठी केलेला अर्ज रदद देखील केला जाऊ शकतो.

पण फक्त तेव्हाच जेव्हा अर्ज अपुर्ण भरलेला असेल,त्यात चुकीची तसेच खोटी माहीती भरलेली असेल,आपली बँक डिटेल व्यवस्थित भरलेली नसेल,एकाच योजनेसाठी आपण दोनदा अर्ज केला असेल किंवा याआधी केंद्र राज्य शासनाने आरंभ केलेल्या ह्या योजनेचा आपण याआधी लाभ घेतलेला असेल.

1 thought on “महिला बचत गट समृदधी कर्ज योजना विषयी माहीती – Mahila Bachat Gat Samrudhi Karj Yojana”

Leave a Comment