Hostinger review in Marathi – तुमच्या ब्लॉग करता होस्टिंग प्लॅन कोणता घेणार? होस्टिंगर रिव्ह्यू मराठी 2023 – Hostinger detail review in Marathi

Hostinger review in Marathi- तुमच्या ब्लॉग करता होस्टिंग प्लॅन कोणता घेणार? होस्टिंगर रिव्ह्यू मराठी 2023

ऑनलाइन इन्कम चे बरेच मार्ग आज उपलब्ध आहेत. युट्युब चॅनेल, इंस्टा रील,फेसबुकग्रूप आणि ब्लॉगिंग अश्या विविध माध्यमातून आज बरेच जण चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

आपल्या ही आपला एक स्वतःचा ब्लॉग वेबसाईटवर असावी असे वाटत का? , मग त्या ब्लॉग चा उद्देश आपल्या छंदा विषयी माहिती देणे असो, आपल्या एकादा लहान व्यवसाय चा प्रसार करणे, मार्केटिंग करणे किंवा अफिलेट इन्कम करण असू शकतो.

आपण नवीनच आपला ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करणार असाल तर सर्वप्रथम आपल्या ब्लॉगसाठी एकादी चांगली उत्तम सेवा देणारी व परवडेल अशी स्वस्त दरात आपण होस्टिंग कंपनी शोधत असतो.

पण ब्लाँगिंगच्या क्षेत्रात नवीनच प्रवेश केला असल्यामुळे ह्या फिल्डचे आपणास एवढे नाँलेज नसल्यामुळे खुप जणांना आपण कोणती होस्टिंग खरेदी करावी कोणती?कोणती होस्टिंग आपल्यासाठी बेस्ट ठरेल हेच लवकर समजत नसते.

आपण आत्ताही गुगलवर जाऊन बेस्ट होस्टिंग असे सर्च केले तर आपल्यासमोर सर्च रिझल्टमध्ये अनेक होस्टिंग प्रोव्हाईड करणारया कंपनींची नावे येतील.ज्यांची सर्विस देखील खुप छान असते.पण जशी ह्या कंपन्यांची सर्विस उच्च दर्जाची असते तसे यांचे प्राईज देखील खुप जास्त असते.

अणि आपण नवीनच ब्लाँगिंग सुरू केलेली असल्यामुळे लगेच होस्टिंगवर एवढा अवाढव्य खर्च करणे शक्य नसते.मग अशा वेळी आपण असा विचार करतो की सुरूवातीला आपल्या बजेटमध्ये बसेल तसेच आपल्याला जास्त खर्च करावा लागणार नही अणि खिशाला परवडेल एखादी अशी होस्टिंग खरेदी करू.

पण इथे समस्या अशी आहे की आज मार्केट मध्ये अशाही काही कंपन्या आहेत ज्या कमी पैशात होस्टिंग देतात पण त्यांची सर्विस कस्टमर सपोर्ट सिस्टम वगैरे आपल्याला हवी तशी म्हणजेच एवढी चांगली नसते.

मित्रांनो आपल्या ह्या समस्येवर आज आम्ही एक उत्तम उपाय घेऊन आलो आहे.आजच्या लेखात आपण एक अशा होस्टिंग विषयी माहीती जाणून घेणार आहोत.ज्याची खरेदी नवीनतम ब्लाँगरही कमी बजेट असताना सहजपणे करू शकतात.अणि त्यांना यात सर्विस देखील उच्च दर्जाची प्राप्त होईल.ज्याचे नाव आहे होस्टिंगर.

See also  Machine Learning विषयी माहीती - Machine Leaning Marathi Information

आज आपण होस्टिंगर विषयी रिव्युव्ह करणार आहोत.जो आम्ही आमच्या दोन वर्षे होस्टिंगर होस्टिंग वापरल्यानंतर आलेल्या अनुभवा वर आधारित आहे

वेब होस्टिंग म्हणजे काय?

वेब होस्टिंग हे एक आँनलाईन सर्वर आहे.जे ब्लाँगरला इंटरनेट वर त्याचा ब्लाँग वेबसाइट चालवायला स्पेस प्रोव्हाईड करण्याचे काम करते.

जर आपल्याकडे वेब होस्टिंग असेल तर आपण इंटरनेट वर आपल्या ब्लाँग तसेच वेबसाइटच्या माध्यमातुन कुठलेही कंटेट अपलोड करू शकतो अणि जगभरातील लोकांपर्यत त्याला पोहचवू शकतो.

होस्टिंगर काय आहे?

होस्टिंगर ही एक अमेरिका ह्या देशातील कंपनी आहे जी आपणास डोमेन अणि होस्टिंगची सर्विस प्रोव्हाईड करते.इथे आपण आपल्या बजेटनुसार परवडेल अशा दरात होस्टिंगची खरेदी करू शकतो.इथे आपल्याला कस्टमर सपोर्ट देखील चांगला प्राप्त होतो.

होस्टिंगर कंपनीचे होस्टिंगरचे डोमन होस्टिंगचे विविध प्लँन असतात ज्यात आपल्याला खरेदी करताना चांगला डिस्काउंट देखील दिला जात असतो.

सध्या संपुर्ण जगभरात होस्टिंगरचा वापर किती जण करत आहेत?

सध्या होस्टिंगर ह्या वेब होस्टिंग कंपनीच्या होस्टिंगचा वापर ५० लाखापेक्षा अधिक लोक करत आहेत.कारण यात इतर कंपनीच्या तुलनेत खुप कमी किंमतीत नवीन ब्लाँगरला परवडेल अशा किंमतीत होस्टिंग खरेदी करता येते.अणि यात आपल्याला सर्विस देखील उत्तम दर्जाची दिली जाते.

होस्टिंगर कोणासाठी बेस्ट आँप्शन आहे?

जे व्यक्ती नवीनच ब्लाँगिंग करत आहेत अणि त्यांच्याकडे होस्टिंग खरेदी करायला जास्त बजेट देखील नाहीये अशा सर्वसामान्य गरीब ब्लाँगिंगच्या क्षेत्रात नवीनतम असलेल्या व्यक्तींसाठी होस्टिंगर हे एक बेस्ट आँप्शन आहे.

होस्टिंगर कडुन होस्टिंग खरेदी करण्याचे फायदे कोणते आहेत?

इथे आपणास इतर कंपनींच्या तुलनेत खुप कमी दरात म्हणजे आपणास परवडेल अशा किंमतीत आपल्या बजेटनुसार होस्टिंग उपलब्ध करून दिली जाते.

● होस्टिंगरकडुन आपणास २४/७ कस्टमर सपोर्ट देखील प्राप्त होतो.

● होस्टिंगरकडुन आपणास दिली जाणारी सर्विस देखील एकदम उच्च दर्जाची असते.

● होस्टिंगर आपणास ९९.९ इतकी अप टाईम गँरंटी देखील देते.

● आपल्या वेबसाइटला कुठलाही टेक्नीकल प्राँब्लेम आला तर तो देखील होस्टिंगर लवकरात लवकर साँलव्ह करण्याचे काम करते.

● होस्टिंगमध्ये आपणास एच पँनलची सुविधा देखील मिळते ज्याच्या मदतीने आपण ज्याच्या मदतीने आपण आपल्या सर्वरला देखील सहजरीत्या मँनेज करू शकतो.

● होस्टिंगरच्या प्रिमियम अणि बिझनेस वेब होस्टिंग प्लँनमध्ये आपणास अमर्यादित बँन्डविडथची सुविधा देखील प्राप्त होत असते.

● जेव्हा आपण होस्टिंगरचा प्रिमियम प्लँन विकत घेतो तेव्हा होस्टिंगर कडुन आपणास फ्री मध्ये डोमेन देखील दिले जात असते.

See also  इंटरनेट अणि मानवी जीवन - इंटरनेट म्हणजे काय ?

● यात आपणास क्लाउड फेअर प्रोटेक्टेड नेम सर्वर सुरक्षा देखील प्रोव्हाईड करण्यात येते.

● आपल्या ब्लाँग वेबसाइटच्या सिक्युरीटीसाठी होस्टिंगरकडुन आपल्याला एस एस एल सर्टिफिकेट देखील प्रोव्हाईड केले जात असते.

● होस्टिंगरकडुन आपणास शेअर होस्टिंगच्या प्लँनची सुविधा देखील प्राप्त होत असते ही सुविधा नव्या ब्लाँगरसाठी ज्यांच्या ब्लाँगवर अद्याप जास्त ट्रँफिक नही त्यांच्यासाठी खुपच उत्तम आहे.

● होस्टिंगरवर आपला ब्लाँग वेबसाइट वेगाने लोड होत असतो.ज्यामुळ आपल्या ब्ला़ँगला व्हिझिट करणारया व्हिझिटरला चांगला एक्सपीरीयंस इथे प्राप्त होतो.

● यात आपल्याला ३० दिवसांची मनी बँक गँरंटी सुदधा दिली जाते.म्हणजे समजा तीस दिवस होस्टिंगरची होस्टींग वापरल्यानंतर आपण होस्टिंगरच्या सर्विस पासुन संतुष्ट नसाल तर आपले पैसे आपणास वापस मिळत असतात.इथून आपले पैसे रिटर्न मिळविणे देखील खुप सोप्पे आहे.

● होस्टिंगरकडून एका होस्टच्या माध्यमातुन आपणास वेगवेगळया होस्टिंग सर्विस प्रदान केल्या जात असतात.

होस्टिंगरकडुन होस्टिंग खरेदी करताना आपण खालील बाबी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात

● जर आपण होस्टिंगरचा सिंगल वेब होस्टिंग प्लँन खरेदी केला तर इथे आपल्याला फ्री मध्ये डोमेन दिले जात नसते.

● होस्टिंगर मध्ये कुठलेही डेडिकेटेड सर्वरची सुविधा उपलब्ध नाहीये.

● आपल्या डेटाचा डेली बँक अप घेण्यासाठी होस्टिंगर कडुन दिल्या जाणारया बँक अप फिचरचा वापर आपणास फक्त बिझनेस वेब होस्टिंग मध्येच करता येत असतो.

● होस्टिंगरकडुन दिल्या जाणारया सिंगल अणि प्रिमियम वेब होस्टिंग मध्ये आपणास मोफत सीडीएनची सुविधा उपलब्ध करून दिली जात नही.

● इथे होस्टिंगरची सर्वात कमी किंमत असलेली होस्टिंग प्राप्त करण्यासाठी आपणास होस्टिंगरचा प्लँन खरेदी किमान ४८ दिवसांच्या कालावधीकरीता खरेदी करावा लागतो.म्हणुन आपण जर दिर्घकाळ ब्लाँगिंग करू इच्छित आहे तर आपण ही होस्टिंग खरेदी करायला हवी.

● होस्टिंगरकडे फोन करून आपण कुठल्याही समस्येवर उपाय विचारू शकत नही.कारण इथे फोन सपोर्ट उपलब्ध नहीये.फक्त चँट अणि टिकिट सपोर्ट उपलब्ध आहे.ज्यादवारे होस्टिंगरकडुन आपल्या वेबसाइट रीलेटेड सर्व समस्या दुर केल्या जातात.

होस्टिंगरची काही प्रमुख वैशिष्टये कोणती आहेत?hostinger features in Marathi

होस्टिंगरकडुन ब्लाँगरला वेबसाइट बँक अपचे तसेच एस एस डी स्टोरेजचे फिचर प्रदान केले जाते.

● होस्टिंगर आपणास त्यांच्या काही विशिष्ट प्लँनमध्ये फ्री मध्ये डोमेन देखील देण्यात येत असते.

● होस्टिंगरकडुन आपल्याला फ्री मध्ये एस एस एल सर्टिफिकेट देखील प्रदान केले जाते.हे सर्टिफिकेट आपल्या ब्लाँग वेबसाइटला नेहमी सिक्युअर ठेवण्याचे काम करते.

See also  बेस्ट ऍप्स - मोबाईल ला कॉम्प्युटरशी जोडा -connect phone to computer in Marathi

● होस्टिंगर आपल्या कस्टमरला ईमेल अकाऊंटची सर्विस देखील प्रदान करत असते.

● होस्टिंगरकडून ब्लाँगरला ९९.९ इतकी अपटाईम गँरंटी दिली जाती.

● आपणास तब्बल ३० दिवसांची मनी बँक गँरंटी सुदधा दिली जाते.

● होस्टींगरची कस्टमर सपोर्ट सर्विस देखील खुप उत्तम दर्जाची आहे.

● होस्टिंगरकडून आपणास वेबसाइट इंस्टाँलेशनचे फिचर देखील प्रोव्हाईड केले जाते.

आपल्याला परवडतील असे होस्टिंगरचे उत्तम प्लँन -best affordable plans and their price in Marathi

आपल्याला ज्यातुन परवडेल अशा दरात होस्टिंग खरेदी करता येईल अशा काही होस्टिंगरच्या होस्टिंग प्लँनची नावे अणि त्यांची किंमत पुढीलप्रमाणे आहे

यात आपणास आपल्या बजेटनुसार जी किंमत परवडेल त्या किंमतीत आपण होस्टिंगची खरेदी करू शकतो.

● सिंगल होस्टिंग प्लँन फक्त 79 रूपयात प्रति महिना

● प्रिमियम वेब होस्टिंग प्लँन 179 रुपया प्रति महिना

● बिझनेस वेब होस्टिंग प्लँन 279 रूपया प्रति महिना

होस्टिंगरकडुन शेअर होस्टिंग कशी घ्यायची?

● सर्वात प्रथम होस्टिंगरच्या आँफिशिअल वेबसाइट या वर क्लीक करून hostinger.in वर जायचे.

होस्टिंगरकडुन शेअर होस्टिंग कशी घ्यायची - How do you buy from Hostinger in Marathi

● यानंतर वेबसाइट वर गेल्यावर आपल्या समोर होस्टिंगरचे होम पेज ओपन होईल.तिथेच आपणास मैन्यू मध्ये होस्टिंगचे आँप्शन सुदधा दिसुन येईल.त्यावर क्लीक करायचे.

● आता आपल्यासमोर होस्टिंगचे वेगवेगळे आँप्शन ओपन होतील यातुन आपण शेअर होस्टिंग हे आँप्शन निवडायचे आहे.

● शेअर होस्टिंगचा प्लँन सिलेक्ट करून त्यावर क्लीक केल्यावर आपल्यासमोर शेअर होस्टिंगचे तीन पर्याय ओपन होतील.यात आपण आपल्या गरजेनुसार कुठलाही एक पर्याय सिलेक्ट करू शकतो.

● शेअर होस्टिंगच्या तीन पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय सिलेक्ट केल्यावर आपल्याला add to cart आँप्शनवर क्लिक करायचे आहे.

होस्टिंगरकडुन शेअर होस्टिंग कशी घ्यायची - How do you buy from Hostinger in Marathi

● यानंतर आपल्याला किती महिन्यांसाठी तो प्लँन विकत घ्यायचा आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे.

● यानंतर स्क्रोल करून खाली आल्यावर आपल्यासमोर फ्री डोमेनचे आँप्शन येईल इथे आपण सर्च बार मध्ये टाईप करून आपल्याला हवे ते डोमेन सर्च करू शकतो.जर ते डोमेन कोणी विकत घेतलेले नसेल किंवा कोणाला सेल करायचे असेल तर ते आपणास मिळुन जाईल.

● आता आपल्याला checkout now वर क्लीक करायचे आहे.यानंतर आपल्याला साईन अप करावे लागेल अणि फायनली आपले पेमेंट करावे लागेल.

अधिक माहिती साठी होस्टिंगर च्या या लिंक वर क्लिक करा

हा लेख वाचल्या नंतर आपल्याला ब्लॉग सुरू करावासा वाटत असेलतर खालील कॉमेंट करून आपण नक्की प्रश्न विचारा
आपण स्टुडंट असाल, गृहिणी असाल किंवा नोकरी करत असताना एक अधिक उत्पना करता आपल्याला ब्लॉग सुरू करावासा वाटत असेल तर आपण नक्की आम्हाला कळवा. शक्य ती मदत नक्की करू. थोडं बेसिक माहिती,एसईओ आणि थोडं इंटरनेट बाबत माहिती असली की आपण आपला ब्लॉग सुरू करू शकाल आणि सर्व क्षेत्रात असते तसे कष्ट ,धीर हे गुण असतील आणि स्मार्ट वर्क ची तयारी असेल तर आपण ही ब्लॉगिंग यामध्ये नक्की यशस्वी व्हाल.
खाली कॉमेंट्स करुन आप मत, विचार नक्की कळवा. कोणताही होस्टिंगचा प्लॅन घेण्याआधी व अधिक माहिती हवी असल्यास आपण मोबाईल द्वारे बोलू शकता, त्या करता प्रथम खाली कॉमेंट द्वारे संपर्क करू शकता.’
योगेश सोनवणे
संजय पाटील