भारतातील 20 बेस्ट युटयुबर्स – List of India’s Best YouTubers Marathi information

भारतातील 20 बेस्ट युटयुबर्स  – List of India’s Best YouTubers Marathi information

सोशल मिडिया हे आज एक असे फ्लँटफाँर्म आहे.जिथे आपण सर्वजण आपला जास्तीत जास्त वेळ व्यतित करत असतो.

आता ते दिवस अजिबात राहिले नाहीये जिथे आपण आपला रिकामा वेळ शारीरीक खेळ खेळण्यात घालवायचो.एकमेकांना भेटुन गप्पा मारण्यात व्यतित करायचो.

आज जिथे तिथे प्रत्येकाला सोशल मिडियाचे वेड लागले असल्यामुळे कित्येक जण आपला रिकामा वेळ युटयुबवर माहीतीपुर्ण व्हिडिओ सर्च करण्यात तसेच बघण्यात घालवत असतात.

आज आपण आपल्या पुर्ण दिवसभरातील 24 तासांपैकी 8 ते 9 तास गुगल तसेच युटयुबसारख्या माध्यमांवरच माहीतीपुर्ण लेख वाचण्यात तसेच माहीतीपुर्ण व्हिडिओ बघण्यात व्यतित करतो.

यावरून आपल्या लक्षात येते की आज जगभरात युटयुबची किती मोठी क्रेझ लागलेली आहे.आणि आज युटयुब हे एक असे प्लँटफाँर्म आहे जिथुन भारतातील कित्येक दिग्दज युटयुबर्स महिन्याला लाखो तसेच करोडोंची कमाई करता आहे.

पण आपल्याला अशा प्रेरणादायी व्यक्तीमत्वांविषयी कोणतीही माहीती नसते.ज्यांच्यापासुन प्रेरित होऊन आपण देखील असे काही मोठे कार्य आयुष्यात करू शकतो.तसेच त्यांचे व्हिडिओ बघून नवनवीन गोष्टी देखील शिकु शकतो.

म्हणुन आजच्या लेखात आपण भारतातील 20 बेस्ट युटयुबर्सवषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.ज्यांना आपण युटयुबवरून माहीती प्राप्त करण्यासाठी फाँलो करू शकतो आणि त्यांच्यापासुन प्रेरित देखील होऊ शकतो.

2021 मधील भारतातील 20 बेस्ट युटयुबर्स कोणकोणते आहेत?

2021 मधील भारतातील 20 बेस्ट युटयुबर्समध्ये विविध नीशनुसार,विविध टाँपिकवर व्हिडिओ तयार करत असलेल्या अनेक युटयुबर्सची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत जी पुढीलप्रमाणे आहेत :

भारतातील टाँप 5 काँमेडी युटयुबर्स :

1) कँरी मिनाटी :

2) भुवन बाम :

3) अमित भडाना :

4) आशिष चंचलानी :

5)हर्ष बेनिवाल :

 

भारतातील टाँप 5 फँशन युटयुबर्स :

1) सेजल कुमार :

2) कोमल पांडे :

3) श्रुती अरूण आनंद :

4) कोमल नारंग :

5) श्वेता विजय :

 

भारतातील टाँप 5 टेक्नाँलाजी युटयुबर्स :

1) टेन्निकल गुरूजी :

2) ट्रँकिन टेक :

3) फोन रडार :

4) शर्मा जी टेक्निकल :

5) टेक बर्नर :

भारतातील टाँप 5 फुड युटयुबर्स :

1) संजीव कपुर खजाना :

2) निशा मधुलिका :

3) कुकिंग शुकिंग :

4) शेफ रणवीर :

5) कबिता किचन्स :

* भारतातील टाँप 5 काँमेडी युटयुबर्स :

1) कँरी मिनाटी : हे एक काँमेडी युटयुब चँनल आहे.जिथे काँमेडी व्हिडिओ अपलोड केले जात असतात.ह्या चँनलचे 29.5 दशलक्ष इतके मेंबर्स आहेत.

See also  Etiquette - शिष्टाचार म्हणजे काय? ईटीक्वेट्स प्रकार ,गरज, महत्व व उदाहरण - Etiquette information in Marathi

आणि त्यांनी आत्तापर्यत आपल्या युटयुब चँनलवर 150 व्हिडिओज अपलोड केले आहेत.

आपण ह्या युटयुबरसोबत आपल्या हास्याची सफर करू शकतो आणि आपल्या रागीट चेहरयावर देखील हास्य आणु शकतो.

2) भुवन बाम(बीबी के वाईन्स) :

बीबी के वाईन्स ह्या युटयुब चँनल्सचे 20.4 दशलक्ष एवढे मेंबर्स आहेत.हे चँनल 2015 दरम्यान सुरू झाले होते आणि तेव्हापासुन येथे 180 व्हिडिओ अपलोड केले गेले आहेत.

3) अमित भडाना : मध्यमवर्गीय गटातील तसेच ग्रामीण भागातील लोकांमध्ये याचे नाव खुप प्रसिदध आहे.हा आपल्या युटयुब चँनलवरून आपल्या वास्तविक जीवणातील घटना,प्रसंगांना हास्यात्मक पदधतीने सादर करण्याचे काम ह्या चँनलवर केले जाते.याच्या चँनलचे 22.9 मिलियन एवढे मेंबर्स आहेत आणि ह्या चँनलवर आत्तापर्यत 90 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहे.

4) आशिष चंचलानी :

ह्या चँनलवर 24.1 मिलियन एवढे सबस्क्राईबर आहेत.आणि येथे आतापर्यत 150 व्हिडिओ टाकले गेले आहेत.ह्या चँनलला सबस्क्राईब करून आपल्याला हास्याच्या जत्रेत सहभागी होता येते.

5) हर्ष बेनिवाल : हर्ष बेनिवाल याचे 12.6 मिलियन सबस्क्राईबर आहेत.ह्या चँनलवर आत्तापर्यत 150 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहे.ह्या चँनलवरील व्हिडिओत आपल्याला काँमिक टाईमिंग आणि कँरेक्टर पोर्टरेयल केलेले पाहायला मिळते.

*भारतातील टाँप 5 फँशन युटयुबर्स :

1)सेजल कुमार :सेजल कुमार हिने 2014 मध्ये तिचे युटयुब चँनल सुरू केले होते.सध्या सेजल कुमार हिच्या युटयुब चँनलवर 1.36 दशलक्ष एवढे मेंबर्स आहेत.आणि आत्तापर्यत ह्या चँनलवर 600 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

सेजल कुमार ही फँशन आणि लाईफस्टाईल वर व्हिडिओ बनवत असते.

 

2) कोमल पांडे : कोमल पांडे हिने 2017 मध्ये तिचे युटयुब चँनल सुरू केले होते.कोमल पांडे हिच्या युटयुब चँनलवर 980 हजार पेक्षा अधिक मेंबर्स आहेत.आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे युटयुब चँनल सुरू कोमल पांडे हिला आत्तापर्यत तीन वर्षे झाली आहेत.आणि तिच्या चँनलवर आत्तापर्यत 110 व्हिडिओ अपलोड केले गेले आहे.

 

3) श्रुती अरूण आनंद :

श्रुती अरूण आनंद हिने 2010 मध्ये युटयुब चँनल सुरू केले होते.आज तिच्या युटयुब चँनलमधील करीअरला सुरूवात होऊन 12 वर्षे झाली आहेत.आणि श्रुती अरुण आनंद हिच्या युटयुब चँनलवर आत्तापर्यत 8.60 दशलक्ष इतके मेंबर्स आहेत.आणि श्रुतीने आत्तापर्यत 400 व्हिडिओ अपलोड केले आहेत.

See also  जागतिक कामगार दिन का साजरा केला जातो? जागतिक कामगार दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? - International Labour Day

4) कोमल नारंग :

कोमल नारंग हिचे चँनल कोमल व्ही लाँग म्हणुन ओळखले जाते.तिने 2015 मध्ये तिचे युटयुब चँनल सुरू केले होते.तेव्हापासुन ते आत्तापर्यत तिने आपल्या चँनलवर 1000 व्हिडिओ अपलोड केले आहेत.तिच्या चँनलवर 4000 पेक्षा अधिक मेंबर्स आहेत.

5) श्वेता विजय :

श्वेता विजयला भारतातील प्रसिदध युटयुबर्सपैकी एक मानले जाते.श्वेता विजय आपल्या चँनलवरून आपणास फँशन ब्युटी तसेच स्वच्छतेवर टिप्स देण्याचे काम करते.

*भारतातील टाँप 5 टेक्नाँलाजी युटयुबर्स :

1) टेक्निकल गुरूजी : टेक्निकल गुरूजी ह्या चँनलवर एकुण 21 दशलक्ष मेंबर्स आहेत.ह्या चँनलवर आत्तापर्यत 4 हजार  पेक्षा अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत.

ह्या चँनलचे होस्ट गौरव चौधरी आहेत.जो दुबईत वास्तव्यास आहे.आपल्या चँनलवरून न्यु गँझेट तसेच स्मार्टफोनविषयी रिव्युव्ह करून माहीती द्यायचे काम गौरव करतो.2015 मध्ये त्याने युटयुब चँनलची सुरूवात केली होती.

2) ट्रँकिन टेक :

ट्रँकिन ट्रेक सुदधा एक प्रसिदध टेक्नीकल चँनल आहे जिथे 7.85 दशलक्ष एवढे मेंबर्स झालेले आपणास दिसुन येतात.ह्या चँनलवर आत्तपर्यत 3 हजार व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

भविष्यात आपण कोणता मोबाईलची निवड करायची हे ठरविण्यासाठी आपण ह्या चँनलला फाँलो करायला हवे.

3) फोन रडार :

फोन रडार ह्या चँनलवर एकुण 921 के पेक्षा अधिक मेंबर्स समाविष्ट झाले आहेत.ह्या चँनलवर आत्तापर्यत 3060 व्हिडिओ अपलोड केले गेले आहे.

ह्या चँनलच्या यशामध्ये अमित भवानी यांचा खुप मोठा हात आहे.अमित भवानी यांनी 2011 पासुन व्हिडिओ बनवण्यास सुरूवात केली होती.

4) शर्माजी टेक्निकल :

प्रवल शर्मा यांनी 2008 मध्ये युटयुब चँनल सुरू केले असले तरी 2015 पासुन खर्या अर्थाने त्यांनी आपल्या चँनलवर टेक्निकल व्हिडिओ टाकण्यास सुरूवात केली होती.

ह्या चँनलसच्या मेंबरची संख्या 1,68 दशलक्ष इतकी आहे.आणि ह्या चँनलवर आत्तापर्यत 4 हजार पेक्षा अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

5) टेक बर्नर :

टेक बर्नर ह्या चँनलची सुरूवात 2014 मध्ये करण्यात आली होती.ह्या चँनलवर आत्तपर्यत 6.35 दशलक्ष एवढे मेंबर्स समाविष्ट झाले आहेत.यात आत्तापर्यत 800 पेक्षा अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहे.

See also  टायटॅनिक जहाज का बुडाले याचे संशोधनातुन समोर आलेली काही महत्वाची रहस्ये - Why Did the Titanic Sink An Analysis

ज्यांना पब्जी गेमची आवड आहे त्यांना पब्जी गेम विषयी भरपुर माहीती ह्या चँनलवर मिळेल.

 

*भारतातील टाँप 5 फुड युटयुबर्स :

1) संजीव कपुर खजाना :

आपल्या सर्वाना माहीत असलेले लोकप्रिय नाव म्हणजे संजीव कपुर.झी टिव्हीवर संजीव कपुर यांचा खाना खजाना नावाचा कार्यक्रम देखील खुप प्रसिदध आहे.

संजीव कपुर हे सहज सोप्या आणि मनोरंजक नवनवीन डिशेस तयार करण्यासाठी विशेषकरून ओळखले जातात.संजीव कपुर ह्यांच्या चँनलवर आत्तापर्यत 7.46 दशलक्ष एवढे मेंबर्स समाविष्ट झाले आहेत.

ह्या चँनलवर आत्तापर्यत 10 हजार पेक्षा अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहे.

2) निशा मधुलिका :

खरे सांगावयास गेले तर निशा मधुलिका ह्यांच्या चँनलवर संजीव कपुर यांच्या चँनलवर असलेल्या मेंबर्सपेक्षा अधिक मेंबर्स सहभागी आहेत.

निशा मधुलिका यांच्या चँनलवर 11.2 दशलक्ष इतके मेंबर्स समाविष्ट असलेले आपणास दिसुन येतात.ह्या चँनलवर आपल्याला कुकिंगविषयी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात.

ह्या चँनलवर कुकिंगचे 2 हजार पेक्षा अधिक व्हिडिओ असलेले दिसुन येतात.हे चँनल शाकाहारी प्रेमींसाठी खास बनवण्यात आलेले आहे.निशा मधुलिका यांनी 2009 मध्ये आपले युटयुब चँनल सुरू केले होते.

3) कुकिंग शुकिंग :

कुकिंग शुकिंग हे चँनलचे जे नाव गंमतीदार आहे आणि मनोरंजक आहे तितकेच ह्या चँनलचे ओनर यमन अग्रवाल देखील आहेत.

यमन अग्रवाल हे नवनवीन कुकिंगच्या डिशेस शोधुन त्याला नवीन पदधतीने बनवण्याचे काम करतात.

ह्या चँनलवर आत्तापर्यत 10.9 दशलक्ष इतके मेंबर्स आहेत.आणि ह्या चँनलची सुरूवात 2012 मध्ये करण्यात आली होती.

4) शेफ रणवीर :

भारतात असलेल्या शेफमध्ये सगळयात तरुण शेफ म्हणून हा ओळखला जातो.शेफ रणवीर यांच्या चँनलवर 3.02 पेक्षा अधिक मेंबर्स असलेले आपणास दिसुन येते.

शेफ रणवीर ह्यांनी आत्तापर्यत कुकिंगवर 600 पेक्षा अधिक व्हिडिओ अपलोड केलेले आपणास दिसुन येते.

5) कविता किचन्स :

कविता शर्मा ह्या चँनलच्या ओनर आहेत.कविता शर्मा ह्या एक हाऊसवाईफ आहेत ज्यांना कुकिंग करायला खुप आवडते.

आपल्या कुकिंगची आवड जपण्यासाठी आणि त्याचा इतरांना लाभ घेता यावा यासाठी कविता शर्मा ह्यांनी ह्या चँनलची सुरूवात केली होती.

ह्या चँनलचे 10 दशलक्षपेक्षा अधिक सब्सक्राईबर असलेले आपणास दिसुन येतात.कविता शर्मा ह्या आपल्या चँनलवर इंडियन डिशेस वर व्हिडिओ अपलोड करत असतात.

1 thought on “भारतातील 20 बेस्ट युटयुबर्स – List of India’s Best YouTubers Marathi information”

Comments are closed.