गगनयान सोबत झेप घेणारी प्रथम महिला रोबोट व्योममित्रा – Vyommitra Space Friend in Gaganyaan
चंद्रयान ३ मधील यशानंतर आता भारताने एक नवीन मोहीम हाती घेतली आहे जिचे नाव गगनयान मोहीम असे आहे.
इस्रोच्या ह्या नवीन मोहिमेमध्ये एका महिला रोबोटला अंतराळात पाठविले जाणार असल्याची माहिती विज्ञान अणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
ह्या गगनयान मोहीमेत अंतराळयानामध्ये व्योममित्रा नावाच्या एका महिला रोबोटला अंतराळात पाठविले जाईल.
व्योममित्रा काय आहे?
व्योममित्रा ही एक हयुमनाॅईड रोबोट आहे जिची निर्मिती भारतातील अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गगनयान ह्या अभियानासाठी केली आहे.
हयुमनाॅईड रोबोट म्हणजे काय?
- हयुमनाॅईड रोबोट म्हणजे मानसासारखे कार्य करणारा रोबोट.
- हया रोबोटची निर्मिती आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या साहाय्याने करण्यात आली आहे.म्हणजे यात बुदधीयांक असेल ज्याच्यामुळे ह्या महिला रोबोटला अंतराळ यानातील कंट्रोल पॅनल रीड तसेच कंट्रोल करता येऊ शकते.
- एवढेच नाही तर हा रोबोट कंट्रोल रूमशी संपर्क देखील साधू शकणार आहे.
- हयुमनाॅईड रोबोट म्हणजे ही महिला मानवी अंतराळ वीरांप्रमाणे सर्व कार्य हालचाली करू शकणार आहे.
- ही महिला हयुमनाॅईड रोबोट अंतराळ यानातील कंट्रोल पॅनलची रीडींग करू शकते.इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत मुख्य केंद्रामध्ये संपर्क देखील साधु शकते.
- एवढेच नव्हे तर ही महिला रोबोट राॅकेटचा धक्का देखील सहन करू शकते असे इनर्शिअल सिस्टम युनिटचे संचालक सॅम दयाल यांनी सांगितले आहे
सॅम दयाल यांनी हे देखील सांगितले आहे की ह्या महिला हयुमनाॅईड रोबोटच्या डिझाईन अणि एकीकरणाचे काम झालेले आहे.
फक्त ह्या हयुमनाॅईड रोबोटला पाय वगैरे नसतील.
इस्रोच्या शास्त्रज्ञांकडुन इनर्शिअल सिस्टम युनिट मध्ये २०२० दरम्यान ह्या हयुमनाॅईड रोबोटची टेस्टिंग करण्यात आली होती.
इस्रोच्या इनर्शिअल सिस्टम युनिट मध्ये ह्या हयुमनाॅईड रोबोट मध्ये यांत्रिक मेंदु बसवला गेला असल्याचे सांगितले जात आहे.
गगनयान मिशनच्या ट्रायल दरम्यान ह्या महिला रोबोटला अंतराळात पाठविले जाणार आहे.हे भारताचे पहिले मिशन असेल ज्यात अंतराळात मानवाला पाठवले जाणार आहे.
हे मिशन एकुण तीन टप्प्यांत पार पडेल पहिल्या दोन टप्प्यांत मानवास अंतराळयानाने पाठविले जाणार नाही तिसरया टप्प्यात सर्व शहानिशा झाल्यानंतर तीन अंतराळ प्रवासींना अंतराळात पाठविले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात रिकामे यान पाठविले जाईल मग दुसरया टप्प्यात महिला रोबोटला अंतराळात पाठविले जाणार आहे यानंतर तिसरया टप्प्यात तीन अंतराळ प्रवासींना अंतराळात पाठविले जाणार आहे.
व्योममित्राचे वैशिष्ट्य काय आहे?
- व्योममित्रा ही महिला रोबोट मानवासारखे विविध कार्य हालचाली करू शकते.
- ह्या महिला रोबोटच्या चेहरयावर आपणास एकदम मानसासारखे हावभाव पाहावयास मिळतात.
- व्योममित्रा ह्या महिला हयुमनाॅईड रोबोटला जगातील बेस्ट स्पेस हयुमनाॅईड रोबोट म्हणून सन्मानित देखील करण्यात आले आहे.
- व्योममित्रा ही महिला रोबोट अंतराळ यानातील क्रू मॉड्यूल वाचेल आणि मानवांंप्रमाणे आवश्यक सूचना समजुन घेईल.ग्राऊंड स्टेशन मध्ये बसलेल्या वैज्ञानिकांशी संपर्क देखील साधेल