शेअर मार्केट उत्तम ट्रेडिंग एप्स – Best Trading App Information In Marathi

शेअर मार्केट ट्रेडिंग एप्स – Best Trading App Information In Marathi

आज जगभरातील लाखो तसेच करोडो ट्रेडर्स तसेच इन्व्हेस्टर स्टाँक मार्केटमध्ये आपल्या पैशांची इनव्हेस्टमेंट करताना आपणास दिसुन येतात.

पण जे व्यक्ती आज स्टाँक मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये एकदम नवीन आहेत.ज्यांना स्टाँक मार्केटविषयी ट्रेडिंग बददल एवढी सखोल माहीती नाही.

अशा नवोदित ट्रेडर्सला इन्वहेस्टर्सला एकच प्रश्न पडत असतो तो म्हणजे स्टाँक मार्केटमध्ये आँनलाईन गुंतवणुक कशी करायची?

ट्रेडिंग करण्यासाठी तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी कोणत्या बेस्ट अँप आहेत ज्यांचा आपण वापर करू शकतो.

तर मित्रांनो काळजी करू नका आज आपण काही अशा बेस्ट अँप्सविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यांचा वापर आपण ट्रेडिंग करण्यासाठी तसेच शेअर मार्केटमध्ये आँनलाईन गुंतवणुक करण्यासाठी करू शकतो.

चला तर मग कुठलाही विलंब न करता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.

शेअर मार्केटमध्ये – Best trading app in India 2021 for beginners

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तसेच ट्रेडिंग करण्यासाठी उत्तम अँप्स कोणकोणत्या आहेत? Best Trading And Share Market App Information In Marathi

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तसेच आँनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी आपण पुढील काही बेस्ट अँप्सचा वापर करू शकतो-

Best Stock Market App-

1)Zerodha Kite :

2) Angel One :

3) Upstox :

4) 5 Paisa :

5) Groww :

6) Sharekhan :

7) Olymp Trade :

8) Iq Option :

9) Coin Switch :

10) IIFL Markets :

See also  Discount Broker की Full Service Broker कोणता निवडावा: शेअर मार्केट  ? Difference in discount broker and full service broker

11) Expert Option :

12) Octa Fx :

13) Binomo :

Zerodha Kite:

झीरोधा काईट अँप हे एक मोबाईल तसेच वेब ट्रेडिंग अँप्लीकेशन आहे.ज्याचा वापर करून आपण वेगवेगळया सेक्टरमध्ये आँनलाईन ट्रेडिंग तसेच इनव्हेस्टमेंट करू शकतो.

 • ह्या अँपला प्लेस्टोअरवर 4.3 इतकी रेटिंग देण्यात आलेली आहे.ह्या अँपला आत्तापर्यत एक करोडपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड देखील केलेले आहे.

Angel One :

एंजेल वन ही एक मोबाईल अँप आहे जी आपणास विनामूल्य डीमॅट अकाऊंटसोबत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास,ट्रेंडिंग करण्यास अनुमती देते.

 • एंजेल वनला औपचारिकदृष्टया एंजल ब्रोकिंग म्हणून ओळखले जाते.
 • एंजेल वन अँपदवारे आपल्याला स्टॉक, IPO, F&O मध्ये गुंतवणूक करता येते आणि यात आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग देखील करता येते.
 • ह्या अँपला प्लेस्टोअरवर 4.2 इतकी रेटिंग देण्यात आलेली आहे.आणि ह्या अँपला आत्तापर्यत एक करोडपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड देखील केलेले आहे.

Upstox :

अप स्टॉक्स हे एक मोबाईल अँप्लिकेशन आहे.

 • जे आपल्याला ऑनलाइन पदधतीने स्टॉक ट्रेडिंग करण्यासाठी म्युच्युअल फंड,डिजीटल गोल्ड तसेच आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लाभलेले एक उत्तम ट्रेडिंग प्लँटफाँर्म आहे.
 • ह्या अँपला 4.6 इतक्या रेटिंग आत्तापर्यत प्राप्त झाल्या आहेत.आणि ही अँप आत्तापर्यत प्लेस्टोअरवरून एक करोड पेक्षा अधिक वेळेस डाऊनलोड देखील करण्यात आलेली आहे.

 Paisa :

फाईव्ह पैसा हे सुदधा एक आँनलाईन ट्रेडिंग प्लँटफाँर्म तसेच मोबाईल अँप आहे.

 • फाईव्ह पैसा अॅप हे एक ऑनलाइन डिस्काउंट स्टॉक ब्रोकर म्हणुन ओळखले जाते.ज्याच्या मदतीने आपण स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडमधील कुठल्याही कंपनीच्या शेअर्सला खरेदी करू शकतो आणि ते पाहिजे तेव्हा विकु देखील शकतो.
 • ह्या अँपला आत्तापर्यत 4.2 इतक्या रेटिंग आत्तापर्यत प्राप्त झाल्या आहेत.आणि ही अँप आत्तापर्यत प्लेस्टोअरवरून एक करोड पेक्षा अधिक वेळेस डाऊनलोड देखील करण्यात आलेली आहे.

5) Groww :

ग्रो अँप हे स्टाँक मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तसेच आँनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी वापरले जाणारे एक सिक्युअर मोबाईल अँप आहे.

 • ह्या अँपचा वापर करून आपण स्टाँक मार्केटमध्ये,म्युच्अल फंडमध्ये तसेच गोल्डमध्ये देखील अत्यंत सहजरीत्या गुंतवणुक करू शकतो.
 • ग्रो अँपला आत्तापर्यत 4.5 इतके रेटिंग प्राप्त झाले आहे.आणि ही अँप देखील आत्तापर्यत एक करोडपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलेली आहे.
See also  NOC म्हणजे काय ? संपूर्ण  माहीती  - NOC information in Marathi

ह्या अँपविषयी अधिक माहीती प्राप्त करण्यासाठी आपण ग्रो अँप विषयी संपुर्ण माहीती दिलेले आमचे आधीचे एक लेख वाचु शकता.

6) Share Khan :

शेअर खान ही फुल सर्विस देणारी एक स्टाँक ब्रोकिंग कंपनी आहे.

 • इन्वहेस्टरला शेअर मार्केट,कमोडिटी आणि आयपीओ मधल्या घडत असलेल्या घडामोडींची माहीती प्राप्त व्हावी यासाठी हे अँप वृत्तवाहिनींसोबत देखील जोडले गेलेले आहे.
 • याचा फायदा हा आहे की इन्वहेस्टर्सला एका क्लीकवर कुठल्याही शेअर्सविषयी सविस्तर माहीती प्राप्त करता येते.
 • ह्या अँपला आत्तापर्यत 3.9 इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.ही अँप आत्तापर्यत 50 लाखापेक्षा अधिक लोकांनी प्लेस्टोअरवरून डाऊनलोड देखील केली आहे.

7) Olymp Trade :

आँलिंप ट्रेड हे एक आँनलाईन फिक्स टाईम चैन ब्रोकर तसेच फाँरेक्स ब्रोकर आहे.

 • ह्या अँपचा वापर करून गुंतवणुकदार सोने,चांदी तसेच इतर कुठल्याही वस्तुमध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतात.
 • तसेच ह्या अँपचा वापर करून आपण मोठमोठया कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकतो जसे की टेस्ला,अँपल इत्यादी.
 • आँलिंप ट्रेड ह्या अँपला आत्तापर्यत 4.2 एवढी रेटिंग प्लेस्टोअरवर प्राप्त झाली आहे.ही अँप प्लेस्टोअर वरून 50 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केलेली आहे.

8) Iq Option :

आय क्यु आँप्शन हे एक आँनलाईन ट्रेडिंग प्लँटफाँर्म आहे.ज्यात आपणास वेगवेगळया सेक्टरमध्ये ट्रेडिंग करता येते.

 • इथे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला आधी काही पैसे आपल्या खात्यावर जमा करणे आवश्यक असते.मग आपण ट्रेडिंग करू शकतो.
 • आय क्यु आँप्शन ह्या अँपला आत्तापर्यत 4.1 एवढी रेटिंग प्लेस्टोअरवर प्राप्त झाली आहे.ही अँप प्लेस्टोअर वरून 50 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड देखील केलेली आहे.

9) Coin Switch :

काँईन स्वीच हे एक मोबाईल अँप आहे.ज्याच्यादवारे आपणास क्रिप्टोकरंसीची खरेदी तसेच विक्री करता येते.

 • आणि काँईन स्वीचचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे ह्या अँपचा वापर करून गुंतवणुकदार फार कमी वेळेत क्रिप्टोकरंसीची खरेदी तसेच विक्री करू शकतात.
 • ह्या अँपला आत्तापर्यत 4.2 इतक्या रेटिंग प्राप्त झाल्या आहेत.काँईन स्वीच अँपला आत्तापर्यत दहा मिलियनपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड देखील करण्यात आले आहे.
See also  केवायसी फ्रॉड म्हणजे काय? | KYC fraud meaning in Marathi

10) IIFL Markets :

 • आय आय एफ एल हे आपणास होल्डिंग लिमिटेडच्या माध्यमातुन फुल सर्विस देत असलेली स्टाँक ब्रोकर कंपनी तसेच एक फर्म आहे.
 • आय आय एफ एल हे आपणास ब्रोकरेज सर्विस तर देतेच.याचसोबत हे आपणास लोन घेण्यापासून तर तारण ठेवण्यापर्यतच्या सर्व इतर सेवा देखील पुरवण्याचे काम करते.IIFL Markets

ह्या अँपची एकुण रेटिंग 4.4 आहे.आणि ही अँप आत्तापर्यत पाच मिलियनपेक्षा अधिक व्यक्तींनी डाऊनलोड देखील केली आहे.

11) Expert Option :

 • एक्सपर्ट आँप्शन हे एक ट्रेडिंग अँप आहे.ह्या अँपचा फायदा हा आहे की ह्या अँपदवारे आपण ट्रेडिंगशी संबंधित वेगवेगळया स्ट्रँटँजी समजुन घेऊ शकतो.ज्याने ट्रेडिंगदवारे आपणास खुप कमी वेळात जास्त नफा प्राप्त करता येईल.
 • एक्सपर्ट आँप्शन ह्या अँपला 4.2 इतकी रेटिंग मिळाली आहे.आणि 10 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी ही अँप प्लेस्टोअरवरून डाऊनलोड देखील केलेली आपणास दिसुन येते.

12) Octa Fx :

 • आँक्टा एफ एक्स हे एक आँनलाईन ट्रेडिंग अँप आहे.ह्या अँपदवारे आपण घरबसल्या आँनलाईन ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतो.
 • आँक्टा एफ एक्स ह्या अँपला आत्तापर्यत 4.0 एवढी रेटिंग प्राप्त झाली आहे.आणि 10 मिलियनपेक्षा अधिक मोबाईल युझर्सने प्लेस्टोअरवरून ही अँप डाऊनलोड सुदधा केली आहे.

13) Binomo :

 • बिनोमो हे सुदधा एक आपणास आँनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी तयार करण्यात आलेले मोबाईल अँप आहे.
 • ह्या अँपचा वापर करून गुंतवणुकदार कमी पैशात देखील ट्रेडिंगची सुरूवात करू शकतात.सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या अँपदवारे ट्रेडर तसेच इनव्हेस्टर्सला वेगवेगळया करंसीमध्ये आपले पैसे गुंतवता येत असतात.
 • ह्या अँपला आत्तापर्यत 3.9 इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.ह्या अँपला आतापर्यत 10 मिलियनपेक्षा अधिक युझर्सने डाऊनलोड सुदधा केले आहे.