कांदयाचे आरोग्यदायी फायदे  – Onion health benefits Marathi information

कांदयाचे आहारातील महत्व व फायदे  Onion health benefits

 कांदा हा आपल्या जेवणातील एक अत्यंत महत्वाचा घटक पदार्थ आहे.कारण भाजी बनवत असताना किंवा इतर कोणतेही व्यंजन तयार करत असताना आपण त्यात कांदा हा आवर्जुन टाकत असतो.

याचसोबत आपण जेवण करत असताना कच्चा कांदा देखील खात असतो.पण धर्मामध्ये कांदयाचे सेवण करणे वर्ज्य असल्याने तसेच कांदा खाणे आवडत नसल्यामुळे आपल्यातील बरेच जण कांदा खाणे टाळत असतात.

याचसोबत दैनंदिन जीवणात आपण कांदा हा फक्त अन्नपदार्थ बनवण्यासाठी तसेच त्यात चव येण्यासाठी मुख्यत्वे वापरत असतो.

पण या व्यतीरीक्त कांदयातील इतर गुणांकडे पाहिले तर आपल्याला हे लक्षात येते की कांदयामध्ये विविध अशी पोषणतत्वे असतात.जी आपल्या आरोग्यासाठी खुप लाभदायक असतात.

याचाच अर्थ कांदा हा फक्त आपल्या आहाराला चव देण्याचेच काम करत नसुन आपले आरोग्य उत्तम ठेवण्याचे काम देखील करत असतो तसेच विविध शारीरीक आजारांवर उपचार करण्यासाठी देखील कांदा आपणास उपयोगी पडत असतो.

आणि फुड फंड फंक्शन जर्नल मध्ये एक माहीती प्रकाशित करण्यात आली आहे ज्यात असे देण्यात आले आहे की ज्यांना स्वताला हदयाच्या आजारापासुन दुर ठेवायचे असेल त्यांनी कांदयाचे सेवण करायलाच हवे.

याचसोबत ब्रिटीश जर्नल आँफ न्युट्रीशनमध्ये अशी माहीती प्रकाशित करण्यात आले आहे की ज्यांना लठठपणाची समस्या आहे त्यांनी आपल्या शरीरातील कोलेस्टेराँलची पातळी कमी करण्यासाठी कांदयाचे सेवन करायला हवे

म्हणुन आपण आजच्या लेखात कांदयाचे विविध प्रकार,आणि त्या विविध प्रकारच्या कांदयाचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदे कोणकोणते आहेत?तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे काय महत्व आहे हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

See also  चिया सीडस म्हणजे काय?Chia seeds meaning in Marathi

कांदयाचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

 कांदयाचा कोणताही एक विशिष्ट प्रकार नसुन त्याचे पुढीलप्रमाणे विविध प्रकार पडत असतात :

1) लाल कांदा :

2) पांढरा कांदा :

3) पिवळा कांदा :

4) हिरवा कांदा :

 

1) लाल कांदा :लाल कांदा हा कांदयाच्या प्रकारातील सर्वात तिखट प्रकार मानला जातो.याचा वरील रंग हा लाल असतो.आणि आतील भाग पांढरा असतो.

कांदयाचा हा प्रकार आपण सँलिड तयार करण्यासाठी तसेच सँण्डविच कचोरी वगैरे तयार करण्यासाठी वापरत असतो.

 

लाल कांदयाचे आरोग्यविषयक फायदे –

  • लाल कांदयात फ्लेव्होनाँईड नावाचा पदार्थ असतो जो आपल्या हदयाच्या आरोग्यासाठी फार उत्तम मानला जातो.
  • लाल कांदयाचे सेवण केल्याने आपली निद्रानाशाची समस्या देखील दुर होत असते.
  • लाल कांदा कापुन आपण त्यावर लिंबाचा रस चोळला आणि त्याचाच वापर खाण्यासाठी केला तर याने आपली अजीर्णाची समस्या दुर होत असते.
  • उन्हाळयाच्या दिवसात जेवण करताना कच्चा कांदा खालल्याने आपल्याला उष्माघाताची समस्या होत नसते.आणि उन्हापासुन देखील संरक्षण होते.

2) पांढरा कांदा : पांढरा कांदा हा कांदयाचा दुसरा प्रकार आहे.ज्याचा आतील आणि वरील भाग देखील पांढरा असतो.

हा कांदा आपण कच्चा सेवन करू शकतो याचसोबत शिजवून देखील याचे सेवण आपल्याला करता येत असते.पांढरा कांदा हा मँक्सियन कुकिंगसाठी वापरला जात असतो.

पांढरा कांदयाचे आरोग्य विषयक फायदे – Onion health benefits Marathi information

  • पांढरा कांदयात सल्फर आणि फ्लेवोनाईड अँटीआँक्सीडेंट असते.ज्यामुळे आपल्या शरीरातील कँन्सरशी लढा देण्यासाठी शक्ती देखील वाढत असते.
  • पांढरा कांदयात क्वेरसेटिन आणि फाईसेटिन समाविष्ट असते ज्यामुळे टयुमर वाढत नसतो.संशोधनातुन असे देखील सांगण्यात येते की पांढरा कांदयामध्ये क आणि सी जीवणसत्वाचा समावेश असतो.
  • याचसोबत पांढरा कांदयामध्ये फ्लेवोनाईड,फायबर,फोलिक अँसिड,अँटी आँक्सीडेंट तसेच अँटी बँक्टेरिया तसेच प्रीबायोटिक्स असतात जे आपल्या पोटासाठी,आतडयांसाठी आणि आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरत असतात.
  • जे व्यक्ती आपल्या आहारामध्ये पांढरा कांदयाचे सेवन करतात त्यांना पचनासंबंधी कोणतीही समस्या तसेच विकार उदभवत नसतात.
  • ज्या व्यक्तींना साखरेची समस्या असेल अशा व्यक्तींनी पांढरा कांदयाचे सेवन करायला हवे याने आपल्या रक्तात असलेले साखरेचे प्रमाण नेहमी संतुलित राहत असते.कारण यात क्रोमिअम आणि सल्फर असते जे आपल्या रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्याचे काम करत असतात.
  • ज्यांना डायबिटीसची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात पांढरा कांदयाचे सेवन करायला हवे.याने आपले शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहत असते.
  • पांढरा कांदयात सेलिनिअम असते जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करत असते.
  • पांढरा कांदा आपल्या केसांसाठी देखील।खुप लाभदायक असतो.पांढरा कांदयाचा रस जर आपण आपल्या केसांना लावला तर याने आपले केस गळणे थांबत असते तसेच आपल्या केसांची वाढ होण्यास देखील साहाय्य होत असते.
  • पांढरया कांदयाचे सेवन केल्याने आपले दात दुखणे देखील थांबत असते.
  • पांढरा कांदा वाटुन आपण तो जर आपल्या पायाच्या टाचेवर चोळला तर याने आपल्या पायाच्या भेगा देखील ठीक होत असतात.
See also  चालण्याचे आरोग्य दायी फायदे – Health benefits of walking Marathi

 

3) हिरवा कांदा :

 हिरव्या कांदयाचा उपयोग जास्तीत जास्त चीनी तसेच मँक्सिकन व्यंजन तसेच इतर अन्नपदार्थ तयार करण्यासाठी विशेषकरून केला जात असतो.

 

हिरव्या कांदयाचा वापर हा सुप,मंच्युरियन तसेच विविध चीनी व्यंजन तयार करण्यासाठी आपण करत असतो.

हिरव्या कांदयामध्ये प्रोटीन्स,कार्बोहायड्रेटस फायबर इत्यादींचा समावेश असतो.

हिरव्या कांदयाचे फायदे –

  • हिरव्या कांदयात कँल्शिअम आणि फाँस्फरसचा समावेश असतो जे आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी देखील गरजेचे असते.
  • हिरव्या कांदयामध्ये अँटी ईम्पलीमेंटरी तसेच अँटी हिस्टँमिनचा समावेश असतो.ज्याने आपला संधीवाताचा तसेच दम्याचा आजार बरा होत असतो.
  • हिरव्या कांदयाचे सेवन केल्याने आपल्या पचनप्रक्रियेत सुधारणा घडुन येत असते.

 

  • हिरव्या कांदयामुळे आपली त्वचा,नखे आणि केसांच्या स्थितीत सुधारणा घडुन येत असते.
  • हिरवा कांदा हा भुकवाढीसाठी तसेच सर्दी बरी होण्यासाठी देखील अधिक फायदेशीर ठरत असतो.
  • हिरव्या कांदयात व्हिटँमिन ई सी विपुल प्रमाणात असते.

4) पिवळा कांदा :

 पिवळया कांदयाचा उपयोग आपण मांसाहारी पदार्थ तसेच व्यंजन तयार करण्यासाठी करत असतो.पिवळा कांदा देखील आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरत असतो.