मिताली राजने – महिला क्रिकेटपटु ने तोडले सचिन तेंडुलकरचे रेकाँर्ड – Mitali Raj cricket player

मिताली राजन माहिती – Mitali Raj cricket player

भारतीय क्रिकेट जगतातील दैवत म्हणुन ओळखल्या जात असलेल्या सचिन तेंडुलकरला आपले जे रेकाँर्ड बनवण्यासाठी २२ वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला होता.

तेच रेकार्ड भारतीय महिला क्रिकेटपटटु मिताली राज हिने १२ फेब्रुवारी खेळण्यात आलेल्या न्यूझीलंँड विरूदधच्या वन डे मँचमध्ये गाठण्यात यश प्राप्त केले आहे.

आणि हे सर्व तेव्हा घडुन आले जेव्हा आपण सर्व जण आयपीएल मँचमधील खेळाडुंची लिलाव यादी बघण्यात मग्न झालेलो होतो.

मिताली राज कोण आहे?

मिताली राज ही भारतीय क्रिकेट संघातील महिला क्रिकेटपटटु तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार देखील आहे.पदार्पण करत असलेल्या सामन्यातच शतक लगावने,सर्वाधिक रण करणे असे अनेक विक्रम मिताली राजने केले आहेत.

णि आता ती पृथ्वीवरील पहिली अशी व्यक्ती बनली आहे जिची एकदिवसीय कारकीर्द 22 वर्षे आणि 100 दिवसांपेक्षा अधिक जास्त आहे.

याआधी हा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता.

न्युझीलंड विरूदधच्या खेळण्यात आलेल्या १२ फेब्रुवारी रोजीच्या सामन्यात तिने तिचे २२ वर्ष आणि २३१ दिवसांचे वनडे करिअर देखील पुर्ण केले आहे.आणि सचिन तेंडुलकरचे रेकाँर्ड देखील तोडण्यात यश प्राप्त केले आहे.

याचसोबत वनडे क्रिकेटमधील सगळयात longest carrier करण्याचा विश्वविक्रम देखील आता मितालीच्या नावावर नोंदला जाणार आहे.

● मिताली राज -२२ वर्षे २३१ दिवस(२२१ सामने)

● सचिन तेंडुलकर- २२ वर्षे ९२ दिवस (४६३ सामने)

● सनथ जयसुर्या -२१ वर्ष आणि १८४ दिवस(४४५,सामने)

● जावेद मियाद-२० वर्ष आणि २७३ दिवस (एकुण २३३ सामने)

See also  MSF – नवीन प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी सूचना- एम एस एफ भरती नवीन अपडेट - MSF bharti 2022 new update

न्युझीलंडविरूदधच्या सामन्यात मिताली राजने नोंदवलेले इतर विश्वविक्रम –

सचिन तेंडुलकरचे रेकाँर्ड तोडण्यासोबत मिताली राज हिने महिला वन डे सामन्यात कर्णधार म्हणुन अधिक धावा करण्याचा विक्रम देखील नोंदवला आहे.

मिताली राजने 81 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 66 धावा करत संघाला 270/6 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मिताली राज आता वनडे क्रिकेटमध्ये ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारी जगातील पहिली कर्णधार देखील बनली आहे.

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

Mitali Raj cricket player - महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

करणारया महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

मिताली राज – 5001

 बेलिंडा क्लार्क – 4150

चार्लोट एडवर्ड्स – 3523

सुझी बेट्स – 3214

मेग लॅनिंग – 3016