सदोष मनुष्य वधाचा गुन्हा म्हणजे काय?हा गुन्हा कधी दाखल केला जातो?
१६ एप्रिल रोजी मुंबई येथील खारगर येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने श्री भक्त उपस्थित होते.पुरस्कार सोहळा सकाळी दहा ते दोन वाजेच्या सुमारास पार पडला होता.
ह्या कालावधीत एप्रिल महिन्यामध्ये अतिशय प्रखर उन्ह असते हे शासनाला माहीत असताना देखील शासनाने जाणुन बुजुन ह्या कडक प्रखर उन्हात ह्या पुरस्कार वितरणाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले.
ज्यात सुमारे २४ श्रीसेवकांची प्रकृती गंभीर आहे अणि दहा ते अकरा श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.
म्हणुन शासनाच्या ह्या हलगर्जीपणासाठी, निष्काळजीपणासाठी शासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे वक्तव्य काॅग्रेस नेते अतुल लोंढे यांनी न्युज चॅनलशी बोलताना केले आहे.
अशावेळी आपल्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणजे काय हा गुन्हा कधी दाखल केला जातो.शासनावर हा गुन्हा दाखल करण्याची मागणी का केली जात आहे?
आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा म्हणजे काय?हा गुन्हा कोणकोणत्या परिस्थितीत दाखल केला जातो? culpable homicide in Marathi
भारतीय दंड संहितेच्या कलम २९९ मध्ये सदोष मनुष्य वध म्हणजे काय याची व्याख्या सांगितली गेली आहे.
एखाद्या मानवाचा बेकायदेशीरपणे वध करणे तसेच बेकायदेशीरपणे त्याची हत्या करणे याला सदोष मनुष्य वध असे म्हटले जाते.असा गुन्हा करणारया व्यक्तीस ३०४ ची शिक्षा लागु होत असते.
जी व्यक्ती एखादयाचा मृत्यु घडवून आणण्यास कारणीभूत असते.
म्हणजे जी व्यक्ती एखादयाचा जाणुन बुजुन मृत्यू घडवून आणण्याच्या उददिष्टासाठी एखादे कृत्य करते.त्याला एखादी शारीरिक हानी पोहचवते किंवा शारीरिक हानी पोहचवण्यासाठी एखादे कृत्य करत असते तेव्हा त्यास सदोष मनुष्य वध असे म्हटले जाते.
हयात एखाद्याचा मृत्यू घडवून आणण्यासाठी कृत्य करणारया व्यक्तीला त्याच्या ह्या कृत्यामुळे समोरच्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असते त्याला हे माहीती असते.तरी देखील तो असे कृत्य करतो म्हणून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येत असतो.
याचसोबत समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यु घडुन येईल अशी एखादी शारीरिक दुखापत त्याला आपण पोहचवली अणि त्यात त्या व्यक्तीचा दुखापत झाल्याने मृत्यू देखील झाला तर हे देखील सदोष मनुष्य वधात येते.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्युस कारणीभूत होईल अशी एखादी इजा पोहचवणे हे देखील सदोष मनुष्य वधाच्या अंतर्गत येते.