भद्राकाळ म्हणजे काय?भद्राकाळात बहिणीने भावाला राखी का बांधु नये?भद्राकाळात राखी बांधणे अशुभ का मानले जाते?
पुराणात भद्राचा उल्लेख हा शनिदेवाची बहिण अणि सुर्य देवाची कन्या असा करण्यात आला आहे.
शनिदेवाची बहिण भद्रा ही शनि देवाप्रमाणेच कठोर मानली जाते.ब्रम्हदेवाने तिला पंचांगामध्ये विशेष स्थान देखील दिले आहे.
हिंदु पंचागांचे एकुण पाच प्रमुख भागात विभाजन करण्यात आले आहे.यात योग,तिथी,वार नक्षत्र,करण देखील समाविष्ट करण्यात आले आहे.यामधील अकरा करण मधील सातव्या क्रमांकाच्या करण यष्टीचे नाव भद्रा असे आहे.
भद्राकाळ म्हणजे काय?
भद्राकाळ हा एक अशुभ काळ मानला जातो ह्या काळात कुठलेही महत्वाचे शुभ तसेच मंगल कार्य केले जात नसते.
भद्राकाळात तीर्थयात्रा,विवाह,गृहप्रवेश, उद्योग व्यवसायात गुंतवणूक करणे,एखादे नवीन कार्य इत्यादी कुठलेही शुभ तसेच मंगल कार्य केले जात नाही.
अणि जर आपण भद्राकाळात कुठलेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ आपणास प्राप्त होत नाही.हेच कारण आहे की बहिण भावाला भद्राकाळात राखी बांधणे टाळते.
रक्षाबंधन हे भावाबहिणीच्या नात्याचा पवित्र दिवस असतो म्हणून ह्या पवित्र शुभ दिवसाला भद्रा सारख्या अशुभ काळात साजरे केले जात नाही.
कारण भद्राकाळात बहिणीने भावाला राखी बांधली तर भावावर एखादे संकट येऊ शकते तसेच त्याची सर्व धन संपत्ती हिरावली जाऊन त्याचा विनाश देखील होऊ शकतो.
असे म्हटले जाते की रावणाची बहिण श्रुपनखा हिने देखील रावणाला भद्राकाळातच राखी बांधली होती ज्याचे परिणाम स्वरूप रावणाचे सर्व सामान्य देखील नष्ट झाले.
शृपनखा हिने रावणाला भद्राकाळात राखी बांधल्यानंतरच रावणाच्या सोन्याच्या लंकेचा विनाश होण्यास सुरुवात झाली होती.पुढे जाऊन ही सर्व लंकेचा विनाश झाला.
२०२३ मध्ये भद्राकाळ कधी सुरू होईल?
- ३० आॅगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजुन ५७ मिनिटांनी श्रावण शुक्ल पौर्णिमेस प्रारंभ होणार आहे.हयाच कालावधीत भद्रा काळाची देखील सुरूवात होईल.
- हा भद्राकाळ ३० आॅगस्ट रोजी १० वाजुन ५७ मिनिटांनी सुरू होऊन रात्री ९ वाजुन १ मिनिटांनी संपुष्टात येईल.यानंतरच राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्तास आरंभ होणार आहे.
- त्यामुळे सर्व बहिणींनी ३० आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजुन १ २ मिनिटांनंतरच राखी बांधायला हवी.
- ३० आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजुन २ मिनिटांपासुन ३१ आॅगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजेपर्यंत ह्या शुभ मुहूर्तात सर्व बहिणी आपल्या भावाला राखी बांधु शकतील.
- किंवा ३१ आॅगस्ट रोजी संपूर्ण दिवसभरात देखील बहिणी आपल्या भावाला राखी बांधु शकतील.
- भद्रापासुन आपला बचाव व्हावा म्हणून आपण शिवाची पूजा करायला हवी.
- भद्राकाळात भद्रातील बारा नावांचा जप केल्याने भद्राकाळात येणारया संकटापासून आपणास मुक्ती मिळते.
ही बारा नावे पुढीलप्रमाणे आहेत – - असुर,धन्या,धधिमुखी,महाकाली,विषठी,खराणा,महामारी,वि्षठी,कालरात्री,महारूद्र,कुलपुत्रिका,भैरवी इत्यादी.
- शनिदेवाची बहिण भद्रा ही शनिदेवा प्रमाणेच विघ्नसंतोषी अणि लवकर राग येणारी शीघ्र कोपी स्वरुपाची आहे.भद्रा लहान पणापासुन सर्व त्रषी मुनी तसेच संतांच्या धार्मिक कार्यात विघ्न आणायची.
- ज्याबाबद सुर्य देवांनी ब्रम्ह देवांकडे भद्रा विषयी तक्रार सुद्धा केली होती.त्यामुळे ब्रम्ह देवांनी भद्रेची समजुत काढली अणि तिला वि्षठी करणात स्थान प्राप्त करून दिले.
- असे म्हटले जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करत असते म्हणून भद्रा वास करत असलेल्या काळात बहिणीने भावाला राखी बांधु नये अशी धार्मिक तसेच पौराणिक मान्यता आहे.