इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय ? – Intermittent Fasting Diet Plan Information In Marathi

इंटरमिटंट फास्टिंग सविस्तर माहिती ? – Intermittent Fasting Diet Plan Information In Marathi

वजन कमी कसे करायचे आणि त्यासाठी कोणता डाएट प्लँन रोज फाँलो करायचा हे सांगणारे भरपुर आहारतज्ञ आज आपणास जागोजागी दिसुन येतात.

पण आता वजन कमी करण्यासाठी डाएट फुड खाणे आणि व्यायाम करण्यासोबत अजुन एक नवीन ट्रेंड तसेच पदधत उदयास आलेली आपणास दिसुन येते, ह्या नवीन ट्रेंडचे तसेच पदधतीचे नाव आहे इंटरमिटंट फास्टिंग. Intermittent Fasting Diet In Marathi

इंटरमिटंट फास्टिंग ही आपले वजन कमी करण्याची एक खुप चांगली पदधत आहे.पण कुठलीही गोष्ट करण्याचे जसे फायदे असतात तसेच काही तोटे देखील असतात.

जे आपणास माहीत असणे फार गरजेचे असते.नाहीतर लाभापेक्षा आपणास हानीच अधिक होण्याची दाट शक्यता असते.

म्हणुन आजच्या लेखात आपण इंटरमिटंट फास्टिंगविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय?त्याचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे तसेच तोटे कोणकोणते आहेत?इत्यादी महत्वपुर्ण बाबींचा आढावा घेणार आहोत.

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय?-Intermittent Fasting Meaning In Marathi

इंटरमिटंट फास्टिंग ही एक आहार घेण्याची म्हणजेच खाण्याची पदधत आहे.यात आपण दिवसाचे दोन भागात विभाजन करत असतो.

ज्यात एका भागात आपण जेवण करत असतो म्हणजे आहार घेत असतो आणि दुसरया भागात आपण काहीही न खाता फक्त उपवास करत असतो.

यात खाण्याची वेळ काय असायला हवी हे आपण आपल्या पदधतीनुसार ठरवू शकतो.यात आपण कोणता आहार घेतो यापेक्षा तो आहार कधी घेतो हे खुप महत्वाचे ठरत असते.इंटरमिटंट फास्टिंगचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?-Types Of Intermittent Fasting And Intermittent Fasting Schedule In Marathi

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा मराठीत । Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

इंटरमिटंट फास्टिंगचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?-Types Of Intermittent Fasting And Intermittent Fasting Schedule In Marathi

ज्यांना आपले वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंगचा वापर करायचा आहे त्यांच्यासाठी पुढील काही महत्वाचे इंटरमिटंट फास्टिंगचे प्रकार तसेच नियम आहेत ज्यांचे पालन करणे त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे आहे.

इंटरमिटंट फास्टिंगचे नियम -Intermittent Fasting Rules In Marathi

वेळेच्या प्रतिबंधात खाणे-Time Restricted Eating) :

5:2 आहार :

 खाणे थांबणे मग पुन्हा खाणे :

पर्यायी दिवशी करायचा उपवास-Alternate-Day Fasting

योदधा आहार -Warrior Diet

1)वेळेच्या प्रतिबंधात खाणे-Time Restricted Eating

वेळेच्या प्रतिबंधात खाण्यात-Time Restricted Eating) मध्ये बारा किंवा त्यापेक्षा अधिक तास उपवास करणे आणि बाकीचे जे उरलेले तास आहे त्यात खाणे हे समाविष्ट असते.

यासाठी 16/8 ची पदधत आपण अवलंबु शकतो.ज्यात आपण दररोज सोळा तास काहीही न खाता फक्त उपवास करतो तर उर्वरीत आठ-नऊ तास आपण खाण्यासाठी देत असतो.

म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर आठ वाजेच्या सुमारास नाष्टा केला तर ती व्यक्ती संध्याकाळी चार वाजेलाच खाऊ शकते.आणि ती पुन्हा दुसरया दिवशी सकाळी नाष्टा करू शकते.

2) 5:2 आहार :

ह्या दुसरा प्रकारात आपण आपल्या मनाला वाटेल ते आठवडयातील पाच दिवस खाऊ शकतो.

आणि मग उरलेल्या 2 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कॅलरीजचे प्रमाण 500-600 पर्यंत मर्यादित करणे आवश्यक असते.यासाठी आपण ठाराविकच आहाराचे सेवण करायला हवे.

हे आठवडयातील दोन दिवस कोणते ठेवायचे हे आपल्यावर निर्भर आहे.

3) खाणे,थांबणे मग पुन्हा खाणे :

ह्या प्रकारात आपल्याला दररोज उपवास करावा लागत नाही तर एक दिवसाआड उपवास करावा लागतो.

यात ज्या दिवशी आपण उपवास ठेवलेला नसेल त्या दिवशी आपण आपल्याला आवडतील असे सर्व अन्नपदार्थ खाऊ शकतो.

पण उपवासाच्या दिवशी कँलरीजचे प्रमाण वाढु नये यासाठी आपण ठरलेल्या वेळेत आणि मर्यादितच आहार घेणे महत्वाचे असते.

किंवा यात आठवड्यातून एक वेळा किंवा दोन वेळा 24 तासांसाठी आपणास उपवास करायचा असतो.

4) पर्यायी दिवशी करायचा उपवास-Alternate-Day Fasting

See also  महागाई म्हणजे काय ?Inflation information Marathi

पर्यायी दिवसाच्या उपवासासोबत इतर दिवशी देखील उपवास करण्याचे गोल असते.

5) योदधा आहार -Warrior Diet) :

वॉरियर डाईट हा पहिल्या काही लोकप्रिय आहारांपैकी एक मानला जायचा ज्यात आपण अधूनमधून उपवास करणे समाविष्ट होते.

यामध्ये दिवसा कमी प्रमाणात कच्ची फळे आणि भाज्या खाणे आणि रात्रीच्या वेळेस एक मोठे जेवण घेणे म्हणजे जास्त खाणे समाविष्ट आहे.

इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे -Benefit Of Intermittent Fasting In Marathi

इंटरमिटंट फास्टिंगचे काही महत्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

1)वजनात लवकर घट होते :
2) आपल्या पचनक्रियेत सुधारणा होते:
3) मधुमेह होत नाही :
4) हदयाचे आरोग्य चांगले राहते:
5) आपली त्वचा अजुन जास्त निखारते :

1)वजनात लवकर घट होते :

इंटरमिटंट फास्टिंगमध्ये दोन्ही वेळेच्या आहारात अंतर ठेवले जात असते.म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने रात्रीच्या वेळेस काही जेवण केले तर दूसरया दिवशी ती सकाळी दहा ते अकरा वाजताच काही खात असते.

याने आपल्या शरीराला काही दहा ते बारा तासांचा आराम मिळत असतो.ज्याने आपले वजन कमी व्हायला नक्कीच मदत होते.इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे -Benefit Of Intermittent Fasting In Marathi

2) आपल्या पचनक्रियेत सुधारणा होते:

हे तर आपल्याला सर्वानाच माहीत आहे की खाल्लेल अन्न पचायला वेळ लागत असतो.आणि त्यातच आपण दिवसभर येता जाता काहीही ओबड धोबड खात राहिलो तर आपले खाल्लेले अन्न नीट पचत नसते.

पण इंटरमिटंट फास्टिंगमध्ये दोन वेळेच्या जेवणात बरेच अंतर असते ज्याने आपले खाल्लेले आधीचे अन्न नीट पचुन जात असते.

3) मधुमेह होत नाही :

जेव्हा आपण इंटरमिटंट फास्टिंग करतो तेव्हा आपण कमी कँलरीचा आहार घेत असतो.ज्याने आपल्या शरीरातील इन्सुलीनची पातळी आटोक्यात राहत असते.तसेच आपली चरबी कमी होऊन आपल्याला मधूमेह होण्याचा धोका टळत असतो.

4) हदयाचे आरोग्य चांगले राहते:

जेव्हा आपण इंटरमिटंट फास्टिंग करत असतो तेव्हा आपल्या शरीरात असलेली कोलेस्टेराँल तसेच शुगरची पातळी नेहमी नियंत्रणात राहत असते.ज्याने आपल्या हदयाचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्याला कुठलाही हदयाशी संबंधित आजार जडत नाही.

5) आपली त्वचा अजुन जास्त निखारते :

इंटरमिटंट फास्टिंग करण्याचा हा देखील एक फायदा असतो की याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत असतात.ज्याचा लाभ नक्कीच आपल्या त्वेचेचे आरोग्य राखण्यास होत असतो.त्वचा अधिक जास्त निखारते.

See also  हार्ड काँपी आणि साँफ्ट काँपी मधील फरक - Difference Between Hard Copy And Soft Copy In Marathi

इंटरमिटंट फास्टिंगचे तोटे कोणकोणते आहेत?-Disadvantages Of Intermittent Fasting In Marathi

इंटरमिटंट फास्टिंग केल्याने होणारे काही तोटे पुढीलप्रमाणे आहेत-

1)झोप कमी लागते :

2) डिहायड्रेशनची समस्या उदभवत असते:

3) अतिखाण्याच्या प्रमाणात वाढ होते:

4) शरीरात अशक्तपणा जाणवत असतो:

5) आपला मुड नेहमी डिस्टर्ब राहत असतो:

1)झोप कमी लागते :

इंटरमिटंट फास्टिंगमध्ये आपण मर्यादित आहार घेत असतो आणि उपवास करत असतो ज्याने पोटात पुरेसे अन्न नसल्याने रात्री झोप न लागण्याची समस्या देखील आपणास उदभवू शकते.

2) डिहायड्रेशनची समस्या उदभवत असते:

पुरेसा आहार न घेतल्याने आपल्याला पाण्याची तहान देखील खुप कमी लागत असते आणि शरीरात पुरेसे पाणी न गेल्याने कमी पाणी गेल्याने आपणास डिहायड्रेशनची समस्या उदभवू शकते.

3) अतिखाण्याच्या प्रमाणात वाढ होते:

इंटरमिटंट फास्टिंगमध्ये आपण उपवास करत असतो.आणि त्यात दोन वेळेच्या जेवणात बारा तासांचे अंतर ठेवत असतो.ज्याने आपले खाल्लेले अन्नही पचुन जाते.आणि आपल्याला भुक पण खुप लागते अशात आपल्याकडुन अतिखाणे होऊ शकते.

4) शरीरात अशक्तपणा जाणवत असतो:

इंटरमिटंट फास्टिंगमध्ये आपण कडक उपवास करत असतो.आणि त्यात दोन वेळेच्या जेवणात किमान बारा तासांचे अंतर आपण ठेवत असतो.अशा परिस्थितीत अधिक वेळ उपाशी राहिल्याने आपल्याला अशक्तपणाचा त्रास जाणवू शकतो.

5) आपला मुड नेहमी डिस्टर्ब राहत असतो :

इंटरमिटंट फास्टिंगमध्ये कडक उपवास केला जात असतो.आणि त्यातच दोन्ही वेळेच्या जेवणात किमान बारा तासांचे अंतर ठेवले जात असते.

अशात सुरवातीला  सवय नसताना उपासमारीने आपली चिडचिड होऊ शकते आणि उपाशीपोटी आपले कामात देखील मन लागत नसते आपला मुड काम करताना देखील डाऊन राहत असतो.

Intermittent Fasting FAQ विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न –

1)इंटरमिटंट फास्टिंग केल्याने काय परिणाम होतो?-Intermittent Fasting Results In Marathi)

इंटरमिटंट फास्टिंग केल्याने आपल्या शरीराचे वजन 3/24 आठवड्यांच्या कालावधीत 3 ते 8% इतके कमी होत असते.

2) इंटरमिटंट फास्टिंग केल्याने वजन कमी होते का?-Intermittent Fasting Weight Lossin)

संशोधकांनी नुकतेच एक संशोधन केले आहे ज्यात त्यांना असे निदर्शनास आले आहे की अठरा तासाच्या आत पाऊंड कमी करण्याच्या हेतुने अधूनमधून उपवास केल्याने किंवा वेळेचे बंधन ठेवून खालल्याने स्थूल लोकांचे रोजच्या कॅलरी कॅप पेक्षा अधिक जास्त वजन कमी होताना दिसुन येत नाही.

3) फास्टिंग ट्ँकर काय आहे?-Fasting Tracker In Marathi)

ही एक अँप आहे जी आपल्या हेल्थ आणि फिटनेसला ट्ँँक करण्याचे काम करते.ही अँप अशा व्यक्तींसाठी फार लाभदायक आहे जे इंटरमिटंट फास्टिंग करत असतात.