जागतिक कामगार दिन का साजरा केला जातो? जागतिक कामगार दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? – International Labour Day

जागतिक कामगार दिन चे महत्त्व तसेच इतिहास – International Labour Day

दरवर्षी १ मे ह्या तारखेला जागतिक कामगार दिवस साजरा केला जात असतो.

जगभरातील कामगारांच्या चळवळीचा गौरव करण्यासाठी १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येत असतो.

जागतिक कामगार दिन
International Labour Day

दरवर्षी ८० हुन अधिक देशांमध्ये १ मे हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा रजेचा दिवस म्हणून पाळला जात आहे.

जागतिक कामगार दिवस हा शिकागो मध्ये ४ मे१८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या आठवणीमध्ये जगभरातील साम्यवादी, समाजवादी,अराजकतावादी,पक्षांकडुन साजरा केला जातो.

आज १ मे रोजी जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केला जाणारया दिवसाची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर एका कामगार चळवळीतुन झाली होती.

ह्या चळवळीत कामाचा दिवस आठ तासाचा करण्यात यावा अशी मागणी मजदुर कामगार वर्गाकडून करण्यात आली होती.

महाराष्ट्र दिन कोट्स मराठीत । Maharashtra Day Quotes In Marathi

अणि ह्या मागणीला मंजुरी देखील प्राप्त झाली होती.हीच ह्या दिवसाच्या संदर्भात करण्यात आलेली महत्वाची मागणी होती.हया आंदोलनाच्या आधी कामगारांना दिवसाला पंधरा पेक्षा अधिक तास काम करावे लागत होते.

या संदर्भात प्रथम मागणी ही २१ एप्रिल १८५६ रोजी आॅस्ट्रेलिया देशातील कामगारांकडून करण्यात आली होती तेव्हापासून हा दिवस जागतिक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर करण्यात आले.

यानंतर अमेरिका आणि कॅनडा ह्या देशातील कामगार संघटनांनी देखील कामगारांच्या हितासाठी मोर्चे काढण्यास प्रारंभ केला.अशाच एका कामगारांच्या हितासाठी काढलेल्या शिकागो येथे सहा आंदोलकाचा बळी गेला.

ज्या विरूद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी कामगारांकडून पोलिसांवर बाॅम्ब हल्ला देखील करण्यात आला होता.ज्यात तब्बल आठ ते नऊ पोलिसांचा मृत्यू झाला अणि पन्नास पोलिस गंभीर जखमी झाले होते.

यानंतर आठ आंदोलनकर्त्यांना फासावर चढवले गेले.महत्वाची बाब म्हणजे ज्या आंदोलकांना फाशीची शिक्षा सुनावली गेली त्यांनी हा बाॅम्ब हल्ला केला नव्हता.

ह्या रक्ताने माखलेल्या इतिहासामुळे ह्या आंदोलनाला तीव्र स्वरुप प्राप्त होत गेले. १९९० मध्ये कामगारांच्या ह्या चळवळीस यश प्राप्त झाले.

International Labour Day
International Labour Day

शिकागो मध्ये घडलेल्या घटनेच्या आठवणीमध्ये रेमंड लेविन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलन करण्याची मागणी केली.ही मागणी दुसरया आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदे दरम्यान करण्यात आली होती.

ह्याच परिषदेत ठरवण्यात आले की १ मे १८९० हा दिवस जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा केला जावा.यानंतर १८९१ मधील परिषदेत ह्या कार्यक्रमास औपचारिक रीत्या मान्यता देखील प्राप्त झाली.

तेव्हापासून दरवर्षी १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आहे.

जागतिक कामगार दिवस हा कामगारांच्या हितासाठी केलेल्या जागतिक पातळीवरील आंदोलनाचे प्रतीक मानले जाते.

कामगारांकडून करण्यात आलेल्या ह्या जागतिक कामगार चळवळीत कामगारांचे कामाचे तास कमी करण्यात यावे, कामाच्या जागी त्यांना योग्य वागणूक दिली जावी,कामाच्या मोबदल्यात त्यांना योग्य तो मोबदला दिला जावा कामगारांना पगारी सुट्टी देण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या होत्या.

शिकागो येथील आंदोलनानंतर ह्या सर्व कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या.यानंतर कामगारांना पंधरा ऐवजी आठ तास कामाचे करण्यात आले, कामाच्या ठिकाणी योग्य वागणुक मोबदला मिळु लागला एवढेच नव्हे तर पगारी रजा देखील देण्यात येऊ लागली.

भारतात १ मे रोजी कामगारांची सार्वजनिक सुट्टी असते.दरवर्षी जागतिक कामगार दिवसाला एक खास थीम ठेवून हा दिवस साजरा केला जातो असतो.