महिलांनी उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची? – Summer Skin Care for women

महिलांनी उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची?

उन्हाळ्याची सुरूवात झाल्यानंतर अनेक महिलांना त्वचेच्या समस्या निर्माण होणे सुरू होत असते.

ज्यात त्वचा काळी पडणे,त्वचेवर चटटे पडु लागणे, त्वचेवर काळे डाग पडणे,त्वचा तेलकट किंवा कोरडी पडु लागणे त्वचा काळवंडणे,त्वचेवर पुळया येणे,घामोळया येणे अशा इत्यादी त्वचेशी संबंधित विविध समस्यांचा सामना महिलांना करावा लागत असतो.

आपल्याला देखील आपल्या सुंदर त्वचेची काळजी घ्यायची असेल आपल्या त्वचेची योग्य पद्धतीने निगा राखायची असेल तर आपणास आम्ही सांगितलेल्या काही महत्त्वाच्या टिप्सचे पालन करणे आवश्यक आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच टिप्सविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

१)कडक उन्हात घराबाहेर पडणे टाळावे –

सर्व महिलांनी कडक प्रखर उन्हात घराबाहेर पडणे सहसा टाळायलाच हवे.

उन्हाळ्याच्या दिवसात सुर्यकिरणांची लाट अतिशय प्रखर असते त्यामुळे सुर्यकिरणांच्या संपर्कात आल्यावर आपल्या चेहऱ्यावर त्वचेवर उष्णतेमुळे काळे डाग लाल चटटे पडत असतात.शिवाय कडक उन्हामुळे आपली त्वचा लवकर डिआयड्रेट देखील होत असते.

अणि समजा आपणास एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणे आवश्यक असेल तर अशा उन्हाळ्यात बाहेर पडताना महिलांनी काॅटनचा स्कार्फ किंवा रूमाल बांधायला हवा.हा स्कार्फ लाईट कलरचा असायला हवा कारण याने महिलांना जास्त आरामदायक वाटत असते.

डोक्याला ऊन लागु नये म्हणून एखादी टोपी देखील परिधान करायला हवी.वरील सर्व टीप्स फाॅलो केल्यास तेजस्वी सुर्यकिरण थेट आपल्या चेहऱ्यावर त्वचेवर पडणार नाही.

२) घराबाहेर पडताना सनस्क्रीन लोशन लावणे –

महिलांनी उन्हाळ्यात घराबाहेर पडताना चेहर्यावर त्वचेवर सन स्क्रीन लावायला हवे.

उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडताना त्वचेवर सनस्क्रीन लावणे खुप फायदेशीर ठरत असते याने त्वचेचा सुर्यकिरणांच्या सोबत होणारा थेट संपर्क टाळण्यास मदत होते.पण हे सनस्क्रीन चांगल्या कंपनीचे असायला हवे.

उन्हात घराबाहेर पडण्याआधी १५ ते २० मिनिट अगोदर महिलांनी हे सन स्क्रीन लोशन लावायला हवे त्यानंतर घराबाहेर पडायला हवे.

See also  सायकोलाॅजी म्हणजे काय?Psychology meaning in Marathi

३) उन्हाळ्यात जास्त हेवी मेक अप करणे टाळायला हवे –

महिलांनी उन्हाळ्यात घराबाहेर पडताना हेवी मेक अप करणे टाळायला हवे.कारण उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने मोकळ्या झालेल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये मेक अपचा थर जाऊन बसतो याने त्वचेच्या आतील भाग अणि केमिकल युक्त मेक अपच्या थर दोघे संपर्कात आल्याने त्वचेशी संबंधित विविध समस्या महिलांना उदभवतात.

उदा, चेहर्यावर पिंपल्स येणे डाग स्पाॅट इत्यादी

४) उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यायला हवे –

उन्हाळ्याच्या दिवसात सर्व महिलांनी शरीराला आवश्यक आहे तेवढे पाणी हायडृरेटेड राहण्यासाठी प्यायला हवे.

याने उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानात देखील आपल्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कारण उन्हाळ्यात आपल्याला जास्तीत जास्त घाम येत असतो म्हणजे आपल्या शरीरातील पाणी घामाच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते अशा परिस्थितीत आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी आपणास भरपुर पाणी पिणे आवश्यक असते.

उन्हाळ्याच्या दिवसात पुरेसे पाणी शरीराला प्राप्त झाले नाही तर आपले शरीर आणि त्वचा दोघे डिहायड्रेटेड होत असतात.

यामुळे उष्माघाताची समस्या देखील होऊ शकते अणि त्वचा कोरडी झाल्याने त्वचेशी संबंधित विविध समस्या महिलांना उदभवतात.

म्हणुन आपल्या शरीराची त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.याने त्वचा नितळ आणि चमकदार बनते.

महिलांनी विविध प्रकारच्या फळांचा रस देखील उन्हाळ्यात घ्यायला हवा याने देखील स्कीन हायड्रेट राहण्यास मदत होते