२०२३ मध्ये रक्षाबंधन कधी आहे?राखी बांधण्याची शुभ वेळ काय असेल?rakshabandhan 2023 dates,Shubh muhurt
रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या अतुट अणि प्रेमळ नात्याचा दिवस आहे.हया दिवशी बहिण भावाला राखी बांधते अणि भावाकडुन आपल्या रक्षणाचे वचन घेते.
रक्षाबंधन हा आपल्या हिंदु धर्मातील अत्यंत महत्वाच्या सण उत्सवांपैकी एक मानला जातो.म्हणुन संपुर्ण भारतात हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो.
दरवर्षी रक्षाबंधनाच्या तारखेत हिंदु कॅलेंडर नुसार बदल होत असतो.श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीस हा पवित्र दिवस साजरा केला जातो.
ह्या वर्षी २०२३ मध्ये रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त तब्बल दोन दिवसांचा असणार आहे.
३० आॅगस्ट २०२३ रोजी रात्री ९ वाजुन एक मिनिट झाल्यावर हा राखीचा सण साजरा केला जाणार आहे.अणि ३१ आॅगस्ट पर्यंत हा सण साजरा करण्यात येईल.
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीला आपल्या भावाला शुभ वेळेत राखी बांधण्याची इच्छा असते जेणेकरून तिच्या भावावर कुठलेही संकट येत नाही.
अनेक बहिणींच्या मनात संशय आहे की राखी बांधण्याची शुभ वेळ अणि तारीख नेमकी काय आहे?
पौर्णिमा तिथीस ३० आॅगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजुन ४५ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे.अणि ह्याच दिवशी भद्रास ११ वाजेपासून प्रारंभ होणार आहे.
३० आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजुन ५८ मिनिटांनी भद्रा काळ सुरू होईल.रात्री ९ वाजुन १ मिनिटांनी हा भद्रा संपुष्टात येणार आहे.
भद्रा काळात राखी बांधणे हे अत्यंत अशुभ मानले जाते.हया काळात केलेल्या शुभ कार्याचे फळ आपणास प्राप्त होत नाही म्हणुन भद्रा काळात कोणतीही बहिण आपल्या भावाला राखी बांधत नसते.
पौर्णिमा तिथी ३१ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी संपुष्टात येईल.त्याचमुळे सुर्योदय पौर्णिमा शुभ मानण्यात येईल.
म्हणजे ३० आॅगस्ट रात्री ९ वाजुन २ मिनिट झाल्यापासून ते ३१ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजेपर्यंत तसेच पुर्ण दिवसभर बहिणी आपल्या भावाला राखी बांधु शकतील.
३१ आॅगस्ट २०२३ रोजी सर्व बहिणी आपल्या भावाला राखी बांधु शकणार आहेत.
दरवर्षी श्रावन पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो?
एका पौराणिक कथेत सांगितले आहे की महाभारत सुरू असताना शिशुपाल याचा वध करण्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांचा एका हाताचा बोट कापला गेला होता.
तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीच्या पदराचा तुकडा फाडला अणि भगवान श्रीकृष्ण यांच्या जखम झालेल्या बोटावर बांधला होता.
तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला एक वचन दिले की ते नेहमी तिचे रक्षण करतील.ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.
तेव्हापासून दरवर्षी श्रावन पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.