चिया सीडस म्हणजे काय?Chia seeds meaning in Marathi
चिया सीडस हे मुळचे आपल्या भारत देशातील बियाणे नाहीये हे अमेरिकेतील बियाणे आहे.हेच कारण आहे की याला कुठलेही भारतीय देण्यात आलेले नाहीये.
चिया सीडसला भारतात चिया बियाणे ह्या नावाने संबोधले जाते.चिया हे एक प्राणी बियाणे आहे.हे वाळवंटात असलेली वनस्पती जिचे नाव सॅलव्हिया हिसपेरिका यापासून प्राप्त होते.
चिया सीडस ह्या तपकरी तसेच काळसर,पांढरया रंगाच्या बिया आहेत.
चिया सीडस याला सबजाच्या बिया देखील म्हटले जाते पण चीया सीडस अणि सबजाच्या बिया यामध्ये बराच फरक असतो.
चिया सीडस आपण कच्च्या खाऊ शकतो किंवा दही, वेगवेगळ्या भाज्या,ज्युस,सॅलड,शेक,इत्यादी मध्ये मिक्स करून देखील आपण खाऊ शकतो.चिया सीडसला आपण पाण्यात भिजवून देखील सेवन करू शकतो.
चिया सीडस याला एनर्जी बुस्टर असे देखील म्हटले जाते कारण ह्याचे सेवन केल्याने आपल्याला विपुल प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अॅसिड प्राप्त होत असते.
चिया सीडस मधुन आपणास फाॅसफरस,झिंक व्हिटॅमिन बी आयर्न,पोटॅशियम फायबर,प्रोटीन,फॅट कॅल्शियम,मॅग्नेशियम मॅगनीज तसेच अॅटी आॅक्सीडंट इत्यादी प्रकारची पोषक तत्वे देखील प्राप्त होत असतात.
चिया सीडस खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत?
चिया सीडस खाण्याचे आपल्या शरीराला विविध प्रकारचे फायदे प्राप्त होतात –
- वजन कमी करण्यासाठी चिया सीडस अधिक फायदेशीर ठरते.रोज व्यायाम करण्यासोबत चिया सीडसचे देखील सेवन केले तर आपले वजन लवकर कमी होत असते.
- चिया सीडस मध्ये फायबर विपुल प्रमाणात समाविष्ट असते ज्यामुळे आपली पचनप्रणाली योग्यरीत्या अणि सक्रीय रीत्या व्यवस्थित पणे कार्य करीत असते.
- चिया सीडस मध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक प्रमाणात असते ज्यामुळे आपली हाडे अणि दात अधिक मजबुत होण्यास मदत होते.आपल्या शरीराला कॅलशिअम प्राप्त होण्यासाठी हे आपण दुधात मिसळून देखील घेऊ शकतो.
- चिया सीडस मध्ये अॅटी आॅक्सीडंट असते ज्यामुळे याचे सेवन केल्याने आपल्या त्वचेचे आरोग्य देखील सुधारत असते.
- चिया सीडस खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती देखील वाढते.यातील व्हिटॅमिन बी मुळे आपले केस नेहमी निरोगी राहतात.केसांचे आरोग्य चांगले राहते.
- चिया सीडस मध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते ज्यामुळे आपणास हदयाशी संबंधित कुठलाही आजार,हाय ब्लडप्रेशर, इत्यादी जडत नाही हे आपला ह्या आजारांपासून बचाव करते.
- चिया सीडसचा समावेश सकाळचा नाश्ता मध्ये केल्याने दिवसभर कुठलेही काम करताना आपणास उर्जा प्राप्त होते.
- यात अॅटी फंगल गुण देखील असतो ज्यामुळे आपणास कुठलेही इन्स्पेक्शन देखील होत नाही.चिया सीडस खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- जर आपण चीया सीडसचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केला तर आपणास नैराश्य,चिंता अणि झोपेशी संबंधित इतर कुठल्याही समस्या उद्भवत नाही.
- अशा प्रकारे चिया सीडस मुळे आपणास अनेक गुणकारी लाभ प्राप्त होत असल्याने याला सुपरफुड म्हणून देखील संबोधिले जाते.
चिया सीडसचे अधिक सेवन करण्याचे तोटे –
- चिया सीडसचे नियमित सेवन केल्याने आपणास अनेक फायदे प्राप्त होतात.पण याचे मर्यादित प्रमाणात सेवन करायला हवे अमर्याद पणे सेवन करणे टाळावे.
- कारण कुठल्याही वस्तुचे अन्नपदार्थ किंवा पोषकतत्वाचे अमर्याद सेवन केल्याने ती आपणास हानी देखील पोहोचवू शकते.
- चिया सीडसचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्याने आपणास याचे काही साईड इफेक्ट देखील जाणवू शकतात.
- चिया सीडसचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने ह्या आपल्या घशात अडकुन श्वास घेण्यास त्रास होण्याची संभावना असते.
- चिया सीडसचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने आपणास अॅलर्जी देखील होऊ शकते.
- चिया सीडस मध्ये विपुल प्रमाणात फायबर असते म्हणून याचे मर्यादेपेक्षा अधिक सेवन केल्याने आपणास पचनसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
- ज्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा शारीरिक आजार आहे त्याने याचे सेवन करणयाआधी डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा.