आदित्य मिशन कधी लाँच करण्यात येईल ? किती दिवसांचे आहे? किती खर्च ? Aditya-L1 mission

आदित्य मिशन कधी लाॅच करण्यात येईल?आदित्य मिशन किती दिवसांचे आहे?आदित्य मिशनकरीता किती खर्च येईल?

संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेली असलेले आदित्य एल वन मिशन २ सप्टेंबर २०२३ रोजी लाॅच करण्यात येणार आहे.

चंद्रयान ३ मिशन मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा विक्रम नोंदविल्या नंतर भारत देश आता आदित्य एल वन मिशन दवारे सुर्यावर जाण्याच्या तयारीला लागले आहे.

२ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर मधुन ह्या मिशनला प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

आदित्य एल वन ह्या मिशनकरीता इस्रोने एकुण बजेट ३७८ कोटी इतके ठेवले आहे.

  • आदित्य यानाचे प्रक्षेपण पीएस एलव्ही ह्या राॅकेटच्या साहाय्याने करण्यात येणार आहे.हे मिशन पुर्णपणे भारतातील शास्त्रज्ञांचे असणार आहे.
  • बंगळुरू मध्ये असलेल्या Indian institute of astrophysics दवारे आदित्य एल वन ह्या यानातील व्हीई एलसी visible line emission पेलोड डिझाईनचे स्ट्क्चर तयार केले आहे.
  • पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणण्याची ही भारताची पाचवी मोहीम असेल.याआधी सर्वप्रथम भारताच्या इस्रो हा अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान १ हे मिशन २२ आॅक्टोंबर २००८ रोजी राबविण्यात आली होती.
  • यानंतर २०१३ दरम्यान मार्स आॅबिटर मिशन नावाची मोहीम राबविण्यात आली होतो.
  • मग २२ जुलै २०१९ मध्ये चंद्रयान २ हे मिशन राबविण्यात आले.यानंतर आता २०२३ मध्ये १४ जुलै रोजी चंद्रयान ३ यान प्रक्षेपित करण्यात आले.आता लवकरच २ सप्टेंबर २०२३ रोजी आदित्य एल हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

आदित्य एल वन मिशन मध्ये एकुण सात पेलोड असणार आहेत.यातील चार पेलोड हे सुर्याला केंद्रीत असतील.हया चार पेलोडच्या साहाय्याने सुर्यामधून बाहेर पडत असलेल्या किरणांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

अणि उर्वरीत तीन पेलोडच्या साहाय्याने एल वन कक्षेचा अभ्यास करण्यासाठी वापर केला जाईल.ज्यामुळे शास्त्रज्ञांना सुर्याचे फोटो स्फिअर,क्रोमो स्फिअर अणि कोरोना यांचे अध्ययन करता येणार आहे.

See also  जिओ एअर फायबर म्हणजे काय?जिओ एअर फायबरची वैशिष्ट्य काय आहेत? Jio Airfiber

ह्या मिशन मध्ये आदित्य यानाला एल वन पाॅईट मध्ये स्थापित करण्यात येणार आहे.म्हणजेच सुर्य अणि पृथ्वी प्रणाली मधील पहिला लॅगरेजियन पाॅईट.

आदित्य मिशन कधी लाँच  करण्यात येईल
आदित्य मिशन कधी लाँच करण्यात येईल

जेणेकरून सुर्याचा अभ्यास करत असताना सुर्य ग्रहणामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.

ह्या आदित्य मिशन मध्ये आदित्य यान हे १२७ दिवसांच्या कालावधीमध्ये १.५ दशलक्ष एवढे अंतर असलेला प्रवास करताना दिसुन येईल.

आदित्य मिशन ही आपल्या भारताची पहिली सुर्य मोहीम असणार आहे.आदीत्य एल वन मिशन मध्ये एकुण सहा पेलोड वापरण्यात येणार आहे यातील सहा पेलोड इस्रो मधील शास्त्रज्ञांनी तयार केले आहे.

आदित्य एल वन मिशनमुळे काय फायदा होईल?

आदित्य एल वन मिशन दवारे भारतातील शास्त्रज्ञांदवारे सुर्यमालेतील वरील भागाचे अध्ययन केले जाणार आहे.

याचसोबत सुर्याच्या आतील हालचाली सौर क्रियाकलापांचा पृथ्वीवर होणारा परिणाम,हवामानातील इतर बदल इत्यादींचा देखील अभ्यास करता येणार आहे.

आतापर्यंत भारताने किती सुर्यमोहीमा पार पडल्या आहेत?

आतापर्यंत युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेने तसेच अमेरिका जर्मनीने २२ सुर्यमोहीमा पार पाडल्या आहेत.

पण भारताची ही पहिली सुर्यमोहीम असणार आहे जी भारत स्वताच्या बळावर पार पाडणार आहे.