ऑनलाईन पद्धतीने ईपीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?How to check epf balance online in Marathi

ऑनलाईन पद्धतीने ईपीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?How to check epf balance online in Marathi

आपला ईपीएफओ बॅलन्स हा आपणास घरबसल्या मोबाईल कंप्युटर दवारे देखील इंटरनेटद्वारे चेक करता येत असतो.

आजच्या लेखात आपण ह्याच ऑनलाईन पदधतीने ईपीएफओ बॅलन्स कसा चेक करायचा याची संपूर्ण प्रक्रिया जाणुन घेणार आहोत.

ईपीएफओ बॅलन्स चेक करण्यासाठी जर आपण मोबाईलचा वापर करत असाल तर आपणास सर्वात पहिले आपल्या अॅड्राॅईड मोबाईल मधील क्रोम ब्राऊझर ओपन करून घ्यायचे आहे

यानंतर वर उजव्या बाजूला कोपरयात दिलेल्या तीन डाॅटवर क्लिक करायचे आहे.यानंतर आपणास सर्वात खाली desktop site असे एक आॅप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.

याने आपणास मोबाईल वर देखील कंप्युटर वरील डेस्कटॉप प्रमाणे स्क्रीन करून सर्व माहिती व्यवस्थित बघता येईल.

ईपीएफ बॅलन्स आॅनलाईन चेक करण्याची प्रक्रिया- EPF balance online check process

सर्वात पहिले आपणास क्रोम ब्राऊझर ओपन करून epfindia.gov.in असे सर्च बार मध्ये टाईप करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर ईपीएफ ची आॅफिशिअल वेबसाईट htttps://www.epfindia.gov.in ह्या नावाची वेबसाईट स्क्रीनवर दिसेल ह्या वेबसाईटवर आपणास सर्वप्रथम जायचे आहे.

ईपीएफच्या आॅफिशिअल वेबसाईट वर गेल्यावर आपणास होम पेजवर वेगवेगळे मेनयु दिसुन येतील.यात आपण services नावाच्या आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.

Services ह्या आॅप्शनवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर खालील दिलेल्या प्रमाणे सहा पर्याय येतील.यात आपणास for employees दुसरा पर्याय निवडायचा आहे.

यानंतर आपल्यासमोर अजुन एक पेज ओपन होईल त्यावर स्क्रोल करून आपणास थोडे खाली यायचे आहे.इथे आपणास services, important links,download हे तीन पर्याय दिसुन येतील.यात आपणास services मधील दिलेल्या member passbook वर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर sigh in epf passbook claim status असे नाव येईल येथे आपणास UAN number अणि password टाकुन खाली दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा भरायचा आहे अणि खाली दिलेल्या लाॅग इन बटणावर ओके करायचे आहे.

See also  जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व काय आहे? जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो? -World Book and Copyright Day Quotes 2023

लाॅग इन केल्यावर आपणास आपले सर्वात वर नाव दिसुन येईल.अणि आपल्या नावाच्या खाली आपला UAN number अणि pan card number देखील दिलेला दिसुन येईल.

हिरव्या रंगात काहीतरी माहीती लिहिलेली दिसुन येईल त्याच्याखाली आपणास select member id असे नाव दिसुन येईल.

Select member id यावर क्लिक केल्यावर आपणास मेंबर आयडी दिसुन येईल.ज्यांचे ईएफ पीएफ अकाउंट लिंक आहे त्यांना एक मेंबर आयडी दिसुन येईल ज्यांचे दोन ईएफ पीएफ अकाउंट लिंक आहेत त्यांना दोन मेंबर आयडी दिसुन येतील.

ज्या अकाऊंट मधील बॅलन्स आपल्याला चेक करायचा सर्वप्रथम आपणास ते सिलेक्ट करायचे आहे.

मेंबर आयडी सिलेक्ट केल्यावर आपणास तीन पर्याय दिसुन येतील view passbook new yearly,View claim status,view passbook old full असे तीन पर्याय दिसुन येतील.

ज्यांना नवीन वर्षाचे पासबुक चेक करायचे आहे त्यांनी view passbook new yearly वर क्लिक करायचे आहे अणि ज्यांना नवीन अणि जुने दोघे चेक करायचे आहे त्यांनी view passbook old full वर क्लिक करायचे आहे.अणि ज्यांना आपले क्लेम स्टेटस तपासायचे आहे त्यांनी View claim status वर क्लिक करायचे आहे.

View passbook new yearly तसेच View passbook old full वर क्लिक केल्यावर आपण मेंबर पासबुक करीता ईनाॅमिनेशन केलेले असेल तर हे बुक ओपन होईल अन्यथा नाही.

Claim status वर क्लिक केल्यावर आपणास आपली सर्व क्लेम स्टेटस डिटेल दिसुन येईल

उदा,Claim id, claim receipt date, claim form type,para details,total amount approved, dispatch date, claim status remake इत्यादी सर्व माहिती स्क्रीनवर दिसुन येईल.