१ मे रोजी गुजरात स्थापणा दिवस का साजरा केला जातो?गुजरात स्थापणा दिवसाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? – Happy Gujrat Day

१ मे रोजी गुजरात स्थापणा दिवस का साजरा केला जातो?गुजरात स्थापणा दिवसाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? Gujrat Day

Gujrat Day
Gujrat Day

गुजरात हे पश्चिम भारतात स्थित असलेले आपल्या भारत देशातील एक अत्यंत महत्वाचे राज्य आहे.

गुजरात ह्या राज्याची स्थापना १मे १९६० रोजी करण्यात आली होती.तेव्हापासुन दरवर्षी १ मे रोजी हा गुजरात स्थापणा दिवस साजरा केला जात आहे.

गुजरात स्थापणा दिनाला गुजरात दिवस तसेच गुजरात डे असे देखील संबोधिले जाते.भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी गुजरात हा मुंबईचा महत्वाचा भाग होता.

बाॅम्बे म्हणजे मुंबई हे एकमेव असे प्रांत होते जिथे मराठी भाषिक अणि गुजराती भाषिक लोक विपुल प्रमाणात होते.

पण कालांतराने येथील मराठी भाषिक लोकांसोबत गुजराती भाषिक लोकांनी देखील मराठी भाषेप्रमाणे गुजराती भाषेतील लोकांचे देखील एक स्वतंत्र राज्य निर्माण करावे अशी मागणी करण्यास सुरुवात केली.

यासाठी मराठी भाषिकांनी गुजराती भाषिकांकडुन अनेक आंदोलने करण्यात आली होती.खुप संघर्षानंतर संयुक्त समितीची आयोजन करण्यात आले होते.

यानंतर मराठी भाषिक लोकांसोबत गुजराती भाषिक लोकांचे देखील एक स्वतंत्र राज्य बनविण्यात आले अणि १ मे १९६० रोजी गुजरात राज्याला एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित देखील करण्यात आले होते.

जसा महाराष्ट्र दिन महाराष्ट्र भाषिक लोकांसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे तसाच हा गुजरात स्थापणा दिवस गुजरात मधील लोकांचा अभिमानाचा दिवस आहे कारण ह्या दिवशी मराठी भाषिक लोकांसाठी स्वतंत्र महाराष्ट राज्याची निर्मिती तर झालीच शिवाय गुजराती भाषिक लोकांसाठी देखील स्वतंत्र गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली होती.

ह्या दिवशी त्या सर्व शुरवीरांची अणि त्यांच्या स्वतंत्र गुजरात राज्याच्या निर्मितीसाठी दिलेल्या बलिदानाची आठवण केली जाते.

१ मे रोजी महाराष्ट्र प्रमाणे गुजरात मध्ये देखील सुट्टीचा दिवस पाळला जातो.हया दिवशी गुजरात मध्ये देखील शाळा महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.विविध प्रकारच्या क्रिडा तसेच परेडचे आयोजन केले जाते.

See also  80 Daily Use of English Sentences in Conversations with family and friends Neighbors

गुजराती संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजित केले जातात जेणेकरून येथील लोकांना तरूणाईला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडुन येईल.आपल्या गुजराती संस्कृती विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेता येईल.

गुजरात मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते अणि विजेत्यांना बक्षिसे देखील वितरीत केले जाते.

गुजरात मध्ये वास्तव्यास असलेल्या गुजराती भाषिक लोकांसाठी हा दिवस खुप खास दिवस असतो.हया दिवशी गुजरात राज्याच्या विकासासाठी याला अधिक उत्तम बनविण्याचा संदेश दिला जातो.