जिओ एअर फायबर म्हणजे काय?जिओ एअर फायबरची वैशिष्ट्य काय आहेत? Jio Airfiber

जिओ एअर फायबर म्हणजे काय?जिओ एअर फायबरची वैशिष्ट्य काय आहेत?Jio Airfiber in Marathi

आता लवकरच १९ सप्टेंबर २०२३ पासुन गणेश चतुर्थी पासुन जीओ एअर फायबर हा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीच्या सोमवारी झालेल्या ४६ व्या एजीएम (annual general meeting) मध्ये ह्या जिओ एअर फायबरला लाॅच करण्यात येत आहे.

जिओ एअर फायबर म्हणजे काय

सुमारे २० कोटी पेक्षा जास्त घरांमध्ये आपले हे डिव्हाईस पोहचवण्याचे ध्येय कंपनीने डोळ्यासमोर ठेवले आहे.त्यामुळे दररोज १.५ कनेक्शन घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनीच्या एका वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबद स्पष्टीकरण देताना सांगितले होते की आज जवळपास एक कोटी भारतीय जनता जिओ फायबर सोबत कनेक्टेड झाली आहेत.

परंतु अद्यापही रिलायन्स कंपनीला लाखो घरात वायरलेस कनेक्टिव्हिटी देता आली नव्हती.

Jio Airfiber
Jio Airfiber

हया समस्येला दूर करण्याचे काम जिओ एअर फायबर करेल ज्याचे परिणाम स्वरूप रिलायन्स कंपनीला २० कोटीपेक्षा अधिक घरांमध्ये पोहचता येणार आहे.

जिओ एअर फायबर हा एक फायबर केबलची आवश्यकता नसणारा वायरलेस पदधतीचा प्लग अणि प्ले असा फाईव्ह जी हाॅटस्पाॅट असणार आहे.

आपण आपल्या घरात तसेच कामावर म्हणजेच आपल्या आॅफिसमध्ये असताना देखील आपल्या नाॅन फाईव्ह जी डिव्हाईसवर देखील ह्या पर्सनल वायफाय हाॅटस्पाॅटच्या माध्यमातून हाय स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकतो.

ह्या डिव्हाईस मध्ये एकुण दोन युनिट आहे ज्यातील एक युनिट आॅफिसच्या छतावर अणि दुसरे घरातील भिंतीवरील इलेक्ट्रीसिटी साॅकेट मध्ये बसवता येईल.

एअर फायबर हे एक प्रकारचे अल्ट्रा हायस्पीड फाईव्ह जी हाॅटस्पाॅट डिव्हाईस आहे.जे आपणास घर अणि आॅफिस ह्या दोघे ठिकाणी वायरलेस फायबर फाईव्ह जी गती प्रदान करते.

मागील वर्षी जिओ एअर फायबर हा प्रोडक्ट लाॅच केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा करून देखील बाजारात हा प्रोडक्ट विक्रीसाठी अद्याप उपलब्ध झालेला नव्हता.

See also  जिमेल -डिलीट झालेले महत्वाचे ईमेल कसे रिकव्हर करावे?- How To Recover Deleted Email In Gmail

पण नुकतीच मुकेश अंबानी यांनी केलेल्या एका अधिकृत घोषणेत हा प्रोडक्ट १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी लाॅच करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

जिओ एअर फायबर ही एक प्रकारची वायरलेस इंटरनेट सेवा आहे ज्यात इंटरनेटचा वापर करण्यासाठी आपणास वायरची आवश्यकता नसते.

जिओ फायबर मध्ये फाईव्ह जी अॅटिना वापरला जाईल.यामुळे वापरकर्त्याना फास्ट इंटरनेट सर्व्हिस प्राप्त होईल.यात वापरकर्त्याना १ गेगा बाईट पर सेकंद पर्यंत फास्ट कनेक्टिव्हिटी प्राप्त होते.

घरामध्ये इंटरनेट सुरू करण्यासाठी ह्या संसाधनास आपणास आपल्या घराच्या भिंतीवर दिलेल्या इलेक्ट्रीसिटी साॅकेट मध्ये प्लग इन करावे लागते ही वायरलेस इंटरनेट सेवा आपणास प्लग इन प्ले अनुभवासह प्राप्त होईल.

जिओ एअर फायबरमुळे भारताला वेगवान इंटरनेट कनेक्शन सेवा प्राप्त होईल.एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व घरांमध्ये हाय स्पीड फाईव्ह जी वायफाय पोहोचण्यास मदत होणार आहे.

जिओ कडुन ह्या प्लॅनला इतर कंपन्यांच्या तुलनेत साधारणत २० टक्के इतक्या कमी किंमतीत लाॅच करण्यात येणार आहे