ट्रोपोनिन टी टेस्ट म्हणजे काय? ट्रोपोनिन टी टेस्ट का केली जाते?
आज जागोजागी रोजची चिंता शारीरिक मानसिक ताणतणाव यामुळे हदय विकाराचा झटका येऊन अनेक लोक मृत्युमुखी पडताना आपणास दिसून येतात.
अशा परिस्थितीत जर आपणास आपल्यावर येणारे हार्ट अटॅकचे भविष्यातील संकट टाळायचे आहे तर आपण सतर्क राहणे फार आवश्यक आहे.
आज बाजारात एक अशी चाचणी उपलब्ध झाली आहे जी करून आपण हार्ट अटॅकचा धोका टाळु शकतो.हया चाचणीचे नाव आहे ट्रोपोनिन टी टेस्ट.
ट्रोपोनिन टी टेस्ट ही हदय विकाराचा धोका टाळण्यासाठी केली जात असते.
आज आपल्या भारत देशात दिवसेंदिवस हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चालले आहे यात वृदधांपासुन तरूणांचा देखील यात समावेश असल्याचे आपणास दिसून येते.
याला कारण आपली रोजची जीवनशैली, शारीरिक मानसिक ताणतणाव चिंता, अयोग्य आहार इत्यादी गोष्टी असतात.
मुख्यत्वे बाहेरील उघडयावरचे जंकफुड फास्टफुड इत्यादी अन्न पदार्थ खाल्ल्याने अनेक जणांच्या रक्तामध्ये खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढु लागते ज्यामुळे आपणास उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते.
यामुळे आपणास तरूणपणात तसेच इतर कुठल्याही वयात असताना हार्ट अटॅक येण्याची तसेच हदयाशी संबंधित इतर आजार जडण्याची दाट शक्यता असते.
यासाठी आपण ट्रोपोनिन टी टेस्ट करणे आवश्यक झाले आहे.
ट्रोपोनिन टी टेस्ट म्हणजे काय?ही टेस्ट करणे गरजेचे का आहे?
जर आपल्याला वाटत असेल की चुकीच्या अयोग्य आहाराचे सेवन केल्याने तसेच कुठल्याही ताणतणाव चिंता चुकीच्या जीवनशैलीमुळे आपणास भविष्यात हार्ट अटॅकची समस्या उद्भवू नये तर आपण आपली रक्ततपासणी करणे खुप महत्वाचे आहे.
अणि ह्या रक्त तपासणी चाचणीलाच ट्रोपोनिन टी टेस्ट असे देखील म्हटले जाते.
आज जागोजागी वाढत असलेले हार्ट अटॅकचे प्रमाण बघुन ही चाचणी करण्याकडे लोकांचा कल सध्या अधिक वाढलेला आपणास दिसून येतो.जीवाचा धोका टाळण्यासाठी लोक ही टेस्ट आवर्जून करताना दिसुन येत आहेत.
ज्यांना ह्या गोष्टीची शहानिशा करायची आहे की त्यांना हदयाशी संबंधित कुठलाही आजार जडलेला आहे किंवा नाही त्यांनी ही टेस्ट नक्की करायला हवी.
ह्या टेस्टमुळे जर आपणास हदयाशी संबंधित कुठलाही आजार जडलेला असेल तर रक्त चाचणी दरम्यान त्वरीत डाॅक्टरांना आपणास हदयाशी संबंधित कुठला विकार आहे का हे लक्षात येऊन जाते.
याने हा फायदा होतो की आपल्याला हदयाशी संबंधित कोणता आजार आहे हे आपणास वेळ असताच लक्षात येण्यास मदत होते
अणि मग स्वताच्या जीवाचा बचाव करण्यासाठी आपणास पुढचे उपाय देखील करता येत असतात.
ट्रोपोनिन टी टेस्ट दवारे आपल्या रक्तामध्ये ट्रोपोनिनची पातळी किती आहे हे तपासले जाते ही पातळी प्रमाणात असेल तर ठीक अणि प्रमाणापेक्षा अधिक वाढली असल्यास आपल्या हृदयाच्या स्नायूंना हानी पोहोचते.
ट्रोपोनिन टी टेस्ट कशी केली जाते?
ट्रोपोनिन टी टेस्ट दरम्यान आपल्या शरीरात असलेल्या सोडियम पोटॅशियम क्रिएटिनीन ट्रोपोनिन इत्यादींची पातळी शोधली जाते.
या चारींपैकी एकाचीही पातळी आपल्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आपणास हदय विकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
ही टेस्ट करताना आपल्या हाताच्या नसेला सुई टोचली जाते अणि आपल्या रक्ताचे नमुने घेतले जातात.अणि मग रक्तात
सोडियम पोटॅशियम क्रिएटिनीन ट्रोपोनिन इत्यादींचे असलेले प्रमाण शोधले जात असते.
ट्रोपोनिन टी टेस्ट कधी करायला हवी?
जेव्हा आपल्या छातीत सतत दुखत असेल अणि गळयात देखील वेदना जाणवत असेल तेव्हा आपण ही टेस्ट करायला हवी.
किंवा जबडा दुखणे प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल बैचेनी जाणवत असेल उलट्या होत असतील खुप जास्त थकवा जाणवत असेल तेव्हा देखील आपण ही टेस्ट करायला हवी.
टेस्ट करण्याचे फायदे –
टेस्ट मधुन हदयाशी संबंधित जडलेल्या आजाराचे वेळीच निदान झाल्यास योग्य उपचार करून आपण येणारा हार्ट अटॅकचे संकट टाळु शकतो.