फिशिंग घोटाळा काय असतो? Phishing meaning in Marathi

Phishing meaning in Marathi

साधारण चार दिवसापुरवी SBI कडून सर्व ग्राहकांना  कळवल  गेल की SBI कडून फ्री गिफ्ट दिले जातं आहेत असे फसवे ईमेल व मेसेजेस येवू शकतात तरी ऑनलाइन फ्राड पासून सर्व ग्राहकांना नि अश्या मेसेज पासून सुरक्षित राहावं

आपल्यासाठी आणि आपल्या ऑनलाइन बँक किंवा सोशल मीडिया खात्यांसाठी फिशिंग घोटाळे खूप धोकादायक नाही तर आर्थिक प्रकारे मारक ठरू शकतात. आपल्याला ईमेल देणारे Google, याहू किंवा रेडिफ  सार्‍या सेवा देणार्‍या कंपन्या  फिशिंग घोटाळ्यांपासून ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यसाठी  सर्वोत्परी प्रयत्न करत असतात , आणि त्यामुळेच खर तर लोक ही थोड फसतात अश्या इतक्या सुरक्षेतून ईमेल आला की आपण सहज त्यावर विश्वास ठेवतो.

फिशिंग घोटाळा नेमका काय असतो , आपण कसे फसतो ?

फिशिंग घोटाळा म्हणजे एकादा ईमेल, SMS किंवा फोन कॉल जे आपल्याला एकाद्या वेबसाईट लिंक वर  क्लिक करण्यास प्रवृत्त करतात, भाग पाडतात ,  जेणेकरून आपण आपली गोपनीय माहिती उघड करू किंवा कॉम्प्युटर , मोबाइल व्हायरस असलेली एकादी फाइल डाउनलोड करू. सहसा फिशिंग घोटाळा शोधणे सोपे असते, परंतु काहीवेळा ते इतके खरे वाटतात की सहज आपण बळी पडतो.

फिशिंग हल्ल्यांचे प्रकार- Phishing meaning in Marathi

ईमेल फिशिंग: हा अगदी सर्वात सामान्य प्रकार जिथे आपण खरे भासणारे स्पॅम ईमेल मधील लिंक वर क्लिक करतो आणि आपली  गुप्त माहिती त्यात देतो आणि आपण फसविले जातो .

हॅकर्स स्वत:ची एकादी नकली कायदेशीर दिसेल अशी ओळख तयार करतात आणि मोठ्या प्रमाणात ग्राहकांना ईमेल पाठवतात. ह्यात सामान्यत: बँकेचा तपशील, क्रेडिट कार्ड नंबर, तुमचं PIN आयडी आणि कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटचा करता असणारा आयडी तसेच एकादी व्हारायस फाइल पाठवतात , उद्देश्य असतो तुमचे बँकेचे पासवर्ड मिळवून खात्यातून रक्कम काढून घेणे

See also  जिओ एअर फायबर म्हणजे काय?जिओ एअर फायबरची वैशिष्ट्य काय आहेत? Jio Airfiber

स्पियर फिशिंग: अश्या प्रकारच्या फिशिंग अटॅकमध्ये सहसा संस्था किंवा वैयक्तिक लोकांना टार्गेट , लक्ष्य केल जात. या पद्धतीत, फसवूणूक करणारे प्रथम संस्था किंवा वैयक्तिक लोकांची  संपूर्ण माहिती मिळवतात आणि नंतर त्यांना त्यांची गोपनीय माहिती मिळवन्या करता त्यांच्या ईमेल इनबॉक्समध्ये फसवे पण हुबेहूब खरे वाटणारे ईमेल पाठवतात

उदाहरणार्थ, हॅकर एकादा व्यवस्थापकच स्वता ईमेल देत आहेत असे भासवतात आणि कंपनीत वित्त विभागातील एखादा कामगाराला ईमेल देवून वैयक्तिक माहिती  मागवतात किंवा कंपनीच्या खात्यातून रक्कम दुसर्‍या खात्यात मोठी रक्कम टाकायला सांगतात , आता बॉस चा च ईमेल आहे अस समजून कर्मचारी बळी पडतात व आर्थिक फसवणूक होते

व्हेलिंगः व्हेलिंग हा प्रकार वरील स्पीयर सारखाच असतो ह्यात मुख्यात कंपनीचे प्रमुख पदावर काम करणारे  जसे मुख्य कार्यकारी अधिकारी, सीएफओ इ. अशा अधिकारीना एक ईमेल पाठविला जातो, ह्यात दवाब तंत्राचा वापर केला जातो ,जेणेकरून त्यांना विचार करण्यास जास्त वेळ मिळाला नाही, आणि ते फिशिंगला बळी पडतात

स्मिशिंगः या प्रकारच्या फिशिंग अटॅकमध्ये मोबाइल वर आपल्याला जे SMS येतात त्याचा फिशिंग अटॅक करता माध्यम म्हणून उपयोग केला जातो , आधी आपण जो  ईमेल फिशिंग प्रकार पाहिला तसच त्या  प्रमाणेच कार्य करतो .

ह्यात ग्राहकांना , लोकांना SMS करून त्यात काही नकली वेबसाइट लिंक्स  पाठवल्या जातात किंवा लोकांना फोन नंबर देवून त्यावर कॉल करण्यासाठी  सांगितलं जाते किंवा ईमेलचा पाठवून संपर्क करण्यास संगीतले जाते , त्यांनंतर लोकांची  त्यांची वैयक्तिक माहिती जसे ATM कार्ड , डेबिट कार्ड ,क्रेडिट कार्ड माहिती की बँकचे  तपशील, ग्राहकांना च आयडी / पासवर्ड देण्यास बळी पाडले जावून फसवणूक केली जाते

विशिंग: ह्यास व्हॉईस फिशिंग म्हणून ओळखलं जाते हा प्रकार सर्रास होताना दिसतो आहे , या प्रकारात ,  लोकांना येणारे कॉल एकाद्या विश्वसनीय माणसा कडून किंवा कंपनी कडून आला आहे अस भासवल जाते. ह्यात IVR तंत्र ज्ञान  वापर केला जातो त्यामुळे तपास संघटना न सुद्धा गुन्हेगार चा शोध लावणे कठीण जाते . ह्या प्रकारात मुख्यत क्रेडिट कार्ड चे माहिती शोधून काढण्यावर भर असतो.

See also  या २६५ हून अधिक शहरांमध्ये Airtel 5G, शहरांची संपूर्ण यादी । Airtel 5G Services Available Cities Names In Marathi

क्लोन फिशिंग: या प्रकारच्या फिशिंग घोट्याळात, गुन्हेगार विश्वसनीय कंपनी किंवा लोकांकडून दिले जाणारे ईमेल संदेशांची चु हुबेहूब नक्कल करतो आणि नंतर त्यात फसव्या लिंक जोडून मोठ्या प्रमाणावर लोकांना पाठवले जातात  आणि नंतर हे गुन्हेगार वाट पाहतात की कोण अश्या ईमेलमध्ये पाठविलेल्या लिंक वर करते आणि जे क्लिक करतात त्यंची माहिती ह्या सायबर गुन्हेगार कद पोहचते

.बनावट वेबसाइट आणि खर्याी वेबसाइट मधील फरक कसं ओळखवा -म्हत्वाचे खालील मुद्दे- Phishing meaning in Marathi

 • वेबसाइटची URL तपासा –  स्वत: चे संरक्षण करण्यासाठी  विश्वसनीय  वेबसाइट नेहमीच ऑनलाइन हल्ल्यापासून  जास्तीजास्त सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत असते म्हणून, जेव्हा आपण प्रथम वेबसाइट क्लिक करतो तेव्हा वेबसाइटची सुरूवात कुठल्या शब्दाने होते ते पहा जसे की  वेबसाइट https ने सुरवात झाली  असल्यास: // नंतर वेबसाइट सुरक्षित आहे कारण https: // s सुरक्षित दर्शवते, s हा सुरक्षित आहे दाखवतो
 • ह्याचा अर्थ की वेबसाइट ने  हॅकर्सपासून  स्वतच संरक्षण करण्यासाठी डेटा नेट पाठवण्या आधी एन्क्रिप्शन टेच्नोलोजी च वापर केलेला आहे , त्या उलट . वेबसाइट फक्त http:// वापरत असल्यास s नसल्यास वेबसाइट सुरक्षित असल्याची खात्री नाही , अश्या वेळी अश्या वेबसाइट्स सुरक्षित नसल्यामुळे त्यांना भेट देण्याचा टाळावे.
 • वेबसाइटच डोमेन नाव पहा: हकर्स सहसा एक वेबसाइट तयार करतात ,समजा ज्याचा पत्ता www.flipccart.com
 • /ऑर्डर_id = 137 सारख्या मोठ्या ब्रँड किंवा कंपन्यांची हुबेहूबे तोतया गिरी करतात आशयावेळी आपण अगदी निरखून पाहिले तर  लक्षात येईल की नकली  वेबसाइट आहे कारण Flipkart च नावच मुळात चुकीचे आहे, म्हणजेच ही तोतया , नकली वेबसाइट्स  असून आपली फसवणूक होवू शकते आता आपण अश्या बाबत सावधगिरी बाळगायाला हवी
 • वेबसाइट डिझाइन पहा: आपण लिंक वरुन एकादी वेबसाइट उघडल्यास साइट काशी डिझाइन केली ते पहा , हॅकर शक्य तितक हुबेहूब वेबसाइट तयार करण्याचा प्रयत्न करतात परंतु  काही ठिकाणी ते चुकतात आणि डिझाईन बारकाईने पाहिली तर चुका दिसून येतात,नकली साइट्स वर खर्यास साइट्स इतकी पेजेस नसतात , जेव्हा तुमला शंका येईल तेव्हा त्या साईट वरील बाकी पेजेस वर क्लिक करून पहा , जर फक्त लॉगिन पेज च दिसत असेल तर 100% ती नकली साईट आहे असे समजा
See also  सी अणि सी प्लस प्लस मधील फरक - Difference between c and c++ in Marathi

फिशिंग पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे – Phishing meaning in Marathi

 • फिशिंगपासून स्वत: चे रक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो कसा शोधायचा हे शिकणे.
 • नकली ईमेल कसा दिसतो हे आपल्याला माहिती असल्यास आपण त्यांच्या युक्त्यांचा बळी पडण्याची शक्यता खूप होते .
 • लक्षात घ्या आपल्या इनबॉक्समध्ये असे ईमेल मुळात येवू च नये म्हणून असे आज तरी कुठल तंत्रज्ञान उपलबद्ध नाही ,तस काही अतिशय महाग सू रक्षा फायरवॉल किंवा फिल्टर च वापर होतो परंतु त्याचा ही काही तितकसा उपयोग होत नाही
 • वर आपण पहिलं की , नागरिक फिशिंग घोटाळ्या मुळे कसे फसवले जावू शकतात , परंतु काही योग्य पावलं उचलले तर आपण ह्या हल्ल्या पासून वाचू शकतो:
 • फक्त आणि फक्त अधिकृत संकेत स्थळवरून माहिती किंवा फाइल्स डाउनलोड करा.
 • आपली खाजगी , गोपनीय माहिती आयडी पासवर्ड कधीही नकली वेब लिंक्स वर लिहू नका
 • वर लिहल तसे वेबसाइट वरील http किंवा https असा फरक पाहण्याची सवय लावा
 • आपल्याला आपल्या ओळखीतून ईमेल आला आणि आपल्याला थोड जारी संशय वाटत असेल तर ईमेल देणार्याुला आधी संपर्क करून ईमेल त्यांनी च दिला का पडताळणी करा
 • आपली खाजगी फोन नंबर, ,कुठ राहता ,अशी  वैयक्तिक माहिती ट्विटर , फेसबुक इनस्टा अश्या सोशल मीडिया साइट्स वर देण्या पासून दूर रहा.
 • रेल्वे, गार्डन मधील वायफाय किंवा फ्रि त मिळत म्हणून सार्वजनिक वायफाय वापरू नका
 • आपल्या कॉम्प्युटर लॅपटॉप मध्ये फायर वाल  वापरा तसेच प्रणाली किंवा ऑपरेटिंग सिस्टिम ल कायम अपडेट्स करत रहा


पुस्तके – फिशिंग