डियाड्रेशन म्हणजे काय ? Dehydration symptoms in Marathi

डियाड्रेशन म्हणजे काय ? Dehydration symptoms in Marathi

 

आपण आरोग्य लेखातून किंवा डॉक्टरांकडून निर्जलीकरण – Dehydration हा शब्द नक्की ऐकला असेल ? आपण क्रिकेट चा सामना बघतो,तेव्हा कधीकधी काही खेळाडूंना Dehydration च त्रास होतो.तेव्हा तुम्हाला प्रश पडला असेल की , – Dehydration म्हणजे नक्की काय ? आणि Dehydration त्रास कशामुळे होतो ? आपण या लेखात माहिती पाहणार आहोत.

शरीरशास्त्रानुसार Dehydration किंवा  निर्जलीकरण म्हणजे शरीराला  लागणार्‍या एकूण गरजेपेक्षा शरीरात कमी पाण्याची  उपलब्धता , सोबतच चयापचय प्रक्रियांमध्ये व्यत्यय येणे . जेव्हा आपल्या  शरीरात आत घेतलं जाणार पाण्याच प्रमाण बाहेर उत्सर्जित होणार्‍या पाण्या पेक्षा कमी होत तेव्हा शरीरार Dehydration निर्माण होत सहसा  व्यायाम, व्याधी किंवा उच्च तापमानामुळे हा विकार होतो.

ह्या लेखात पाहिले जाणारे मुद्दे खालीलप्रमाणे :

  • Dehydration

  • Dehydration प्रकार कोणते आहेत

  • Dehydration लक्षण काय आहेत

  • Dehydration कोण-कोणती कारणे आहेत

  • Dehydration काही घटक

निर्जलीकरण – Dehydration –

हायड्रेटेड राहणे स्वस्थ जीवन जगण्यासाठी महत्वाचे आहे.विशेषता उन्हाळ्यात जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे की,आपल् शरीर हे 70% पाण्यान बनल आहे  आणि आपल्या शरीराला हव तेवढे पाणी पिणे स्वस्थ राहण्यासाठी अगदी आवश्यकच असते  जेव्हा शरिराद्वारे आवश्यक प्रमाणात असणाऱ्या द्रव पदार्थांचे आपण सेवन नाही केल तर,ते Dehydration ते एक प्रमुख कारण बनते.ह्या पारिस्थित आपल शरीर जास्त प्रमाणात द्रव पदार्थ गमावते आणि आपल्याला हव्या तेवढ्या प्रमाणात पाणी मिळत नाही,त्यामुळे आपले शरीर काम करणे बंद करते.निर्जलीकरण – Dehydration झाल्यास शक्यतो आपल्याला थकवा जाणवतो आणि खूप तहान ही लागते, कधी कधी Dehydration मूळ आपल्याला भोवळ किंवा चक्कर ही येते.

See also  बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव आंबेडकर कसे पडले? तसेच आंबेडकरांच्या संपुर्ण वंशावळ अणि तिचा इतिहास काय आहे? - Ambedkar surname History

निर्जलीकरणाचे Dehydration  प्रकार कोणते आहेत ?

निर्जलीकरणाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

  • होईपोटोनिक  – ह्याप्रकरच्या निर्जलीकरणामध्ये, इलकट्रोलाईट्स चे भरपूर प्प्रमाणात नुकसान होते.ह्या स्थितीमध्ये निर्जलीकरणामुळे पाण्याच्या नुकसानी पेक्षा सोडियमचे मोठ्या प्रमाणात कमतरता होते.
  • हायपरटोनिक – ह्याप्रकरच्या निर्जलीकरणामध्ये पाण्याचे नुकसान तर होतेच ,पण ह्या स्थितीमध्ये शरीरातील सोडियम च्या तुलनेत आपण चेक केल तर पाण्याचे प्रमाण शरितातून मोठ्या प्रमाणावर कमी होत .
  • आईसोटोनीक – ह्या प्रकारच्या निर्जलीकरणामध्ये समान प्रमाणात शरिरातील सोडियम आणि पाण्याचे शरीरातून ऱ्हास होतो .आईसोटोनीक सगळ्यात जास्त होणारा Dehydration प्रकार आहे.

निर्जलीकरणाची  Dehydration लक्षणे कोण-कोणती आहेत ?

Dehydration चे संकेत साधे किंवा खूप गंभीर सुद्धा असू शकतात आणि वयानुसार वेगवेगळे असू शकतात..हे माहिती करून घेणे योग्य आहे की, निर्जलीकरणाची लक्षणे निर्जलीकरण – Dehydration होण्याआधी दिसून येतात.

साध्या Dehydration ची लक्षणे खालीलप्रमाणे असतात -Dehydration symptoms in Marathi

  • थकवा
  • तहान लागणे
  • घसा कोरडा पडणे
  • डोळ्यात पाण्याचे कमी उत्पादन
  • कोरडी त्वचा
  • कफ
  • चकर येणे
  • डोकेदुखी

गंभीर Dehydration चे  लक्षणे साध्या Dehydration पेक्षा खूप वेगळी असतात.गंभीर निर्जलीकर्णाची लक्षणे खालीलप्रमाणे असतात.

  • तहान खूप लागणे
  • घामाचे उत्पादन कमी होणे
  • हृदयाची धडधड जोरात होणे
  • श्वासोच्छ्वासाची गती वाढणे
  • संकुचित त्वचा
  • गडद लघवी
  • चकर येणे

गंभीर Dehydration झाले तर दवाखान्यात जाणे गरजेचे आहे.तुम्हाला जर यातील कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित दवाखान्यात जा आणि योग्य उपचार करा.

लहान बाळांमध्ये निर्जलीकर्णाचे थोडे वेगळ्या प्रमाणात लक्षणे आढळतात.लहान बाळांमध्ये आढळणारी निर्जलीकर्णाची सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे असतात.

  • कोरडी जीभ
  • रडताना डोळ्यातून पाणी न येणे
  • तीन तासांपर्यंत डायपर ओला न होणे
  • अस्वस्थता आणि चिडचिड होणे

Dehydration  कारण काय आहे ?

See also  As Your Wish म्हणजे काय? As Your Wish meaning in Marathi

Dehydration वेगवेगळी कारणे असू शकतात.आपले शरीर,घाम,श्वास घेणे,लघवी करणे आणि लाळेच्या माध्यमातून पाणी गमावते आणि जेव्हा हव्या तेवढ्या प्रमाणात शरीराला पाणी भेटत नाही तेव्हा निर्जलीकर्णाचा त्रास जाणवतो.

Dehydration  कश्यामुळे होवू शकतो  :

  • डायरिया – हे खूप वेगात पाणी आणि इलकंट्रोलाईट्सचे ऱ्हास करते.डायरिया झाल्यानंतर शरीर जास्त प्रमाणात पाण्याचे ऱ्हास करते आणि निर्जलीकर्णाचा त्रास होतो.
  • उलटी – हे द्रव पदार्थांचे ऱ्हास जास्त करते.जेव्हा आपल्याला उलटी येते, तेव्हा त्या उलटीतून आपल्या शरीरातील द्रव्य पदार्थ बाहेर येतात आणि उलटीचा त्रास होताना जास्तकरून पोटात अन्न आणि पाणी जात नाही.गेलेले पदार्थ उलटीद्वारे बाहेर येण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे तुम्हाला उलटी झाल्यानंतर निर्जलीकर्णाचा त्रास होतो.
  • ताप – हे निर्जलीकर्णाचे प्रमुख कारणातील एक कारण आहे.जितका जास्त ताप, तितक्या जास्त प्रमाणात निर्जलीकर्णाचा त्रास होतो.
  • जास्त घाम येणे – जास्त प्रमाणात गती केली तर,आपल्या शरीराला पाण्याची कमतरता जाणवते.आणि जास्त व्यायाम किंवा धावल्याने शरीरातील पाणी घामाद्वारे ही शरीराबाहेर पडते.त्यामुळे निर्जलीकर्णाचा त्रास होतो.
  • मधुमेह – रक्तातील साखर वाढल्यामुळे लघवी होण्याचे प्रमाण वाढते. वाढलेल्या लघवी करण्याच्या परिणामामुळे Dehydration  त्रास होऊ शकतो.
  • सारखे सारखे लघवीला येणे – हे अनियंत्रित मधुमेहामुळे होऊ शकते.औषधे,दारू ,लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ,रक्तदाबाची औषधे, एंटीथिस्टेमाइंस आणि एंटीसाइकोटिक्स लघवीचे प्रमाण वाढवू शकतात.

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग

1 thought on “डियाड्रेशन म्हणजे काय ? Dehydration symptoms in Marathi”

Comments are closed.