म्हशीच्या दुधाचे आहारातील महत्व- गाई आणि म्हशीच्या दुधातला न्यूट्रिशन फरक -Nutritional values of cow and Buffalo milk  

म्हशीच्या दुधाचे  आहारातील महत्व – Nutritional values of cow and Buffalo milk  

दुधाला आपण पुर्णान्न असे संबोधित असतो.कारण दुधामध्ये ती सर्व पोषकतत्वे असतात.जी आपल्या शरीराच्या वाढीसाठी तसेच विकासासाठी आवश्यक असतात.

पण दुधाचे देखील दोन प्रमुख प्रकार आहेत ज्यात एक गायीचे दुध असते आणि दुसरे म्हशीचे.

पण आपण सर्वजण गायीचे दुध घेणे अधिक पसंद करतो.कारण आपला असा समज असतो की म्हशीचे दुध हे गायीच्या दुधाइतके पौष्टिक नसते.

मुख्यकरून आपल्या घरात जी लहान मुले असतात त्यांच्यासाठी म्हशीचे दुध अजिबात पौष्टिक नसते.कारण त्यातुन त्यांना आपल्या शरीराच्या वाढीसाठी,विकासासाठी आवश्यक ती पोषकतत्वे प्राप्त होत नसते.

आणि गायीच्या दूधात ती सर्व पोषकतत्वे असतात जी लहान मुलांच्या वाढीसाठी,विकासासाठी गरजेची असतात असे आपले सर्वाचे मत असते.

म्हणुन आजच्या लेखात आपण म्हशीच्या दुधाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या शारीरीक वाढीसाठी,विकासासाठी म्हशीचे दुध देखील तितकेच महत्वाचे आहे जितके गायीचे दुध.

म्हशीचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात?

 म्हशीच्या विविध जाती तसेच प्रजाती असतात ज्या दुध उत्पादनासाठी खुप उत्तम मानल्या जात असतात.

आपण अशाच काही म्हशीच्या जातींविषयी जाणुन घेऊया.

म्हशीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

1) मुरा म्हैस :

2) मेहसाणा म्हैस :

3) पंढरपुरी म्हैस :

4) सुरती म्हैस:

 

1)मुरा म्हैस :

मुरा म्हशीचा शरीराचा बांधा दिसायला मोठा,भारदस्त आणि कणखर असतो.

मुरा म्हशीच्या एका वेतातील दुध हे साधारणत तीन हजार तसेच तीन हजार पाचशे लीटर इतके असलेले आपणास आढळुन येते.

See also  डेटॉल साबणाने अंघोळ करण्याचे फायदे – Dettol uses in Marathi

 

2) मेहसाणा म्हैस :

म्हशीच्या ह्या जातीची निर्मिती ही सुरती आणि मुरा ह्या दोन जातींच्या संकरापासुन झालेली आपणास दिसुन येते.ह्या म्हशीचा शरीराचा देखील मुरा म्हशीप्रमाणे भारदस्त आणि कणखर असतो.आणि ही म्हैस एका वेतात तीन हजार लीटर इतके दुध देत असते.

 

3) पंढरपुरी म्हैस :

हा म्हशीचा प्रकार आपणास मुख्यत्वे सोलापुर,कोल्हापुर,बेळगाव सांगली ह्या भागात दिसुन येतो.ही म्हैस आकाराने मध्यम असते आणि हिचा चेहरा निमुळत्या स्वरूपाचा असतो.

ह्या म्हशीचे वजन हे साधारणत 400 ते 500 किलो इतके असलेले आपणास दिसुन येते.आणि ही म्हैस एका वेतात एक हजार पाचशे ते एक हजार आठशे इतके लीटर दुध देत असते.

 

4) सुरती म्हैस :

सुरती म्हैस ही आकाराने मध्यम स्वरुपाची असते.आणि सुरती म्हशीचे कान हे लांबट असतात.जे तिच्या रूंद शिंगांमुळे झाकोळलेले असतात.

सुरती म्हशीच्या शरीराचा रंग भुरकट असतो तिच्या मानेवर गडद असे पांढरे पटटे देखील असलेले आपणास दिसुन येतात.

सुरती म्हशीचे एक वेतातील दुध हे एक हजार आठशे लीटर इतके असते.आणि ही म्हैस जास्त कालावधीसाठी दुध देत असते.ह्या म्हशीच्या दुधात स्निग्धांश हे विपुल प्रमाणात असते

 

म्हशीच्या दूधात कोणकोणती पोषकतत्वे असतात?

  • म्हशीच्या दुधात कँल्शिअम,व्हिटँमिन,प्रोटीन,पोटँशिअम,फाँस्फरस,मँग्नेशिअम,झिंक,इत्यादी पोषकतत्वे असतात.
  • याचसोबत म्हशीच्या दुधात कँलरीज देखील विपुल प्रमाणात असतात.
  • उदा.म्हशीच्या शंभर मिली दुधातुन आपल्याला 240 कँलरीज प्राप्त होत असतात.
  • म्हशीच्या दुधातुन आपल्याला १८.४ टक्के इतके कँल्शिअम मिळत असते.
  • म्हशीच्या दुधातुन आपल्याला ८.४ टक्के इतके प्रोटीन्स प्राप्त होत असतात.

म्हशीच्या दुधात ५ टक्के व्हिटँमिन देखील असतात.म्हशीच्या दुधात 8 ते 9 टक्के चरबी असते.

म्हशीच्या दुधाचे कोणकोणते फायदे असतात?

म्हशीच्या दुधाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात.

  • म्हशीच्या दूधातुन आपल्याला काही अशी जीवणसत्वे तसेच खनिजे प्राप्त होत असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढत असते.ज्याने आपण कोणत्याही आजाराशी लढा देता येतो.
  • म्हशीच्या दुधाचे सेवन केल्याने आपल्याला दाताच्या,हाडाच्या तसेच त्वचेच्या संबंधित ज्या विविध समस्या उदभवत असतात त्या सर्व समस्या दुर होण्यास मदत होते.
  • म्हशीच्या दुधामध्ये आपल्याला आँक्सीडेटिव्ह आढळुन येत असतात.जे आपल्या शरीराला तणावमुक्त ठेवत असतात.
  • म्हशीच्या दुधामध्ये प्रोटीन्स असते ज्याने आपल्या स्नायुंची वाढ होत असते.तसेच त्यांचा विकास होत असतो.
  • ज्यांना आपल्या वजनात वाढ घडवून आणायची आहे त्यांनी म्हशीचे दुध प्यायला हवे कारण यात भरपुर कँलरीज असतात ज्याने आपल्या शरीरातील शक्ती वाढते.आणि आपण बारीक असल्यास आपल्या वजनामध्ये देखील वाढ होत असते.
  • जसे की आपण वर जाणुन घेतले की म्हशीच्या दुधात भरपुर कँल्शिअम देखील असते.जे आपल्या हाडांची वाढ होण्यासाठी फार उपयुक्त ठरत असते.
  • म्हशीच्या दुधातील कोलेस्टेराँलची पातळी खुप कमी असते.ज्याने आपल्या रक्तवाहिन्या दिर्घकाळासाठी निरोगी राहतात.शिवाय आपल्याला हाय ब्लड प्रेशर तसेच पोटाच्या इतर समस्या देखील उदभवत नसतात.
  • म्हशीच्या दुधापासुन तयार करण्यात आलेली मलई ही गायीच्या दुधाच्यापेक्षा अधिक जाड असते याचसोबत म्हशीच्या दुधाचे तुप देखील खुप चांगले असते.
See also  ट्रोपोनिन टी टेस्ट म्हणजे काय? ट्रोपोनिन टी टेस्ट का केली जाते? - What is the troponin T test for?

म्हशीच्या दुधाविषयी आहारतज्ञांचे काय मत आहे?

  • प्रसिदध आहारतज्ञ रंजना सिंह असे सांगतात की गायीच्या दुधाप्रमाणेच म्हशीचे दुध देखील आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरत असते.
  • कारण म्हशीच्या दूधात भरपुर व्हिटँमिन आणि मिनरल्स असतात.जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करत असतात.याचसोबत आपल्याला त्वचेसंबंधी,हाडासंबंधी तसेच दातासंबंधी कोणतेही विकार जडत नसतात.
  • यात असलेले आँक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचे काम करत असतात.
  • याचसोबत 2017 मध्ये लिपिडस इन हेल्थ अँण्ड डाईजेस मध्ये प्रकाशित करण्यात आले होते की म्हशीच्या दुधात अँमिनो अँसिड अधिक प्रमाणात असते.
  • याचसोबत यात सिलेनिअम आणि अँटीआँक्सीडेंट देखील अधिक प्रमाणात असतात.
  • म्हशीच्या दुधात कोलेस्टेराँल देखील खुप कमी असते ज्याने आपल्याला ब्लड प्रेशर तसेच रक्वाहिन्यांसंबंधी कोणतेही आजार जडत नसतात.

 

म्हशीच्या दुधाचे सेवन कोणी करू नये?

  • ज्या व्यक्तींना लठठपणाची समस्या असेल त्यांनी म्हशीचे दुध पिणे टाळायला हवे कारण म्हशीच्या दूधात कोलेस्टेराँलची लेव्हल कमी असल्यामुळे जरी आपले ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत असले तरी म्हशीच्या दुधामध्ये अधिक प्रमाणात कँलरीज तसेच चरबी देखील असते.ज्याने आपले वजन अधिक जास्त प्रमाणात वाढत असते.आणि म्हशीचे दुध पचायला देखील जड असते.
  • म्हणुन आपण डाँक्टरांचा तसेच आहार तज्ञांचा वैयक्तिक सल्ला घेऊनच आपल्या शरीराच्या गरजेनुसार प्रमाणात म्हशीच्या दुधाचे सेवण करायला हवे.कारण म्हशीच्या दुधाचे सेवन केल्याने आपल्याला जसे रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होणे,दाताच्या,हाडाच्या तसेच त्वचेच्या इतर समस्या दुर होणे आपल्या शरीरातील कोलेस्टेराँल कंट्रोलमध्ये राहणे हे अनेक विपुल फायदे होत असतात
  • त्याचप्रमाणे म्हशीच्या दुधामुळे चरबी वाढणे,वजन वाढणे असे प्रकार देखील घडत असतात म्हणुन आपण डाँक्टरांचा तसेच तज्ञांचा सल्ला घेऊनच म्हशीच्या दुधाचे सेवण करावे.

गाई आणि म्हशीच्या दुधातला तुलनात्मक फरक -Nutritional Value Of Both Buffalo And Cow Milk. -Nutritional Chart

पोषक द्रव्ये -Nutritionम्हशी च दूध

Buffalo Milk

गाई च दूध

Cow Milk

पाणी – Water81.10%87.80%
प्रथिने – Protein4.5g3.2g
चरभी – Fat8g3.9g
कार्बोदके – Carbohydrate4.9g4.8g
ऊर्जा -Energy110kcal66kcal
साखर -Sugar lactose4.9g4.9g
सॅच्युरेटेड फॅट -Saturated Fat4.2g2.4g
मोनो सॅच्युरेटेड फॅट-Monounsaturated Fat1.7g1.1g
पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट-Polyunsaturated Fat0.2g0.1g
कोलेस्टेरॉल-Cholesterol8mg14mgg
कॅल्शियम-Calcium195micg120micg

 

 

Minerals खनिजे

 

म्हशी च दूध

Buffalo Milk

गाई च दूध

Cow Milk

कॅल्शियम -Calcium0.18%0.12%
फॉस्फरस-Phosphorous0.14%0.10%
मॅग्नेशियम-Magnesium0.02%0.01%
सोडियम-Sodium0.04%0.05%
पोटॅशियम-Potassium0.11%0.15%
क्लोराइड-Chloride0.07%0.10%
सायट्रेट Citrate0.18%0.18%

 

 

 

 

 

 

 

 

 

See also  प्रोटीन पावडर विषयी माहीती - Protein powder information in Marathi