जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस विषयी माहीती – World Day to Combat Desertification and Drought in Marathi

Table of Contents

जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस – World Day to Combat Desertification and Drought in Marathi

वाळवंट कशाला म्हणतात?

जेव्हा जमिनीवरील एखादा भुभाग नेहमी अतिकोरडा राहतो,तिथे पाऊस पडत नाही तिथे वनस्पती आणि अन्य प्राणी जीव फार कमी असतात.अशा भुभागास वाळवंट असे म्हटले जात असते.

दुष्काळ म्हणजे काय?

दुष्काळ म्हणजे जमिनीवर पाऊस पडणे कमी होणे पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची परिस्थिति निर्माण होणे.

वाळवंट आणि दुष्काळ दोघांमध्ये काय परस्परसंबंध आहे?

जमिनीवर पाऊस पडणे कमी झाले की दुष्काळ ग्रस्त परिस्थिति निर्माण होते.आणि जमिनीवर जितका अधिक दुष्काळ पडतो तेवढयाच जमिनी ओसाड पडत असतात.आणि कालांतराने जमिनीचे वाळवंटात रूपांतरण होत असते.

जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस कधी साजरा करतात?

जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस हा प्रत्येक वर्षी जुन महिन्यात सतरा तारखेला साजरा केला जातो.

जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस का साजरा करतात?हा दिवस साजरा करण्याचे कारण काय?

देशामध्ये वाळवंटीकरण आणि दुष्काळ या दोघे प्रमुख समस्यांना सामोरे जाण्याकरीता जनतेत जागृती करणे गरजेचे आहे.17 जुन रोजी जगभरात हीच जनजागृती केली जात असते.

See also  गुड फ्रायडे २०२३ मराठीत । Good Friday 2023 In Marathi

मित्रांनो आपल्या सर्वाच्या आयुष्यात सुपीक जमिनीला खुपच महत्व आहे.कारण सुपीक जमीन हीच नवनिर्मिती करू शकते.

पण आपण मानव प्राण्याने पर्यावरणात केलेल्या आपल्या हस्तक्षेपाने जमिनीच्या सुपीकतेला हानी पोहचत आहे.

आज जर आपण पाहायला गेले तर आपणास असे दिसुन येईल की वाळवंट आणि दुष्काळ या दोघा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

याला कारण आपण केलेली जंगलातील वृक्षांची अमर्याद तोड,जनावरांनी केलेली अतिचराई,औद्योगिकरण,नेसर्गिक साधनसंपत्तीचा मानव करत असलेला बेसुमार आणि अमर्याद वापर आणि अवकाळी पडणारा पाऊस ही ह्या वाळवंटीकरण घडुन येण्यामागची काही प्रमुख कारणे असलेली आपणास दिसुन येतात.

ह्या सर्व घटकांचा मृदेवर खुप परिणाम होत असतो.आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी मानवाने पर्यावरणातील घटकांचा जो अति आणि बेसुमार वापर केला आहे हे सर्व जमीनीची सुपीकता नाही होण्यास कारणीभुत आहे.याचमुळे वाळवंटीकरणास देखील आरंभ झाला आहे.

याचेच परिणामस्वरूप मानवास भविष्यात अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.म्हणुन दुष्काळ आणि वाळवंटीकरण या दोघांच्या परिणामाविषयी लोकांना माहीती देण्यासाठी लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस साजरा केला जातो.

जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस कशापदधतीने साजरा करण्यात येतो?

● या दिवशी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आंतरराष्टीय पातळीवर जी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आहे.याविषयी जनतेला सांगितले जाते लोकांमध्ये जागृकता निर्माण केली जाते.

● दुष्काळ आणि वाळवंटीकरण यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकतील अशा समस्यांविषयी,भविष्यात उदभवू शकतील अशा दुष्परिणामांविषयी लोकांना यादिवशी अवगत केले जाते.

जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू काय आहे?

वाळवंटीकरणाला रोखणे त्यासाठी वाळवंटीकरण दुष्काळाविषयी जगभरातील सर्व नागरीकांमध्ये जागृकता निर्माण करणे हा आहे.

जागतिक वाळवंट आणि दुष्काळ विरोधी दिवस याचा इतिहास –

संयुक्त राष्टाकडुन 1992 मध्ये लिओदी जानिओ येथे भरविण्यात आलेल्या वसुंधरा परिषदेमध्ये जागतिक वाळवंट आणि दुष्काळ विरोधी दिन साजरा करण्याविषयी ठराव मांडला होता.1994 मध्ये याला मान्यता देखील प्राप्त झाली होती.

See also  हिट स्ट्रोक म्हणजे काय? हिट स्ट्रोक का होतो? - उष्माघात -Heat stroke what is it ?

आणि ह्या ठरावाची अंमलबजावणी सुदधा त्वरीतच युएनसीसीडी कार्यक्रमाच्या अंतर्गत केली गेली होती.
याचदिवसापासुन दरवर्षी 17 जुनला संयुक्त राष्टाच्या नेतृत्वाखाली जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस याचे पालन केले जाते.

वाळवंटीकरण थांबवायला आपण काय उपाययोजना करायला हवी?

● जंगलांची केली जाणारी बेसुमार जंगलतोड थांबवायला हवी.कारण याने नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्हास होत असतो.

● वृक्षांची लागवड करून त्यांना जगवायला हवे.कारण जेवढी अधिक झाडे लावली जातील तेवढी जमिनीची धुप होणे कमी होणार आणि जमिनीवर भरपुर पाऊस देखील पडतो.

● शेतीसुदधा शास्त्रीय पदधतीने करायला हवी.

● निसर्गासंबंधीत नवनवीन योजना राबविल्या गेल्या पाहिजे.