झटपट लोन देत असलेल्या अँप्स – Instant Loan Apps In Marathi

तात्काळ कर्ज देत असलेल्या अँप्स – Instant Loan Apps In Marathi

Best instant loan app in India
आज अडीअडचण कोणाला नाहीये.आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात नेहमी अडीअडचणीचे प्रसंग येत असतात.

आणि अशा अडीअडचणीच्या प्रसंगात आपल्याला पैशांची फार नितांत गरज असते.त्यातच आपण बँकेतुन लोन घ्यायचे म्हटले तर बँकेची सर्व लोन प्रोसेस पुर्ण व्हायला खुपच वेळ लागत असतो.

 • तसेच बँक आपल्याकडे गँरंटी देखील मागत असते.आणि यातच आपण कमवते नसलो आपण एक विदयार्थी असाल तर अशावेळी आपल्याकडे एकच पर्याय उरत असतो तो म्हणजे आँनलाईन लोन अँप्सदवारे झटपट लोन घेणे.
 • पण त्यात देखील कुठली अँप खरी आहे आणि कुठली अँप फेक आहे हे आपल्याला माहीत नसल्याने आपली फसवणुक देखील होण्याची दाट शक्यता असते.
 • कारण जर आपण आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये जाऊन लोन अँप्स असे सर्च केले तर आपल्यासमोर वेगवेगळया लोन देत असलेल्या अँप्स येत असतात.
 • एकाच वेळी एवढया निरनिराळया अँप्स बघुन आपल्याला कोणती अँप खरी आहे?कोणती अँप आपणास खरोखर लोन देईल आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे तिला आरबीआयकडुन मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.हा प्रश्न सर्वप्रथम पडत असतो.
 • पण काळजी करू नका मित्रांनो आपली हीच समस्या सोडविण्यासाठी आज आम्ही आपणास काही 10 उत्तम आणि खरोखर पर्सनल लोन देत असलेल्या Instant Loan Apps विषयी माहीती देणार आहोत.

ज्या आपल्याला झटक्यात पर्सनल लोन देण्याचे काम करतात.आणि ह्या अँप्सला आरबीआयची मंजुरी देखील प्राप्त आहे.

झटपट कर्ज देत असलेल्या अँप्स कोणकोणत्या आहेत? -Instant Loan Apps In Marathi

मित्रांनो आपणास झटपट कर्ज देत असलेल्या काही रिअल आणि आरबीआयकडून मंजुरी देण्यात आलेल्या लोन अँप्सची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

MI Credit :

 • एम आय क्रेडिट ही एक आपणास पर्सनल लोनची सुविधा देणारी अँप आहे.एम आय क्रेडिटला आरबीआयकडुन मंजुरी प्राप्त आहे.
 • ज्यांना पर्सनल लोन हवे आहे अशा गरजु व्यक्तींना लोन उपलब्ध देण्याचे काम दिर्घकाळापासुन ही अँप करीत आहे.
 • ह्या अँपला आतापर्यत 3.6 एवढे रेटिंग प्राप्त झाले आहे आणि प्लेस्टोअरवरून ही अँप आत्तापर्यत 5 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी ही अँप डाऊनलोड केलेली आहे.
 • ही अँप आपणास 25 लाखापर्यतचे पर्सनल लोन देण्याचे काम करते.इथे आपणास इंटररेस्ट रेट 10 टक्क्यांपासुन 35 पर्यत लावला जातो.
 • आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे आपल्या प्रोफाईलमध्ये जेवढी रिस्क असेल त्याप्रमाणे येथे आपणास इंटरेस्ट रेट द्यावा लागत असतो.
See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ फोटो - Babasaheb Ambedkar Jayanti 2023- Dr. Babasaheb Ambedkar Jayanti rare Images Download

ही कंपनी आपणास किमान 9 महिन्याच्या तसेच कमाल 24 महिन्याच्या कालावधीसाठी लोन देते.

Cash Bean :

कँश बिन ही सुदधा एक आपणास पर्सनल लोनची सुविधा देणारी अँप आहे.कँश बिनला सुदधा आरबीआयकडुन मंजुरी प्राप्त आहे.Best instant loan app in India

 • ज्यांना पर्सनल लोन हवे आहे अशा गरजु व्यक्तींना लोन उपलब्ध देण्याचे काम ही अँप करीत आहे.
 • ह्या अँपला आतापर्यत 3.+ एवढे रेटिंग प्राप्त झाले आहे आणि प्लेस्टोअरवरून ही अँप आत्तापर्यत 10 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी ही अँप डाऊनलोड केलेली आहे.
 • ही अँप आपणास 1500 रूपयांपासुन 60 हजारापर्यत पर्सनल लोन देण्याचे काम करते.इथे आपणास इंटररेस्ट रेट किमान 25 टक्क्यांपर्यत लावला जातो.
 • ही कंपनी आपणास किमान 3 महिन्याच्या तसेच कमाल 6 महिन्याच्या कालावधीसाठी लोन देते.
 • इथे आपल्याला डिजीटल पदधतीने सर्व लोनची प्रोसेस पुर्ण करावी लागते.तसेच इथे आपणास काही प्रोसेसिंग फी देखील चार्ज केली जाते.

आपल्या प्रोफाईलवर असलेल्या रिस्क फँक्टर नुसार इथे आपणास प्रोसेसिंग फी चार्ज केली जाते.जी 100 रूपयांपासुन 2 हजारपर्यत असते.

Kredit Bee :

 • क्रेडिट बी ही सुदधा एक आपणास पर्सनल लोनची सुविधा देणारी एक उत्तम अँप आहे.क्रेडिट बिनला सुदधा आरबीआयकडुन मंजुरी प्राप्त आहे.
 • ज्यांना पर्सनल लोनची गरज आहे अशा गरजु व्यक्तींना लोन उपलब्ध करून देण्याचे काम ही अँप करीत करते.
 • ह्या अँपला आतापर्यत 3.+ एवढे रेटिंग प्राप्त झाले आहे आणि प्लेस्टोअरवरून ही अँप आत्तापर्यत 10 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी ही डाऊनलोड केलेली आहे.KreditBee Get Instant Loan - Kredit Bee
 • ही अँप आपणास 1000 रूपयांपासुन 2 लाखापर्यतचे पर्सनल लोन देण्याचे काम करते.इथे आपणास इंटररेस्ट रेट हा जास्तीत जास्त 29 टक्क्यांपर्यत लावला जातो.

ही कंपनी आपणास किमान दोन महिन्याच्या तसेच कमाल 15 महिन्याच्या कालावधीसाठी लोन देते.

Cash He :

कँश ही ही सुदधा एक आपणास पर्सनल लोनची सुविधा उपलब्ध करून देणारी एक चांगली अँप आहे.
कँश हीला सुदधा आरबीआयकडुन मंजुरी प्राप्त आहे.

 • आपणास जर झटपट पर्सनल लोन हवे असेल तर आपण ह्या अँपचा देखील वापर करू शकता.
 • ज्यांना पर्सनल लोनची आवश्यकता आहे अशा गरजु व्यक्तींना लोन उपलब्ध करून देण्याचे काम ही अँप करते.
 • ह्या अँपला आतापर्यत 3 पाँईण्ट पेक्षा अधिक रेटिंग प्राप्त झाले आहे आणि प्लेस्टोअरवरून ही अँप आत्तापर्यत 5 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी ही अँप डाऊनलोड देखील केलेली आहे.
 • ही अँप आपणास एक हजार रूपयांपासुन तीन लाखापर्यतचे पर्सनल लोन देते.
 • इथे आपल्याला इंटररेस्ट रेट हा 30 टक्क्यांपर्यत द्यावा लागु शकतो.आपल्या रिस्क प्रोफाईला मँच करेल असा इंटररेस्ट रेट इथे आपणास द्यावा लागत असतो.
See also  शेवगा लागवड - Moringa Cultivation Maharashtra

ही कंपनी आपणास फक्त 3 महिन्याच्या कालावधीसाठी लोन देते.पण एक चांगली रक्कम इथून आपणास कर्जाच्या स्वरूपात प्राप्त होऊ शकते.

Home Credit Personal Loan App :

ही सुदधा एक पर्सनल लोन देणारी चांगली अँप आहे.आणि ह्या अँपला आरबीआयकडुन मंजुरी देखील प्राप्त झाली आहे.

 • ह्या अँपची एकुण रेटिंग 4.4 इतकी आहे.आणि ही अँप आत्तापर्यत 10 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केली आहे.
 • ही अँप आपणास पर्सनल आणि होम लोन देण्याचे काम करते.ही अँप आपणास दहा हजारापासून ते दोन लाखापर्यतचे लोन आपण इथून घेऊ शकतो.Home Credit Personal Loan App :
 • इथे आपणास 29 टक्क्यांपासुन 50 टक्के पर्यत इंटररेस्ट रेट लावला जातो.ह्या अँपचा इंटरेस्ट रेट खुप अधिक आहे पण ही एक फार जुनी आणि ट्रस्टेड अँप्सपैकी एक अँप मानली जाते.
 • शिवाय इथे आपल्याला लोनचे चांगले अमाऊंट प्राप्त होते.म्हणुन आपण इथे देखील लोनसाठी अँप्लाय करू शकतो.
 • इथे आपणास किमान पाच टक्क्यापर्यत प्रोसेसिंग फी देखील भरावी लागत असते.

ही अँप आपणास किमान सहा महिने तसेच कमाल 51 महिन्यांच्या कालावधीसाठी लोन देते.याच्या आतच आपणास घेतलेली सर्व लोनची रक्कम फेडावी लागत असते.

Kishsht :

ही सुदधा एक चांगली अँप आहे जी आपल्याला पर्सनल लोन देण्यासोबत ईएम आयची सुविधा देखील देते.

 • ह्या अँपची प्लेस्टोअरवर एकूण 4.5 इतकी रेटिंग आहे.
  एक करोडपेक्षा अधिक लोकांनी ही अँप आतापर्यत प्लेस्टोअरवरून डाऊनलोड केली आहे.
 • हे अँप आपल्याला दहा हजारापासुन ते एक लाखापर्यतचे लोन देते.इथे झटपट लोन घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड तसेच पँन कार्डची आवश्यकता पडत असते.
 • इथे आपल्याला किमान 14 टक्के आणि कमाल 28 टक्के इंटररेस्ट रेट लावला जातो.ही अँप आपल्याला तीन महिन्यांपासुन ते 24 महिन्यांपर्यतच्या कालावधीसाठी लोन देत असते.

Money View :

मनी व्युव्ह ही सुदधा एक उत्तम अँप आहे.ही कंपनी कर्ज वाटपासाठी खुप प्रसिदध कंपनी मानली जाते.

 • प्लेस्टोअरवर ह्या अँपची रेटिंग 4.3 इतकी आहे.ही अँप सुदधा एक करोडपेक्षा अधिक लोकांनी आतापर्यत डाऊनलोड केलेली आहे.
 • ही अँप आपणास दहा हजारापासुन पाच लाखापर्यतचे लोन देते.इथे आपल्याला 16 टक्कयांपासुन 36 टक्के इतका इंटररेस्ट रेट लावला जात असतो.
 • इथे आपल्याला किमान तीन तसेच पाच वर्षाच्या कालावधीसाठी लोन मिळत असते.ही अँप आपल्याला इंस्टंट क्रेडिट लाईनची सुविधा देखील देते.
See also  राईट टू हेल्थ बील म्हणजे काय - Right to health bill meaning in Marathi

 M Pocket :

एम पाँकेट अँप ही सुदधा एक पर्सनल लोन देणारी चांगली अँप आहे.ही अँप आपणास आधार कार्डच्या आधारे पर्सनल लोन देते.

 • आणि ह्या अँपला आरबीआयकडुन मंजुरी देखील प्राप्त आहे.
 • ह्या अँपची एकुण रेटिंग 4.3 इतकी आहे.आणि ही अँप आत्तापर्यत 10 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केली आहे.
 • ही अँप आपणास विशेषत पर्सनल लोन देण्याचे काम करते.ही अँप आपणास पाचशे रूपयापासून ते तीस हजारापर्यतचे लोन आपण इथून घेऊ शकतो.
 • इथे आपणास 2 टक्क्यांपासुन 6 टक्के पर्यत इंटररेस्ट रेट लावला जातो.ह्या अँपचा इंटरेस्ट रेट खुप कमी आहे पण हा इंटररेस्ट आपणास दर महिन्याला देणे गरजेचे असते.
 • ज्या विदयार्थ्यांना आपल्या शैक्षणिक काम काजाकरिता तसेच नवीन मोबाईल वगैरे खरेदी करण्यापुरता तसेच आपल्या इतर वैयक्तिक खर्चाकरिता लोन हवे असेल त्यांच्यासाठी ही एक चांगली अँप आहे.
 • ही अँप आपणास किमान तीन महिने तसेच कमाल 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लोन देते.

True Balance :

ट्रु बँलन्स सुदधा एक चांगले लोन अँप आहे.ह्या अँपला आतापर्यत 4.3 इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.आणि एक करोडपेक्षा अधिक लोकांनी ही अँप डाऊनलोड देखील केली आहे.

 • ट्रू बँलन्स हे अप आपणास पर्सनल लोन देण्याचे काम करते.हे अँप आपल्याला पाच हजार ते पन्नास हजारापर्यत लोन देते.
 • इथे इंटरेस्ट रेट आपणास पाच ते सहा टक्कयांपर्यत द्यावा लागतो.आणि हा इंटररेस्ट रेट आपणास दर महिन्याला द्यायचा असतो.
 • ह्या अँपवरून आपल्याला किमान 62 दिवसांसाठी आणि जास्तीत जास्त 115 दिवसांच्या कालावधीकरीता साठी लोन घेता येते.
 • हे अँप असे लोक देखील वापरू शकतात ज्यांचा कुठलाही सिव्हील स्कोअर अद्याप नाहीये.
  उदा: विदयार्थी
 • याने आपणास आपला सिव्हील स्कोअर पण वाढवता येईल.आणि आपणास लोन देखील प्राप्त करता येईल.

Navi :

नवी ही एक फार उत्तम आणि फेमस पर्सनल लोन देणारी अँप तसेच कंपनी आहे.

 • ही अँप आपणास हेल्थ इंशुरन्सची सुविधा देण्याचे काम देखील करते.
 • ह्या अँपला आत्तापर्यत 3.4 इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.आणि ही अँप आत्तापर्यत एक करोडपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केली आहे.
 • ही अँप आपणास 20 लाखापर्यतचे पर्सनल लोन देण्याचे काम करते.ज्यांच्याकडे एक चांगले कमाईचे साधन आहे आणि चांगला सिव्हील स्कोअर आहे असे व्यक्ती इथे पर्सनल लोनसाठी अँप्लाय करू शकतात.
 • हे अँप आपल्याला 3 महिने ते 72 महिन्याच्या कालावधीसाठी लोन देते.इथे आपल्याला किमान दहा टक्के आणि कमाल 36 इंटरेस्ट रेटची आकारणी केली जात असते.

इथे प्रोसेसिंग फी आपल्याकडुन कमाल 6 टक्के इतकी आकारली जात असते.