गुजरात राज्याविषयी महत्त्वाची माहिती- १५ रोचक तथ्ये – Gujarat state information in Marathi

गुजरात राज्याविषयी महत्त्वाची माहिती- १५ रोचक तथ्ये – Gujarat state information in Marathi

आज १ मे गुजरात राज्याच्या स्थापनेचा दिवस आहे.१ मे १९६० मध्ये गुजरात राज्याला एक स्वतंत्र राज्य म्हणुन घोषित करण्यात आले होते.

तेव्हापासून १ मे हा दिवस गुजरात राज्य स्थापणा दिवस म्हणून साजरा केला जातो.

आजच्या लेखात आपण गुजरात राज्याविषयी काही रोचक तथ्ये जाणुन घेणार आहोत.

भारतातील सर्वात जास्त हवाईअडडे विमानतळ ह्या गुजरात राज्यामध्येच आहे.गुजरात मध्ये एकुण १९ विमानतळ आहेत.

जगातील ८० टक्के हिरे गुजरात राज्यामध्येच शुद्ध केले जातात.

भारत देशात सर्वाधिक साखरेचा वापर हा गुजरात राज्यामध्येच केला जातो.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो तो गुजरात ह्या राज्यामध्येच आहे.ज्याचे नाव स्टॅच्यु आॅफ युनिटी असे आहे.

भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात ह्या राज्यामध्येच आहे.

गुजरातची राजधानी आधी अहमदाबाद होती यानंतर गांधीनगरला गुजरातची राजधानी बनविण्यात आले होते.

यूएस ए मधील जवळजवळ पन्नास टक्के हाॅटेल हे गुजराती लोकांचे आहे.तसेच येथील पाच पैकी एक भारतीय हा गुजराती आहे.

गुजरात हे मुगल काळापुर्वी गुजरात तसेच गुजर भुमी म्हणून ओळखले जायचे.

जगातील सगळ्यात पहिला शंभर टक्के शुद्ध सबवे तसेच डाॅमिनोचे आऊटलेट सगळ्यात पहिले गुजरात मध्येच खोलण्यात आले होते.

भारत देशातील सर्वात जास्त बंदर गुजरात ह्या राज्यामध्येच आहे.

गुजराती भाषिक लोकांना त्यांच्या उत्तम व्यवसाय कौशल्यासाठी विशेषकरून ओळखले जाते.

गुजरातमधील गांधीनगर शहर हे आशियातील सर्वात हरित शहर मानले जाते.

गुजरात राज्य दुध उत्पादनाच्या बाबतीत देखील अव्वल क्रमांकावर आहे.

गुजरात मधील नवरात्री मध्ये खेळला जाणारा गरबा दांडिया संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.

आशियाई सिंह हे फक्त गुजरात राज्यात गीर अभयारण्य येथे आढळुन येतात.

See also  गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी!१४ जुन २०२३ पासुन शेअर बाजारात येणार हे तीन महत्वाचे आयपीओ. - Three IPO offers this week