द्रौपदी मुर्मु – कोण आहेत राष्ट्रपती उमेदवार – NDA Presidential Candidate of India

भाजपने राष्टपती पदासाठी उमेदवार म्हणुन कोणाची निवड केली आहे?

नुकतीच भाजप पक्षाने आपली राष्टपतीपदाची उमेदवारी घोषित केली आहे.ज्यात द्रोपदी मुर्मु यांची निवड भाजपकडुन करण्यात आली आहे.

काल 21 जुन रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत एक बैठक घेण्यात आली.जी भाजप पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होती.ज्यात राष्टपतीपदाकरीता द्रोपदी मुर्मु यांच्या नावाची निवड केली गेली आहे.

याबाबत भाजप पक्षाचे राष्टीय अध्यक्ष जे-पी नडडा यांनी असे सांगितले आहे की भाजप पक्षातुन पुर्वेकडील विभागातील एखादा उमेदवार राष्टपतीपदासाठी उभा करावा आणि तो उमेदवार महिला गटातील असावा.असा विचार आमच्याकडुन करण्यात आला होता.

आजपर्यत आदीवासी जमातीमधील राष्टपती उमेदवाराला भारतात पाहिले गेले नाहीये याचकरीता तब्बल वीस ते पंचवीस नावांचा विचार करून झाल्यानंतर आदीवासी जमातीमधील महिला उमेदवार म्हणून आम्ही द्रोपदी मुर्मु यांची निवड केली आहे.

भाजपने राष्टपती पदासाठी उमेदवार म्हणुन निवड केलेल्या द्रोपदी मुर्मु कोण आहेत?who is Draupadi Murmu in Marathi

  • द्रोपदी मुर्मु ह्या एक संथाल आदीवासी जमातीमधील महिला आहेत.ज्यांचा जन्म हा 1958 मध्ये ओरिसातील मयुरभंज ह्या जिल्हयामधील बडीपोसी नामक गावात झाला होता.
  • सुरूवातीला त्या शिक्षिका होत्या नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला.2000-20009 मध्ये त्यांनी भाजपचे तिकिट प्राप्त करुन त्यावर आमदारकीचे पद देखील प्राप्त केले होते.
  • त्याच्या आधी त्या 1997 मध्ये रायनगरपुर नावाच्या नगर पंचायती मधुन नगरसेवक म्हणून निवडुन आल्या होत्या.
  • यानंतर त्या आदीवासी जमातीमधील राष्टीय उपाध्यक्ष देखील बनल्या होत्या.त्यानंतर द्रोपदी मुर्मु यांनी मत्स्य विभागाचे मंत्रीपद देखील भुषविले होते.
  • द्रोपदी मुर्मु ह्या 2015 साली झारखंड ह्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल देखील होत्या.द्रोपदी मुर्मु यांनी भाजप मध्ये देखील यापुर्वी कार्य केले आहे.
See also  अभियंता दिनाचे महत्त्व - Engineers Day2023

द्रोपदी मुर्मु देशाच्या राष्टपती झाल्यानंतर काय होईल?

जर द्रोपदी मुर्मु यांची राष्टपती पदावर निवड झाली तर आपल्या भारत देशाच्या राजकारणामध्ये आदीवासी जमात जी एक वंचित शोषित जमात म्हणुन ओळखली जाते तिला आपल्या देशाच्या राजकारणात पहिल्यांदा एवढे मोठे आणि महत्वाचे स्थान प्राप्त होणार आहे.
द्रोपदी मुर्मु ह्या एनडीए उमेदवार असतील.

द्रोपदी मुर्मु यांच्या वडिलांचे नाव काय आहे?

द्रोपदी मुर्मु यांच्या पित्याचे नाव बिरची नारायण तुडु असे आहे.

द्रोपदी मुर्मु यांच्या पतीचे नाव काय आहे?

द्रोपदी मुर्मु यांच्या पतीचे नाव श्यामचरण मुर्मु असे आहे.

द्रोपदी मुर्मु यांना किती अपत्ये आहेत?

द्रोपदी मुर्मु यांना एकुण तीन अपत्य आहेत.

द्रोपदी मुर्मु ह्या व्यवसायाने कोण आहेत?

द्रोपदी मुर्मु ह्या भाजप पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्या आहेत.

विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव राष्टपतीपदासाठी पुढे करण्यात आले आहे?

विरोधी पक्षाने आपल्याकडुन यशवंत सिन्हा यांचे नाव राष्टपती पदासाठी पुढे केले गेले आहे.दिल्ली येथे विरोधी पक्षाची जी बैठक घेण्यात आली होती तिथे हे नाव निवडण्यात आले आहे.

विरोधी पक्षाकडुन बैठक घेण्यात आली त्यानंतर त्यांचे नेते जयराम यांनी ही महत्वाची घोषणा केली होती.

कोण होणार भारताचा नवीन राष्टपती?Who will next president of India in Marathi

आता सगळयांचे याच गोष्टीकडे लक्ष लागुन आहे की द्रोपदी मुर्मु आणि यशवंत सिन्हा या दोघा राष्टपती पदाच्या उमेदवारांमध्ये कोणाची देशाच्या राष्टपती पदासाठी निवड होते.