पर्सनल क्लाउड स्टोरेज म्हणजे काय ? Personal Cloud Storage Marathi information

पर्सनल क्लाउड स्टोरेज – Personal Cloud Storage Marathi information

आज आपण डेटा स्टोअर करण्यासाठी नेहमी काहीतरी साधन तसेच माध्यम पाहत असतो.सगळयात पहिले आपण फ्लाँपी डिस्क,सीडी,डीव्हीडी,प्लँश ड्राईव्ह,पेन ड्राईव्ह तसेच एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह इत्यादी साधनांचा वापर डेटा स्टोअर करण्यासाठी करत होतो.

पण यात आपल्याला जेवढया स्पेसची आवश्यकता होती तेवढा स्पेस प्राप्त होत नव्हता.यासाठी आपण क्लाऊड स्टोरेज ह्या नवीन टेक्नाँलाँजीचा वापर करणे सुरू केले.

ज्यात आपण आपल्या डेटाला मेनटेन,मँनेज करू शकतो.तसेच त्याचा बँक अप देखील आपण घेऊ शकतो.

आज क्लाउड स्टोरेज टेक्नाँलाँजीमुळे आपल्याला आपल्या महत्वाच्या फाईल,डाँक्युमेंट आँनलाईन स्टोअर करणे एकदम सोपे झाले आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच क्लाऊड स्टोरेज विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Cloud Storage म्हणजे काय?

क्लाऊड स्टोरेज ही एक अशी डिजीटल आँनलाईन स्टोरेज सर्विस आहे जिचा वापर करून आपण आपला इम्पाँर्टंट तसेच काँन्फिडेंशल डेटा एखाद्या सर्वरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो.

याचा फायदा आपल्याला असा होत असतो की जेव्हा आपल्याला त्या डेटाची गरज असेल तेव्हा आपण सर्वरमधुन तो डेटा कलेक्ट करू शकतो.

म्हणजे आपण आपल्या डेटाचा एक बँक अप यात ठेवू शकतो.आणि आपल्याला हवा तेव्हा तो डेटा जगातील कुठल्याही ठिकाणी असुन देखील अँक्सेस देखील करता येत असतो.

Cloud Storage चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

क्लाऊड स्टोरेजचे एकुण चार प्रमुख प्रकार आहेत आणि ते चार प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

 1) Personal Cloud Storage :

2) Public Cloud Storage :

3) Private Cloud Storage :

4) Hybrid Cloud Storage :

1) Personal Cloud Storage :

 पर्सनल क्लाऊड स्टोरेजला आपण मोबाईल क्लाऊड स्टोरेज असे देखील म्हणत असतो.कारण मोबाईलमध्ये जसा आपला पर्सनल डेटा स्टोअर केलेला असतो जो आपण कोणाशी शेअर करत नाही.यात देखील तसाच पर्सनल काँन्फिडेंशल डेटा असतो.

See also  मराठी ब्लॉगिंग म्हणजे काय -5 Best reasons to start marathi blogging

यात आपल्याला सिंक सुविधा देखील प्राप्त होत असते.जिचा वापर करून आपण आपला डेटा आपल्यासोबत आपल्या मोबाईल मध्ये ठेवू शकतो.

Personal Cloud Storage ची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत: Personal Cloud Storage Marathi information

  • Drop Box
  • p Cloud
  • Google Drive
  • Mega Box
  • Sync               
  • Yandex Disk
  • Jump-share
  • I Cloud
  • I Drive
  • Microsoft One Drive
  • Amazon Drive

आपण आपले पर्सनल क्लाऊड स्टोरेज का तयार करायला हवे?

आपल्याकडे आपल्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित आज अशी अनेक अत्यंत महत्वाची कागदपत्रे असतात.आणि ही महत्वाची कागदपत्रे प्रत्येक वेळेला सोबत घेऊन आपल्याला फिरता येत नसते कारण ही महत्वाची कागदपत्रे आपल्याकडुन कुठेतरी हरवून जातील अशी भीती आपल्या मनात नेहमी असते.पण ही कागदपत्रे आपल्याला नेहमी लागत असतात.

याचसाठी आपण ही महत्वाची कागदपत्रे इमरजन्सीसाठी आपल्या मोबाईल तसेच लँपटाँपमध्ये स्टोअर करून ठेवत असतो.

पण समजा आपला मोबाईल लँपटाँप आपल्याकडून चुकून पाण्यात पडला किंवा हातातुन खाली पडल्याने फुटला तर ते एक हार्डवेअर डिव्हाईस असल्याने त्यातील डेटा लाँस होण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत आपण आपला पर्सनल इंपाँर्टंट डेटा कायमचा गमावून बसु शकतो

यासाठी आपण बँक अपसाठी आपले एक पर्सनल क्लाऊड स्टोरोज तयार करून ठेवायला हवे.जिथुन आपण पाहिजे तेव्हा आपला डेटा मिळवू शकतो.हाच डेटा नंतर आपण आपल्या पर्सनल कंप्युटरमध्ये इंपोर्ट पण करू शकतो.

म्हणुन आपण आपले स्वताचे एक पर्सनल क्लाऊड स्टोरोज तयार करून ठेवायलाच हवे.

 2) Public Cloud Storage :

 पब्लिक क्लाऊड स्टोरेज ला पब्लिक क्लाऊड स्टोरेजच्या सर्विस प्रोव्हाईडरद्वारे मँनेज केले जात असते.

ह्या क्लाऊड स्टोरेजमध्ये अशा लोकांचा डेटा स्टोअर केला जातो जे मोठमोठे उद्योगपती आहे,मोठमोठया इंटरप्राईज,कंपन्यांचा डेटा यात स्टोअर केला जात असतो.म्हणजेच इथे सर्वसामान्य व्यक्तींचा डेटा स्टोअर केला जात नसतो.

3) Private Cloud Storage :

ह्या क्लाऊड स्टोरेजमध्ये इंटरप्राईज तसेच क्लाऊड स्टोरेजची सेवा प्रदान करणारा सर्विस प्रोव्हाईडर हे दोघे एकमेकांसोबत इंटिग्रेट होत असतात.

See also  आपल्या कुटुंबाची (स्त्रिया अणि मुली) सुरक्षा करता - 5 Best android apps for safety of womens Marathi

आणि ह्या सर्विस प्रोव्हाईडर इंटरप्राईजेस डेटा सेंटरमधुन एकमेकांसोबत इंटिग्रेट होत असतात.

प्रायव्हेट क्लाऊड स्टोरेजचा वापर करून आपण सिक्युरीटी संबंधित असलेली कोणतीही अडचण,समस्या अडथळयांना देखील दुर करू शकतो.

4) Hybrid Cloud Storage :

Hybrid Cloud Storage हे Private Cloud Storage आणि Public Cloud Storage या दोघांचे काँबिनेशन असते ज्यामध्ये आपल्याला आपला डेटा काही महत्वाचा डेटा हा इंटरप्रायजेसच्या प्रायव्हेट क्लाऊडमध्ये असलेला दिसुन येतो.

तर दुसरीकडे आपल्याला हे देखील पाहायला मिळते की पब्लिक क्लाऊड स्टोरेजची मदत घेऊन आपण आपला इतर डेटाला स्टोअर करू शकतो एवढेच नाही तर त्याला अँक्सेस देखील करू शकतो.

Cloud Storage चे फायदे कोणकोणते असतात?

क्लाऊड स्टोरेजचे आपल्याला अनेक फायदे होत असतात.

  • आज अनेक क्लाऊड सर्विसेसमध्ये आपल्याला डेस्क टाँपची देखील सर्विस दिली जाते जिचा वापर करून आपण कोणतीही फाईल ड्रँग अँण्ड ड्राँप करू शकतो.
  • आपण एका वेब लिंकद्वारे अनेक जणांना एकत्र मेल पाठवु शकतो यात आपल्याला प्रत्येकाला पर्सनली मेल पाठवण्याची गरज पडताना दिसुन येत नाही.
  • जगातील कुठल्याही ठिकाणाहुन आपण आपल्या सर्वर मध्ये स्टोअर केलेल्या डेटाला आँनलाईन अँक्सेस करू शकतो.
  • क्लाऊड स्टोरेजचा वापर करून आपण आपल्या डेटाचा इमरजन्सीसाठी बँक अप ठेवू शकतो.जेणेकरून अकस्मातपणे जर तो आपल्याकडुन डिलीट झाला तर आपण तो क्लाऊड स्टोरेजद्वारे सर्वरमधुन पुन्हा प्राप्त करू शकतो.

Cloud Storage मुळे होणारे नुकसान कोणकोणते आहेत?

क्लाऊड स्टोरेजचे जसे आपल्याला फायदे पाहावयास मिळतात त्याचप्रमाणे त्याचे काही तोटे देखील अनुभवायास मिळत असतात.

क्लाऊड स्टोरेजमुळे होणारे नुकसान पुढीलप्रमाणे आहेत :

  • क्लाऊड स्टोरेजद्वारे आपण डेस्क टाँपची सर्विस युझ करून कोणतीही फाईल ड्रँग अँण्ड ड्राँप तर करू शकतो पण याने आपली फाईल पुर्णपणे क्लाऊड स्टोरेज फोल्डरमध्ये चालली जाते.याने आपल्या कंप्युटरमध्ये त्या फाईलची तसेच डाँक्युमेंटची कोणतीही काँपी राहत नसते.म्हणुन आपण कोणतीही फाईल तसेच डाँक्युमेंट ड्रँग ड्राँप न करता काँपी पेस्ट करणे अधिक चांगले राहते.याने आपला डेटा दोघे ठिकाणी स्टोअर असल्याने आपल्याला कोणतीही अडचण येत नसते.
  • क्लाऊड स्टोरेज द्वारे आँनलाईन डेटा अँक्सेस करण्यासाठी आपल्याला इंटरनेट हे लागतच असते.आणि समजा आपण जिथे सध्या उपस्थित आहे तिथे इंटनेट सुविधा उपलब्ध नसेल तर आपल्याला इमरजन्सी मध्ये डेटा अँक्सेस करण्यास प्राँब्लेम येऊ शकतो.
  • क्लाऊड स्टोरेज सर्विसमध्ये आपल्याला सगळयात मोठी हानी असते डेटा सिक्युरीटीची.कारण आपला डेटा इथे थर्ड पार्टीकडे जात असतो.ज्याचा ते गैरवापर देखील करण्याची दाट शक्यता असते.म्हणुन आपण कोणतीही क्लाऊड स्टोरेज सर्विस घेण्याअगोदर त्यांचे नियम काय आहेत अटी कोणकोणत्या आहेत?प्रायव्हेसी पाँलिसी काय आहे हे जाणुन घ्यायला हवे.मगच ती सर्विस आपण घ्यायला हवी.
See also  YouTube Premium विषयी माहीती - YouTube Premium Information In Marathi

Cloud Storage साठी कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला Requirement असते?

Cloud Storage Service मध्ये आपला डेटा स्टोअर करताना आपण खालील गोष्टी पाहणे गरजेचे असते :

1) Data Avability :

2) Data Security :

1) Data Avability :

आपला डेटा क्लाऊड स्टोरोज मध्ये स्टोअर करताना आपण हे बघायला हवे की इथे डेटा स्टोअर केल्यानंतर आपला डेटा पाहिजे तेव्हा आपल्याला प्राप्त होऊ शकतो का?म्हणजेच आपण डेटाची उपलब्धता आधी जाणुन घ्यायला हवी.

2) Data Security : आपला डेटा सिक्युअर आहे का?तो तो व्यवस्थित इनक्रिप्ट केला जातो आहे का

हे देखील आपण पाहायला हवे.आपला डेटा सुरक्षित आहे का याची खात्री करून घ्यायला हवी.

यासाठी डेटा आँथरायझेशन मध्ये जाऊन आपण चेक करू शकतो की आपला डेटा तसेच इन्फर्मेशन कोण कोण अँक्सेस करू शकते.

थोडक्यात Data Authentication, Data Encryption, Data Authorization ह्या तीन गोष्टी आपण कुठल्याही क्लाऊड स्टोरेजमध्ये आपला डेटा स्टोअर करण्याअगोदर पाहणे गरजेचे आहे.