व्हिटॅमिन बी 6 विषयी माहीती – Vitamin B6 Information In Marathi

व्हिटॅमिन बी 6 विषयी माहीती – Vitamin B6 Information In Marathi

व्हिटॅमिन बी 6 म्हणजे काय?Vitamin B6 Meaning In Marathi

व्हिटॅमिन बी 6 हे एक पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असते.व्हीटँमिन बी 6 हे व्हिटँमिन बी गटातील एक जीवनसत्व आहे.

जसे आपल्या शरीराला योग्यरीत्या कार्य करण्यासाठी कँल्शिअम अणि प्रोटीनची आवश्यकता असते तसेच व्हिटँमिन बी 6 सुदधा आपले शरीर अणि मन व्यवस्थित कार्य करण्यासाठी आपल्या शरीरास प्राप्त होणे आवश्यक असते.

व्हिटॅमिन बी 6 अजुन कोणत्या नावाने ओळखले जाते?Vitamin B6 Also Known As In Marathi

व्हिटॅमिन बी 6 ला वैद्यकीय जगामध्ये पायरीडाँक्सिन असे देखील म्हटले जाते.

व्हिटॅमिन बी 6 चे फायदे कोणते आहेत?Vitamin B6 Benefits In Marathi

1)आपल्या रक्तवाहिन्या नेहमी निरोगी राहतात-

व्हिटँमिन बी 6 चे सेवन केल्याने आपल्या आपल्या रक्तवाहिनी नेहमी निरोगी अणि रोगमुक्त राहत असतात.एका संशोधनातुन असे समोर देखील आले आहे की आपल्या मानवी शरीराला फाँलेट सोबत व्हिटँमिन बी 6 ची देखील अत्यंत आवश्यकता असते.कारण याने आपले होमोसिस्टन संतुलित राहत असते.

होमोसिस्टीन म्हणजे काय?

होमोसिस्टीन हे एक अँमिनो आम्ल आहे.अणि हे आम्ल आपल्या शरीराला प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन केल्याने मिळत असते.

See also  अ‍ॅक्यूपंक्चर म्हणजे काय ? अ‍ॅक्यूपंक्चरचे फायदे | अ‍ॅक्युपंक्चर आणि अ‍ॅक्युप्रेशरमधील फरक | What is Acupuncture

आपल्या शरीरात अँमिनो अँसिडचे प्रमाण वाढल्यास काय होते?

आपल्या शरीरात जर अँमिनो अँसिडचे प्रमाण वाढले तर आपणास रक्तवाहिन्यांचे तसेच हदयाशी संबंधित विविध विकार जडु शकतात.

2) आपला मेंदू सुरळीतपणे कार्य करतो –

व्हिटँमिन बी 6 चे सेवन केल्याने आपला मेंदु देखील सुरळीत कार्य करत असतो.

एका संशोधनातुन हे समोर देखील आले आहे की व्हीटँमिन बी 6 हे आपल्या शरीरातील मेंदु अणि मज्जासंस्थेच्या चेतासंस्थेच्या कार्याचा विकास होण्यास हातभार लावत असते.

अणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे व्हीटँमिन बी 6 चे सेवन केल्याने आपणास अल्झाइमर तसेच डिमेंशिया हे स्मरणशक्तीवर मेंदुवर प्रभाव टाकणारे आजार देखील आपणास जडत नही.

3) आपल्या शरीरातील हार्मोन्सला संतुलित राखते-

व्हिटॅमिन बी 6 हे आपल्या शरीरातील हार्मोन्सला देखील संतुलित राखण्यास मदत करत असते.याचा अधिकतम फायदा स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान शरीरातील हार्मोन्सला संतुलित राखण्यासाठी होत असतो.

4) मन शांत आणि निवांत राहते –

व्हिटॅमिन बी 6 चे सेवन केल्यामुळे आपला मेंदु नेहमी सुरळीतपणे कार्य करतो.याचाच परिणाम आपल्या विचार भावनांवर देखील होतो अणि आपले मन नेहमी शांत अणि प्रफुल्लित राहत असते.

मन शांत आणि प्रफुल्लित राहिल्याने आपला मुड देखील नेहमी आनंदी अणि प्रसन्न म्हणजेच चांगला राहत असतो.आपण कधीही निराश उदास राहत नही अणि चिडचिड सुदधा करत नही.

5) डोळयांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर –

व्हिटँमिन बी 6 हे आपल्या डोळयांच्या उत्तम आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर मानले जाते.याने आपल्याला नजरेशी संबंधित कुठलीही समस्या निर्माण होत नसते.

म्हणुन आपण आपल्या डोळयांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्हिटँमिन बी 6 युक्त आहाराचेच सेवण
आवश्यक त्या प्रमाणात करायला हवे.

6) गर्भवती महिलांसाठी अधिक उपयुक्त –

मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना जो पोटदुखी,डोकेदुखी,कंबरदुखी क्रँप्स इत्यादी त्रास होत असतो.अशा महिलांनी जर डाँक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रमाणात व्हिटँमिन बी 6 चे सेवन केले तर अशा महिलांना मासिक पाळीमध्ये आराम प्राप्त होत असतो.

See also  सुर्यनमस्कार म्हणजे काय?सुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत? - 20 Benefits of Surya Namaskar

7) आपल्या निद्रेशी संबंधित आपल्या सर्व समस्या दुर होतात-

खुप जण असे आहेत ज्यांना रात्री नीट नैसर्गिक झोप येत नही अक्षरश त्यांना झोप यावी म्हणुन झोपेच्या गोळया खाव्या लागतात.अशा व्यक्तींसाठी व्हिटँमिन बी 6 चे सेवन करणे खुप फायदेशीर ठरत असते.

व्हिटँमिन बी 6 चे इतर फायदे -Vitamin B6 Other Benefits In Marathi

गर्भवती महिलांना सुरुवातीच्या काळात होणारा सकाळचा त्रास कमी होतो.ज्यात वांत्या होणे मळमळ होणे इत्यादीचा समावेश होत असतो.

व्हिटँमिन बी ६ मुळे आपल्या हदयाची कार्यक्षमता वाढते तसेच शरीराची रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढत असते.

आपल्या रक्तामधल्या हीमोग्लोबिन तसेच लोहाचे प्रमाण व्यवस्थित राहत असते.

व्हिटॅमिन बी 6 असलेले अन्नपदार्थ तसेच स्त्रोत कोणते आहेत?Vitamin B6 Foods,Sources In Marathi

व्हीटँमिन बी ६ असलेल्या अन्नपदार्थांमध्ये पुढील अन्नपदार्थ समाविष्ट असतात –

● गाजर

● दुध

● अंडी

● रताळ

● पालक

● अँव्हाकँडो

● केळी

● मासे

● मटर

● रावस

● मटण

● डाळी

● कोबी

● आले

● मका

● गहु

● आळंबी

● बदाम

● काजु

● चिकन लिव्हर
Vitamin B6 Information In Marathi -check more at AMAZON

व्हीटँमिन बी ६ च्या अभावाने होणारे आजार कोणते आहेत?Vitamin B6 Deficiency In Marathi

आपल्या शरीरात जर व्हिटँमिन बी ६ चा अभाव असेल तर आपणास पुढील आजार होण्याची शक्यता असते.

● व्हीटँमिन बी ६ च्या अभावाने आपणास त्वेचेचे विविध आजार जडु शकतात

● हार्ट अटँक येऊ शकतो.हदयाशी संबंधित इतर आजार जडु शकतात.

● आपल्या मेंदुवर ताण निर्माण होऊ शकतो.

● आपल्या स्नायुंच्या हालचालीवर आपले नियंत्रण राहत नसते.

● शरीर कमकुवत बनते अणि आपल्या शरीरात अशक्तपणा देखील निर्माण होत असतो.

व्हिटँमिन बी ६ चे अधिक सेवन केल्याने काय होते?

जर आपण व्हिटँमिन बी ६ चे अधिक सेवन केले तर आपणास डोकेदुखी,पोटदुखी,भुक मंदावणे,डोळयात जळजळ होणे किंवा दुखणे,हातापायाची आग आग दाह होणे अशा अनेक समस्या आपल्यासमोर निर्माण होऊ शकतात.

See also  आयुर्वेदिक अभ्यंग म्हणजे काय? त्याचे फायदे काय ? Abhyanga Ayurvedic Mahiti

म्हणुन आपण व्हिटँमिन बी ६ डाँक्टरांनी सांगितलेल्या योग्य मात्रामध्येच सेवन करणे आवश्यक आहे.

व्हीटँमिन बी ६ ची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लीमेंट Vitamin B6 Supplement In Marathi

ज्यांना आपल्या आहारातुन शरीराला आवश्यक तेवढे व्हिटँमिन बी ६ प्राप्त होत नसेल असे व्यक्ती आपल्या शरीरातील व्हीटँमिन बी ६ ची कमतरता भरून काढण्यासाठी डाँक्टरांच्या सल्ल्याने बाजारात आलेले एखादे चांगले फुड सप्लीमेंट देखील घेऊ शकतात.

आपण व्हिटँमिन बी ६ किती प्रमाणात घ्यायला हवे?

जे अठरा वर्षाच्या पुढील व्यक्ती आहेत म्हणजे जे स्त्री पुरूष आहेत त्यांनी साधारणत १.२ ते १.३ मिलीग्रँम इतके व्हिटँमिन बी ६ चे सेवन करायला हवे.

अणि गरोदर महिलांचे व्हिटँमिन बी ६ च्या सेवणाचे प्रमाण यात डाँक्टरांच्या सल्यानुसार थोडेफार कमी जास्त होऊ शकते

व्हीटँमिन बी ६साठी टँबलेटस Vitamin B6 Tablets In Marathi

● हेल्थ विट व्हिटँमिन बी ६ कँप्सुल

● व्हिटँमिन बी ६ पायरीडाँक्सिन टँब्लेट

● व्हिटँमिन बी ६ पाच मिलीग्रँम टँब्लेट

Leave a Comment