ट्विटर स्पेस म्हणजे काय ? Twitter Spaces Marathi Information

Twitter Spaces Marathi Information

ट्विटर स्पेसस

सोशल मीडिया च आज कधी नव्हे तो इतका प्रभाव आज जन सामन्या वर पडताना दिसत आहे Instagram,फेसबुक,यूट्यूब द्वारे ग्राहकांशी संवाद साधून मोठ्या प्रमाणावर उत्पादंनांची मार्केटिंग केली जाते तसेच, प्रभावशाली व्यक्तीकडून ग्राहकांशी संवाद साधला जातो

ट्विटर नवनवीन फीचर्स आणत आहेत.ट्विटर स्पेस हे ट्विटर वर लाइव्ह ऑडिओ द्वारे ट्विटर युजर्स शी संवाद साधण्याचा एक एक मार्ग आहे.यात आपण बोलू शकता आणि followers किंवा अनुयायी व प्रशंसक असतात ते आपण जे ऑडिओ संदेश द्वारे सांगत आहात ते एकत असतात

सोशल मीडिया द्वारे आपल्याला आपण ह्या आधी Instgram  मधून reels. स्टोरीज पाह्यला मिळत असे, फेसबुकवर फोरम, ग्रुप अशी फीचर असतात युट्यूब द्वारे विडियो पाहता येतात ,पण आता विडिओवर गप्पा मारणे , पाहणे आणि ऑडिओ क्लिप ऐकणे लोकांना आवडू लागले आहे.ह्याचा विचार करता ट्विटर ने ट्विटर स्पेस ची निर्मिती केली.

ट्विटर स्पेस म्हणजे काय ?- Twitter Spaces Marathi Information

ट्विटर स्पेस हे ट्विटर चे नवीन फीचर्स आहे,ज्यात आपण लाईव्ह ऑडिओ द्वारे आपल्या followers शी बोलून संवाद साधू शकतो आणि समजा जर आपल्याला दोनपेक्षा जास्त लोकांना लाईव्ह संवादात मध्ये सहभागी करून घ्यायचे  असल्यास,आपण तेही करू शकतो.जर तुमचे ट्विटर वरती 600 पेक्ष्या जास्त followers असतील,तरच तुम्ही ट्विटर स्पेस होस्ट करू शकता.तुम्ही ह्या नवीन फीचर्स द्वारे तुमचे followers देखील वाढवू शकता.ट्विटर सेप्स हे व्यावसायिक अकाउंट आणि वयक्तिक अकाउंट दोन्हीसाठी आहे.ट्विटर स्पेस मध्ये होस्ट आणि कोहोस्ट मिळून तेराजण एकावेळी लाइव्ह ऑडिओ करू शकतात.

ट्विटर स्पेस चा वापर का करायचा ?

 • आजकाल सर्व डिजिटल झाल्याबरोबर संभाषण ही डिजिटल झालंय.बदलत्या जगाबरोबर आपणही बदललो पाहिजे.
 • ट्विटर मध्ये तुम्ही एक ट्विट करता, तर त्या ट्विट ची मर्यादा 280 शब्दांची असते,परंतु तुम्ही ट्विटर स्पेस मध्ये तुम्हाला हवे तेवढे तुमचे मत मांडू शकता.
 • ट्विटर स्पेस हे व्यवसायासाठी देखील चांगले फिचर आहे.आपण या द्वारे आपल्या ऑनलाइन followers ना आपल्या प्रॉडक्ट विषयी माहिती देऊ शकतो आणि आपले ग्राहक वाढवू शकतो.

ट्विटर स्पेस कसे चालू करायचे ? Twitter Spaces Marathi Information

 • आता तुम्ही ट्विटर स्पेस फक्त अँड्रॉइड किंवा iOS वरती वापरू शकता.
 • होस्ट साठी ट्विटर स्पेस चालू करण्याचे दोन मार्ग आहेत.
 • Compose बटनवर क्लिक करून new space वरती क्लिक करा.नंतर तुम्हाला खूप सारे डायमंड सर्कल दिसतील.
 • तुमच्या टाइम लाइन मध्ये प्रोफाइल वरती वरच्या बाजूला इमेज वरती क्लिक करा आणि new space वरती क्लिक करा
 • तुम्ही तुमच्या followers शी कोणत्या विषयावर संवाद साधणार आहे,त्या विषयाशी संबंधित स्पेस ला एक चांगले नाव द्या.
 • तुम्ही ट्विटर स्पेस मध्ये इंटर केल्यानंतर ट्विटर तुमच्याकडून काही परवानगी मागेल.त्या तुम्ही ऑलॉ करा.
 • तुम्ही स्पेस होस्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या फोल्लोवेर ना इनवाईट करा.ट्विटर स्पेस मध्ये खालच्या उजव्या बाजूला ‛ more people to join’ ह्या पर्यायावरती क्लीक करून तुमच्या फोल्लोवेर ना ऍड करा.एका सेप्स होस्ट ला त्याच्या लाइव्ह ऑडिओ मध्ये तो ,कोहोस्ट आणि 10 अजून जण ऍड करता येतात.

तुम्ही जर होस्ट किंवा वक्ता असाल,तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

 • तुम्ही तुमच्या ऍड केलेल्या व्यक्तींना मॅनेज करू शकता.म्हणजे कुणाचा स्पीकर चालू ठेवायचा,कुणाचा स्पीकर बंद करायचा हे तुम्ही करू शकता.जर कोणी उलटसुलट बोलत असेल तर,तुम्ही त्याला ब्लॉक देखील करू शकता.
 • तुम्ही बोललेले महत्वाचे मुद्दे तुम्ही पिन देखील करू शकता.
 • तुम्ही जर स्पेस वरती श्रोता असाल,तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता.
 • ईमोजी द्वारे उत्तर देऊ शकता.
 • तुम्ही स्पेस मधील सभासदांना पर्सनल मेसेज करू शकता.
 • तुम्हाला जर बोलायचे असेल तर तुम्ही होस्ट ला बोलण्यासाठी विनंती करू शकता.

ट्विटर स्पेस चे फायदे खालीलप्रमाणे ;

 • ट्विटर स्पेस चा व्यावसायिकांना फायदा होतो, ते ट्विटर स्पेस च्या माध्यमातून आपले गिर्हाईक वाढवतात.
 • कंपनीची मोठी सूचना ट्विटर स्पेस च्या माध्यमातून देतात.
 • ट्विटर स्पेस च्या मदतीने तुम्ही तुमचे मत तुमच्या फोल्लोवेर समोर मांडू शकता आणीत त्यांचा पाठिंबा मिळवू शकता.

ट्विटर सेप्स मध्ये भविष्यात नवनवीन चांगले फीचर्स येतील.ट्विटर स्पेस हे संवाद साधण्यासाठी चांगले ऑनलाइन साधन आहे.जिथे तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही,तुम्ही तुमच्या मोबाईल वरती घरी किंवा ऑफिस मध्ये बसुन तुमचे मत किंवा तुमच्या प्रोडक्ट चे मार्केटिंग करू शकता.


SIP KNOWLEDGE

Leave a Comment