मानवी शरीरातील प्रमुख सात चक्रांविषयी माहीती – 7 Chakra in Human body and it’s meaning

Table of Contents

मानवी शरीरातील प्रमुख सात चक्रांविषयी माहीती

आज पाश्चात्य देश च न्हवे तर संपूर्ण जगात आणि भारतात ही मानवी शरीरातील चक्राचीं माहिती घेतली जात आहे.

चक्र काय असतात?

चक्र ज्याला आपण संस्कृतभाषेत कक्र ही म्हणून संबोधतो ,बोली भाषेत आपण ज्याला चाक म्हणू शकतो ,. हे चक्र मानवी शरीरातील महत्त्वाचे उर्जावान बिंदू कुठं असतात ते दर्शवते. अस म्हटलं जातं की सर्व उर्जाबिंदू हे खुले असावेत व एकमेकांत सुसंवाद असावा कारण हे बिंदू शारीरिरातील मुख्य अवयव व मज्जातंतू शी जोडले गेलेले असतात व या सर्वात असणाऱ्या समनवयातून आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जोपासलं जाते.

1)मुलाधार चक्र :

आपल्या शरीरात मुलाधार चक्राचे स्थान कोठे असते?

मुलाधार चक्र हे आपल्या पाठीच्या कण्याच्या प्रारंभी असते.

मुलाधार चक्रामुळे आपणास एक वेगळीच चेतनाशक्ती प्राप्त होत असते.याचसोबत आपणास जोम अणि संवर्धन देखील मिळत असते.

आपल्या शरीरातील मुलाधार हे चक्र जर योग्य पदधतीने कार्यरत असले संतुलित असेल तर काय होत असते?

आपल्या शरीरातील मुलाधार चक्र व्यवस्थित कार्य करत असेल तसेच ते संतुलित असेल तर आपले आरोग्य स्वास्थ्य हे नेहमी चांगले राहत असते.आणि आपण शारीरीक दृष्टया सक्रीय राहत असतो.

आपल्या शरीरातील मुलाधार चक्र असंतुलित झाल्यानंतर काय होत असते?

● जर आपले मुलाधार चक्र हे अतिसक्रीय असेल तर आपण छोटछोटया कारणांवरून आक्रमक होऊन चिडचिड,संताप करू लागतो.अशी व्यक्ती लोकांना धमकावु देखील लागते.

तसेच आपल्यात लोभी प्रवृत्ती निर्माण होत असते.आपण भौतिक सुखवस्तुंना अधिक महत्व देऊ लागतो.

● आणि समजा आपले मुलाधार चक्र हे निम्न प्रमाणात सक्रीय असेल तर आपल्याला नेहमी असुरक्षिततेची जाणीव होत असते.आपण मातीशी एकनिष्ठ राहण्यास असमर्थ ठरत असतो.

आपण बाहेरच्या जगामध्ये जास्त मिळत मिसळत नाही.एकटे राहु लागतो.आपल्याला आपली रोजची दैनंदिन जीवणातील कार्ये पुर्ण करता येत नसतात.आपण आपल्या कामात शिस्तबदध राहु शकत नसतो.

● ज्या व्यक्ती नेहमी चिंतेने ग्रस्त राहतात,लाजाळु स्वभावाचे असतात सतत अति बैचेन राहत असतात त्यांचे मुळ चक्र कमी प्रमाणात सक्रीय राहत असते.

मुलाधार चक्राला उघडण्यासाठी काय करावे?

● यासाठी आपणास आपल्या पाठीच्या कण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे लागते.आणि पाठीच्या कण्यावर लक्ष केंद्रित करताना कमळाच्या फुलाची कल्पणा करावी लागते.

● पृथ्वीला मुलाधार चक्राचे तत्व मानण्यात येते.असे म्हटले जाते की पायात वाहन न घालता गवत तसेच वाळुवर चालल्याने हा चक्र उघडत असतो.किंवा आपण पायाची सफाई करून डान्स करून देखील ह्या चक्राला प्रभावित करू शकतो.

● लाल रंग असलेले सफरचंद,डाळींब,स्ट्राँबेरी इत्यादी खाद्य पदार्थ हे ह्या पहिल्या चक्राला पोषक ठरत असतात.

● कुठल्याही निवासाकरीता सरळ वास्तुचे सिदधांत ध्यानात ठेवणे आणि अनुकुल दिशेला सामोरे जाणे हा मुलाधर चक्र उघडायचा उत्तम पर्याय आहे.

असंतुलित मुलाधार चक्राच्या असंतुलित असण्यामुळे आपणास कोणते आजार,समस्या जडत असतात?

● गुडघे दुखी

● भुक मंदावणे

● संधीवाताचा त्रास

● लठठपणा

● माकड हाडाची समस्या

मुलाधार चक्राचा रंग -लाल

मुलाधार चक्राचा मंत्र -लम हा आहे.

2)स्वाधिष्ठान चक्र :

आपल्या शरीरात स्वाधिष्ठान चक्राचे स्थान कोठे असते?

See also  हर घर तिरंगा निबंध तसेच भाषण - Har Ghar Tiranga Essay And Speech In Marathi

स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या माकड हाडामध्ये ओटीपोटीच्या भागात,पाठिच्या कण्याच्या तळाला आपल्या बेंबीच्या केंद्रभागी असते.

स्वाधिष्ठान चक्राला धार्मिक किंवा उदरचक्र असे देखील संबोधिले जाते.हे आपल्या शरीरामधील दुसरे चक्र असते.

स्वाधिष्ठान चक्र ही एक अशी जागा आहे.जिथे आपणास प्रथम जाणीव व्हायला आरंभ होत असतो.हा मानवी विकासाचा दुसरा टप्पा मानला जातो.

स्वाधिष्ठान चक्र हे नकारात्मक लक्षणाची अनुभुती झाल्यावर त्यांना नष्ट करत असते आणि आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करत असते.

आपल्या शरीरातील स्वाधिष्ठान चक्र जर योग्य पदधतीने कार्यरत असेल,संतुलित असेल तर काय होत असते?

ज्या व्यक्तीच्या शरीरातील स्वाधिष्ठान चक्र योग्य आणि संतुलित पदधतीने काम करते तो व्यक्ती निर्मितीशील सर्जनशील भावणा व्यक्त करणारा असतो.अशा व्यक्तीमुळेच निरोगी आणि संतुष्ट नाती तसेच संबंध यांची निर्मिती होते.

अशा व्यक्ती स्वभावाने प्रामाणिक आणि नैतिकतेचे पालन करणारे असतात.यांना नात्याची किंमत असते.

आपल्या शरीरातील स्वाधिष्ठान चक्र असंतुलित झाल्यानंतर काय होत असते?

● ज्या व्यक्तीच्या शरीरातील स्वाधिष्ठान चक्र अतिक्रियाशील झालेले असते अशी व्यक्ती खुप स्वप्नाळु भावुक स्वभाव असलेली आणि नाटकी असते.अशी व्यक्ती लैंगिक आसक्तीने ग्रस्त असते.

● ज्या व्यक्तीच्या शरीरातील स्वाधिष्ठान चक्र हे निम्न क्रियाशील झालेले असते.अशी व्यक्ती भावनिकदृष्टया अस्थिर आणि खुप संवेदनशील स्वभावाची असते.त्याच्या मनात अपराधीपणाची अप्रतिष्ठेची भावना भरलेली असते.अशी व्यक्ती संसार सुखापासुन नेहमी दुर राहत असते.अशा व्यक्तीला गर्दीगोंधळापासुन दुर एकट राहायला आवडत असते.

असंतुलित स्वाधिष्ठान चक्रामुळे आपणास कोणते आजार जडत असतात?

असंतुलित स्वाधिष्ठान चक्रामुळे आपणास पुढील आजार जडत असतात-

● नपुंसकत्व

● स्नायु दुखी

● पाठीत दुखणे

● उदासिनत्व

● अँडोमँट्रीओसिस

● पीसी-ओएस

स्वाधिष्ठान चक्राला उघडण्यासाठी काय करावे?

● स्वाधिष्ठान चक्र हे स्नायुमध्ये ताठरता निर्माण झाल्याने अवरूदध होत असते.

● धावणे,पळणे,नाचणे अशा शारीरिक क्रिडांमुळे हे चक्र उघडत असते.याच्या अभ्यासामुळे आपल्या स्नायुंना शिथिलता प्राप्त होत असते.आणि हे चक्र उघडत असते.

● बेंबीच्या भागाच्या अवतीभोवती लक्ष केंद्रित करून नारंगी रंगाची कल्पणा करणे,नारंगी रंगाची वस्त्रे परिधान करणे,नारंगी रंग असलेल्या परिसरात बसणे यासाठी अधिक फायदेशीर ठरत असते.

● काही योगासने अशी आहेत ज्यांच्या केल्याने दुसरया चक्राचे संतुलन होत असते.
उदा, बलासन,त्रिकोणासन,नटराजासन,बित्तीलासन इत्यादी.

● घरात तसेच कुठल्याही कार्यस्थळी सरळ वास्तुच्या सिदधांताचे अनुकरण केल्यास कुठलेही कार्य करत असताना अनुकुल दिशेचा सामना करून हे चक्र संतुलित केले जाते.

● ह्या चक्रात बदाम,संत्रे,मध,खरबुज इत्यादी खाद्य पदार्थ समाविष्ट होत असतात.

3) मणिपुर चक्र :

आपल्या शरीरात मणिपुर चक्राचे स्थान कोठे असते?

आपल्या शरीरात मणिपुर चक्र हे केंद्रस्थानी आणि बरगडीच्या खालच्या बाजुला राहत असते.

मणिपुर चक्र हे आपल्या शरीरातील तिसरे चक्र असते जे आपल्या ईच्छाशक्तीला नियंत्रित करण्याचे कार्य करते.ह्या चक्राला चेतनेचा केंद्रबिंदु देखील मानण्यात येते.याने आपल्या शरीरामधील अंतर्गत उर्जेचे संतुलन राखले जाते.

आपल्या शरीरातील मणिपुर हे चक्र जर योग्य पदधतीने कार्यरत असले संतुलित असेल तर काय होत असते?

● आपण नेहमी खंबीर आणि आत्मविश्वासाने भरलेले राहत असतो.

● आपण आपले ध्येय साधण्याकरीता सुखद जीवणाचा त्याग करत असतो.

● आपण स्वतावर प्रेम करण्यासोबत इतरांवर देखील प्रेम करत असतो.

● आपण इतरांचा नेहमी आदर सम्मान करतो.

● आपल्यात नेतृत्व गुण विकसित होत असतो.

आपल्या शरीरातील मणिपुर चक्र असंतुलित झाल्यानंतर काय होत असते?

● जेव्हा आपल्या शरीरातील मणिपुर हे चक्र अतिसक्रिय होत असते तेव्हा आपण अत्यंत तापट अणि आग्रही स्वभावाच्या होतो.आपला स्वभाव अधिक उत्साही बनतो जो नियंत्रित करणे गरजेचे ठरते.आपला स्वभाव लगेच राग येण्यासारखा झालेला असतो.

● जेव्हा आपल्या शरीरातील मणिपुर चक्र निम्न प्रमाणात सक्रीय असते तेव्हा आपल्यातील आत्मविश्वास आत्मसम्मानाची भावना कमी झालेली असते.आपल्याला विविध भावनात्मक अडचणींना सामोरे जावे लागते.आपला स्वभाव हा घाबरट बनतो.आपल्यामध्ये अशांतता असते,आपल्याला सतत पराभव अपयश मिळण्याचे भय वाटत असते.ज्यामुळ आपण कोणतेही काम करण्याआधी दुसरयांचा सल्ला घेतो.

मणिपुर चक्राला उघडण्यासाठी काय करावे?

● मणिपुर चक्र उघडण्याकरीता आपण आपल्या नाभी क्षेत्रावर आपले ध्यान केंद्रीय करावे.

● पिवळया रंगाची कल्पणा करायला हवी.पिवळया रंगाचे वस्त्र परिधान करायला हवे.आपल्याला जी काही ध्यानधारणा करायची असेल ती पिवळया रंगाच्या खोलीत बसुनच करायला हवी.

● लिंबु तसेच सिंट्रोनेलचे तेल विशिष्ट जागी लावल्यास मणिपुर चक्र सक्रीय होण्यास मदत होते.

● काही योगासने केल्याने देखील मणिपुर चक्र सक्रीय होते.

See also  NGO म्हणजे काय ? NGO information in Marathi

उदा, भुजंगासन,बित्तीलासन उत्त्रासन इत्यादी.

● घरास वास्तुनुरूप बनविण्यासाठी निद्रेच्या वेळेस,तसेच अभ्यास तसेच कुठलेही काम करत असताना करत असताना ह्या चक्राला सक्रीय करण्यासाठी आपण दिशेच्या विज्ञानाचे पालन करायला हवे.

● नृत्य, कसरत,खेळ ह्या काही शारीरिक क्रियाकल्पांदवारे मणिपुर चक्र उघडले जाऊ शकते.

● हे चक्र उघडण्यासाठी पिवळा रंग असलेले रत्न तसेच किस्टल धारण करणे हा एक चांगला पर्याय आहे.

● शेवंती,सुर्यफुलाची बी तसेच हळद इत्यादी पिवळया रंगाच्या खाद्यपदार्थाने आपले सौर पेशी चक्र हे संतुलित राहत असते.

असंतुलित मणिपुर चक्रामुळे आपणास कोणते आजार समस्या जडत असतात?

● हाय ब्लड प्रेशर

● रक्तातुन साखर कमी होणे

● पचनासंबंधिचे इतर आजार

● डायबिटीस

इत्यादी.

4) अनाहत चक्र :

आपल्या शरीरात अनाहत चक्राचे स्थान कोठे असते?

अनाहत चक्र हे आपल्या शरीरात छातीच्या मध्यभागी राहत असते.

अनाहत चक्र हे आपल्या शरीरातील चौथे चक्र आहे.हे इतरांबरोबर सामायिक झालेल्या नात्याला नियंत्रित करण्याचे काम करते.

आपल्या शरीरातील अनाहत चक्र संतुलित असेल तर काय होत असते?

आपल्या शरीरातील अनाहत चक्र संतुलित असल्यास आपल्या मनामधल्या सर्व ईच्छांची पुर्तता होत असते.असे व्यक्ती निस्वार्थी स्वभावाचे असतात.हे निरपेक्ष प्रेम करण्यामध्ये सक्षम असता.

अनाहत चक्राचा रंग -हिरवा

अनाहत चक्राचा मंत्र -यम हा आहे.

आपल्या शरीरातील अनाहत चक्र असंतुलित झाल्यानंतर काय होत असते?

● जेव्हा आपल्या शरीरातील अनाहत चक्र अतिसक्रिय होते तेव्हा आपण राग,उदासिनता,ईर्ष्या आनंद इत्यादी भावनेने भारावले जातो.तसेच आपणास अपमानास्पद नात्यामध्ये जीवण व्यतीत करावे लागते.

● जेव्हा आपल्या शरीरातील अनाहत चक्र निम्न सक्रीय असते तेव्हा आपणास स्वताचाच तिटकारा वाटु लागतो आपण काही कामाचे नाही अशी भावना मनात निर्माण होत असते.अशी लोक स्वताच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडत असतात.

अनाहत चक्र उघडण्यासाठी काय करावे?

● सर्वावर मनात निरपेक्ष भावना ठेवून प्रेम करणे ही हे चक्र उघडण्याची पदधत आहे.जे व्यक्ती स्वतावर प्रेम करतात स्वताविषयी कृतज्ञता बाळगतात असेच व्यक्ती इतरांवर प्रेम करत असतात.

● गरूडासन,गोमूखासन ही काही अशी योगाची आसने आहेत जी करून आपण हे चक्र उघडु शकतो.

● जेव्हा आपण ध्यानधारणा करतो तेव्हा आपण मनामध्ये हिरव्या रंगाची कल्पणा करायला हवी.हिरवे वस्त्र परिधान करून हिरव्या रंगाच्या खोलीत बसुन ध्यान करून आपण हे चक्र उघडु शकतो.

● हे चक्र उघडण्याकरीता पायात काहीही वाहन घालू नये आणि हिरव्यागार गवतावर बसुन राहावे.

● खडा रत्न धारण करून हरित रंगाचे किस्टल जवळ बाळगल्याने हे चक्र संतुलित होते.

● आपल्या घरामधल्या वास्तुनुरूप खोलीमध्ये अनुकुल दिशेने झोपले तर हे चक्र उघडु शकते.

● अनाहत चक्रामध्ये हिरव्या रंगाच्या सफरचंदाचा,हिरव्या रंगाच्या पालेभाज्यांचा लिंबु काकडी इत्यादी पदार्थ समाविष्ट असतात.

अनाहत चक्राच्या असंतुलित असण्यामुळे आपणास कोणते आजार जडत असतात?

● हदय चक्र जर असंतुलित असेल तर आपणास हदयाशी संबंधित आजार,रक्तदाबाची समस्या,फुफ्फुसांचा किंवा स्थनांचा कँन्सर,दमा,क्षयरोग असे अनेक आजार जडु शकतात.

5) विशुदध चक्र :

आपल्या शरीरात विशुदध चक्राचे स्थान कोठे असते?

आपल्या शरीरात हे चक्र गळयाच्या दिशेने उघडत असते.

विशुदध चक्रालाच कंठचक्र असे संबोधिले जात असते.हे आपल्या शरीरातील पाचवे चक्र असते.विशुदध म्हणजे शुदधीकरण फक्त शरीराचे नव्हे तर आत्मयाचे देखील.

हे चक्र देवाणघेवाण आणि वक्तव्याचे केंद्र मानले जाते.ऐकणे,ऐकण्याची शक्ती हे कंठ चक्राच्या माध्यमातुन नियंत्रित केले जात असते.

विशुदध चक्राचा मंत्र हम आहे

विशुदध चक्राचा रंग निळा आहे.

आपल्या शरीरातील विशुदध चक्र संतुलित असल्यास काय होत असते?

● जर आपल्या शरीरातील विशुदध चक्र संतुलित असेल तर आपल्या आवाजामध्ये अनुनादासोबत स्पष्टता येते.तसेच आवाजात स्वच्छता लयबदधता भिनवली जात असते.

आपल्या शरीरातील विशुदध चक्र असंतुलित झाल्यानंतर काय होत असते?

● आपल्या शरीरातील विशुदध चक्र अतिसक्रिय झाल्यास आपण ओरडुन बोलू लागतो.कोणाचे ऐकुन न घेता अधिकार गाजवत ओरडुन बोलु लागतो.ज्यात आपल्या आवाजात भारदस्तपणा कर्कशपणा असतो.आपण इतरांच्या बाबतीत स्वताचे मत तयार करू लागतो.आपण कुठल्याही घटना प्रसंगाचे अतिविश्लेषण करू लागतो.

● जेव्हा आपल्या शरीरातील विशुदध चक्र हे निम्न प्रमाणात सक्रीय असते.तेव्हा आपण कुजबुज करू लागतो,लाजुन बोबडे बोलू लागतो.आपणास कोणाशीही संभाषण करणे अवघड जात असते.बोलताना योग्य त्या शब्दांचा वापर करण्यास त्रास होत असतो.

आपल्या शरीरातील विशुदध चक्र उघडण्यासाठी काय करावे?

● विशुदध चक्रामुळे आपण विचारांची जी आदान प्रदान करत असतो त्यावर नियंत्रण होत असते.

See also  ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? What is Operating System in Marathi

● खर बोलून,दुसरयांना आपल्याजवळ मत विचार व्यक्त करू देऊन हे चक्र आपण उघडु शकतो.

● विशुदध चक्र उघडण्यासाठी आपण जप करायला हवा,गाणे गायन करणे,चित्र काढत बसणे अशा कलात्मक कृती करायला हव्यात.

● विशुदध चक्र उघडायला आपण ध्यान धारणा करायला हवी.आणि ध्यान करताना निळया रंगाची कल्पणा करायला हवी.

● आभाळाच्या खाली तसेच समुद्राच्या सान्निध्यात बसुन आपण पाचव्या चक्रावर आपले ध्यान केंद्रीय करायला हवे.याचसोबत कंठ चक्र संतुलित करायला आपण निळे रत्न किंवा खडा याचा वापर करू शकतो.

● विदयार्थ्यांनी विशुदध चक्र उघडण्याकरीता आपली खोली नेहमी वास्तुशास्त्रानुरूप ठेवायला हवी.तसेच अभ्यास करताना सुदधा विदयार्थ्यांनी अनुकुल दिशेकडे तोंड करून बसायला हवे.

● अशी फळ ज्यांच्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे असे खाद्यपदार्थ विशुदध चक्र उघडण्यासाठी वापरले जात असतात.

विशुदध चक्राच्या असंतुलित असण्याने आपणास कोणते आजार जडत असतात?

● पाठ दुखणे

● मान दुखणे

● दाताच्या हिरडयांच्या इतर समस्या

● घसा खवखवू लागणे

इत्यादी.

6) अजना चक्र :

आपल्या शरीरात अजना चक्राचे स्थान कोठे असते?

आपल्या शरीरात अजना चक्र दोन्ही भुवयांच्या आत असते.नाकाच्या पुल असलेल्या थोडे वर असते.

हे चक्र आपल्या डोळयांच्या मागील बाजुला तसेच डोक्याच्या मध्यभागी असते.

अजना चक्र हे आपल्या शरीरातील सहावे चक्र आहे.यालाच अंतदृष्टी चक्र असे देखील म्हटले जाते.हे चक्र आपणास स्वताची सत्यता वास्तविकता जाणुन घेऊन ज्ञानाचे दरवाजे खुले करण्यास साहाय्य करते.

अजना चक्राचा रंग -नीळ

अजना चक्राचा मंत्र- ओम

अजना चक्राच्या असंतुलित असण्याने आपणास कोणते आजार जडत असतात?

● डोके दुखणे

● दृष्टीदोषाचे आजार

● सायनसचा आजार

● आपल्यामध्ये हटटीपणा रागीटपणा निर्माण होतो

आपल्या शरीरातील अजना चक्र संतुलित असल्यास काय होत असते?

● ज्या व्यक्तीचे अजना चक्र संतुलित आहे अशा व्यक्तीचे व्यक्तीमत्व दिसायला आकर्षक असते.

● हे व्यक्ती स्वभावाने प्रसन्न असतात.इतरांबददल कुठलेही पुर्वग्रह हे बाळगत नसतात.

● आपल्या शरीरातील अजना चक्र संतुलित असल्यावर आपणास आपली स्वप्रे आणि त्यांचे अर्थ देखील कळु लागतात.तसेच आपली स्मरणशक्ती चांगली होते.

आपल्या शरीरातील अजना चक्र असंतुलित झाल्यानंतर काय होत असते?

● आपल्या शरीरातील अजना चक्र अतिसक्रिय झाल्यास आपण कुठल्याही बाबतीत अतिकल्पणा करू लागतो,काल्पणिक जगामध्ये जगु लागतो.वास्तविकतेपासुन दुर जाऊ लागतो.आपणास वारंवार भीतीदायी स्वप्रे पडु लागतात.आपले लक्ष कुठल्याही गोष्टीवरून सहज विचलित होत असते.आणि आपली वृत्ती आलोचनात्मक आणि सहानुभुतीहीन बनु लागते.

● आपल्या शरीरातील अजना चक्र निम्न सक्रीय असल्यास आपली स्मरणशक्ति कमजोर होते.कुठलीही गोष्ट शिकण्यास अडथळा येतो कुठल्याही वस्तु किंवा घटनेची कल्पणा करणे कठिन होते.अशा व्यक्तींमध्ये नेहमी अंतज्ञानाचा अभाव दिसुन येत असतो.यांची कुठल्याही व्यवहारामधील भुमिका नकारात्मक ठरते.

अजना चक्र उघडण्यासाठी काय करावे?

● अजना चक्र उघडण्यासाठी डोळे बंद करावे आणि आपल्या उद्योग व्यवसाय,नातेसंबंध इत्यादी विषयी सकारात्मक विचार करून आपण हे चक्र उघडू शकतो.

● जांभळया तसेच निळया रंगाची रत्ने ही ह्या चक्राचा समतोल राखण्यास फायदेशीर ठरतात.

● वास्तुनुरूप घरात योग्य ते बदल करावेत.

● जी गोष्ट जशी असेल तशी ती स्वीकारायला हवी.आणि तिची कल्पणा देखील करावी.

● ओमेगा फँटी अँसिड तसेच इतर प्रथिनांनी युक्त असलेल्या पदार्थाचे सेवण करायला हवे.याने आपल्या मेंदुच्या आकलन शक्तीमध्ये आमुलाग्र वाढ होते.

7) सहस्त्र चक्र :

आपल्या शरीरात सहस्त्र चक्राचे स्थान कोठे असते?

सहस्त्र चक्र हे आपल्या दोघे कानांच्या मध्यरेखेत असते.हे चक्र आपल्या डोक्याच्या शीर्ष भागी टाळुवर असते.

सहस्त्र चक्रास मुकुट चक्र असे देखील म्हणतात.हे आपल्या शरीरातील सातवे चक्र आहे.सहस्त्र चक्र विश्वाचे आणि स्वताचे पुर्णपणे भान ठेवत असते आणि यात आपली बुदधी परमेश्वराच्या अध्यात्मिक ऐकतेचे प्रतिनिधित्व आपण करत असतो.ह्या चक्राचा कोणत्याही प्रकारच्या रंगाशी विशेष संबंध नसतो.हा एक अत्यंत पवित्र प्रकाश असतो.

सहस्त्र चक्राच्या असंतुलित असण्याने आपणास कोणते आजार तसेच समस्या जडत असतात?

● डोके दुखणे

● नैराश्यता

● मज्जा तंतुशी संबधित विकार

● अल्जायमर

● अधार्गवायु

आपल्या शरीरातील सहस्त्र चक्र संतुलित असल्यास काय होत असते?

● आपल्या शरीरातील हे चक्र संतुलित असल्यास आपल्याला आंतरीक शांततेची प्राप्ती होते.

● आपला विश्वास ज्ञानात परिवर्तित होतो आणि आपल्या आत्मजागृकतेत वाढ होत असते.आपले व्यक्तीमत्व उठावदार आणि आकर्षक राहते.

आपल्या शरीरातील सहस्त्र चक्र असंतुलित झाल्यानंतर काय होत असते?

● आपल्या शरीरातील सहस्त्र चक्र अतिसक्रिय होते तेव्हा आपण वेडयासारखे वागु लागतो.विचार करत बसतो.भूतकाळ किंवा भविष्य काळाविषयी चिंता करू लागतो.आपणास अध्यात्माचे वेड लागु लागते.आणि आपण रोजच्या दैनंदिन कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू लागतो.

● आपल्या शरीरातील सहस्त्र चक्र निम्न सक्रिय असते तेव्हा आपण स्वार्थी बनु लागतो.अध्यात्म तसेच वैयक्तिक बाबींची जाणीव आपणास राहत नाही ज्याने आपले नुकसान होऊ लागते.उददिष्टहीन जीवणामुळे निराशा जाणवू लागते.आपल्या नैतिकतेमध्ये नितीमत्तेत कमी असते.कारण आशा व्यक्तीला सर्वशक्तिशाली शक्तीकडून मार्गदर्शन घेता येत नसते.

सहस्त्र चक्र उघडण्यासाठी काय करावे?

● सहस्त्र चक्र उघडण्यासाठी आपण ध्यान धारणा करायला हवी.आणि आपल्या डोक्याच्या शिरोभागी आपले लक्ष केंद्रित करायला हवे.

● जांभळया रंगाची कल्पणा करून कृतज्ञता सर्वशक्तीमानाप्रती व्यक्त करून हे चक्र आपण उघडु शकतो.

● शवासन आणि पदमासन करून आपण हे सातवे चक्र उघडु शकतो.कारण ही योगाची आसने केल्याने मेंदुला रक्ताचा प्रवाह होतो.आणि हे चक्र उघडले जाते.

● घरात वास्तुनुरुप दिशा आणि इतर संकल्पणांचे अनुसरून करून आपण हे चक्र उघडु शकतो.

● हे चक्र उघडण्याकरीता आपण हलकाफुलका आहार घ्यायला हवा.

उदा, जांभळा रंग असलेले फण भाजी इत्यादी.

1 thought on “मानवी शरीरातील प्रमुख सात चक्रांविषयी माहीती – 7 Chakra in Human body and it’s meaning”

  1. आपल्या शरीरात चंद्र उपचक्र कोठे आहे बाकीची माहिती उत्तम

Comments are closed.