भारताचा ग्रॅड मास्टर प्रज्ञानंदच्या – Praggnanandhaa awards list
जागतिक बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये प्रज्ञानंद ह्याने अमेरिका ह्या देशाच्या फॅबिआनो कारोआना याला पराभुत करत फायनल मध्ये प्रवेश केला होता.
पण बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा २०२३ मधील अंतिम सामन्यात प्रज्ञानंद याला विश्व चॅम्पियन मॅगनस कार्लसन याने पराभुत करत बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
प्रज्ञानंद हा आपल्या भारत देशातील एक अत्यंत प्रसिद्ध बुद्धीबळ खेळाडु आहे.प्रज्ञानंद हयाने अत्यंत कमी वयामध्ये अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदविले आहेत.सध्या त्याचे वय १८ वर्षे इतके आहे.
प्रज्ञानंद हा फक्त ६ वर्षाचा होता तेव्हा त्याने बुद्धीबळ खेळायला सुरुवात केली होती.आठव्या वर्षी तो आपल्या खेळीमुळे तो सर्वांच्या नजरेत आला होता.
प्रज्ञानंद ह्याने जागतिक युवा चॅम्पियन शीप अंडर आठ जिंकुन सर्वप्रथम सर्व जगभरात भारताचे नाव मोठे केले.
सध्या तो बुदधीबळ खेळात जागतिक पातळीवर २९ व्या स्थानावर आहे.
भारताचा ग्रॅड मास्टर प्रज्ञानंद याला बुद्धीबळ हा खेळ खेळण्याची प्रेरणा त्याच्या बहिण वैशाली पासुन मिळाली.वैशाली ही २०१८ मध्ये बुद्धीबळ ह्या खेळात महिला ग्रँड मास्टर बनली होती.
पुढे २०२१ मध्ये वैशाली आंतरराष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियन देखील बनली होती.
आजच्या लेखात आपण प्रज्ञानंद ह्याने प्राप्त केलेले आतापर्यंतचे सर्व पुरस्कार अणि त्याने नोंदवलेल्या रेकाॅड विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
भारताचा ग्रॅड मास्टर प्रज्ञानंद याने आतापर्यंत त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत १७८९ एवढे सामने खेळले आहेत ज्यापैकी ८९४ सामने जिंकण्यात प्रज्ञानंदला यश प्राप्त झाले.
प्रज्ञावंत याने खेळलेल्या सामन्यांपैकी आतापर्यंत ५०४ सामने अनिर्णित राहीले आहेत.अणि ३९१ सामन्यात त्याला पराभवाचा सामना देखील करावा लागला आहे.
प्रज्ञानंद ह्याने आतापर्यंत नोंदविलेले विश्वविक्रम –
- भारताचा युवा ग्रँड मास्टर प्रज्ञानंद याने जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियन शीप मध्ये आठ वर्षांखालील विजेतेपद पटकावले होते.
- यानंतर प्रज्ञानंद याला फिडे मास्टर ही पदवी बहाल करण्यात आली होती.
- प्रज्ञानंद ह्याने २०१५ मध्ये १० वर्षांखालील बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद देखील प्राप्त केले होते.
- प्रज्ञानंद ह्याने २०१६ साली आंतरराष्ट्रीय तरुण बुद्धिबळ मास्टर हा किताब जिंकला.तेव्हा त्याचे वय १० वर्ष १० महिने १९ दिवस इतके होते.
- २०१७ मध्ये भारताचा ग्रॅड मास्टर प्रज्ञानंद याने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत देखील आपला सहभाग नोंदविला होता ज्यात त्याने पहिला ग्रँड मास्टर किताब जिंकण्यात यश प्राप्त केले.
- यानंतर त्याने २०१८ मधील झालेल्या ग्रँड मास्टर स्पर्धेत दुसरे स्थान प्राप्त केले ह्या स्पर्धेचे नाव हेरा क्लिओन फिशर मेमोरिअल जिएम नाॅन असे होते.
- यात त्याने दुसरा युवा ग्रँड मास्टर बनण्याचा बहुमान प्राप्त केला.त्यावेळी त्याचे वय १२ वर्ष १० महिने १३ दिवस इतके होते.
- २०१९ मध्ये प्रज्ञानंदने अॅसट्रोकाॅन बुदधीबळ ओपन जिंकण्यात यश प्राप्त केले.याचसोबत १८ वर्षांखालील विश्व युवा चॅम्पियन शीप देखील त्याने जिंकली होती.
- २०२२ मधील वल्ड चेस चॅम्पियन शीप मध्ये देखील त्याने विश्वविजेत्या मॅगनस कार्लसन याला पराभुत केले होते.
विश्वनाथन आनंद नंतर बुदधीबळ विश्वचषक फायनल मध्ये जाणारा भारताचा दुसरा खेळाडु बनला आहे.
प्रज्ञानंदला प्राप्त झालेले पुरस्कार –
प्रज्ञानंदला आतापर्यंत खेळ जगतातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.
प्रज्ञानंद याला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते खेळ जगतातील सर्वोच्च पुरस्कार अर्जुन पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे.
प्रज्ञानंद विषयी इतर महत्वाच्या बाबी –
१० आॅगस्ट २००५ मध्ये भारत देशातील चेन्नई शहरात प्रज्ञानंद याचा जन्म झाला.मोठया बहिणीला बुदधीबळ खेळताना बघुन प्रज्ञानंद देखील बुदधीबळ खेळु लागला.
फक्त सात वर्षांचा असताना त्याने फिडे मानांकन जिंकण्यात यश प्राप्त केले