गूगल क्लासरुम विषयी संपूर्ण माहीती – Google classroom Information in Marathi

Table of Contents

Google classroom विषयी संपूर्ण माहीती – Information in Marathi

 आज आपण सगळेच जण गूगल क्लासरूम ह्या अँपचा वापर डिजीटल शिक्षणासाठी करताना आपणास दिसुन येत आहे.एक वेळ अशी की आपल्याला दुर शाळा काँलेजपर्यत चालत जावा लागायचे आणि मग तासिकेचा लाभ घेता यायचा.

पण आता तसे अजिबात राहिलेले नाहीये.कोरोनाच्या कालावधीत जेव्हा आपण शाळा आणि काँलेजमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकत नव्हतो.तेव्हा विदयार्थ्यांच्या अभ्यासासाठी एक अँप वापरण्यास सांगण्यात आले होते.

त्या अँपचे नाव आहे गुगल क्लासरूम.

आज विदयार्थी गुगल क्लासरूमचा,झूम मिटिंग यासारख्या अँपचा वापर करून आँनलाईन शिक्षण घेऊ शकतात.आणि शिक्षक देखील आपल्या विदयार्थ्यांचा आँनलाईन पदधतीने अभ्यास घेऊ शकतात.त्यांना गुगल क्लासरूमचा वापर करून आँनलाईन असाइनमेंट तसेच होमवर्क देऊ शकतात.त्यांची हजेरी घेऊ शकतात.त्यांना ग्रेड देखील देऊ शकतात.एवढी सुविधा ह्या अँपमुळे आपल्याला प्राप्त झाली आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच गुगल क्लासरूम अँपविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

गूगल क्लासरूम काय आहे?

 गुगल क्लासरूम हे गुगलनेच निर्माण केलेले एक अँप आहे.ज्याची निर्मिती शाळा आणि काँलेजातील मुलांच्या आँनलाईन शिक्षणासाठी करण्यात आली आहे.ह्या अँपच्या माध्यमातुन शिक्षक आणि विदयार्थी यांच्यात संवाद होतो.विचारांची देवाणघेवाण होते.

शिक्षक आपल्या विदयार्थ्यांचा आँनलाईन अभ्यास घेऊ शकतात.त्यांना होमवर्क तसेच असाइनमेंट देऊ शकतात.अभ्यासासाठी आवश्यक ती सामग्री विदयार्थ्यांना पुरवू शकतात.विदयार्थी देखील ह्या अँपचा वापर करून आपल्याला दिलेल्या असाइनमेंट तसेच होमवर्क पुर्ण करून सबमीट करू शकतात.

गुगल क्लासरूम अँप कधी आणि केव्हा सुरू करण्यात आली होती? Google classroom Information in Marathi

  गुगल क्लासरूम ही अँप सर्वप्रथम 12 आँगस्ट रोजी 2014 साली सुरू करण्यात आली होती.

गूगल क्लासरूमचा वापर कसा करायचा?

 सगळयात पहिले आपण गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन गुगल क्लासरुम असे सर्च करावे.मग प्ले स्टोअरमधून गुगल क्लासरूम ही अँप डाऊनलोड तसेच इंस्टाँल करून घ्यावी.

  • नंतरून अँप ओपन केल्यावर आपल्यासमोर गेट स्टार्ट नावाचे आँप्शन येते त्यावर ओके करावे.आणि ज्या जिमेल अकाऊंटद्वारे आपल्याला अँपमध्ये लाँग इन करायचे आहे तो जिमेल आयडी सिलेक्ट करून घ्यायचा.आणि त्यावर क्लीक करावे.
  • वरती डाव्या बाजुला आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसुन येतील ज्यात क्लासेस,कँलेंडर,नोटिफिकेशन,आर्चिव्ह क्लासेस,क्लासरूम फोल्डर,सेटिंग,हेल्प,प्राईवेसी पाँलिसी,टर्म सर्विसेस इत्यादी पर्यायांचा समावेश असेल.वर दिलेल्या जीमेल वर ओके करून इथे आपण आपला जिमेल आयडी देखील बदलु शकतो.

गुगल क्लासरूममध्ये शिक्षकांनी नवीन क्लास कसा तयार करायचा?विदयार्थ्यांनी क्लास जाँईन कसा करायचा?

 गुगल क्लासरूम अँपमध्ये उजव्या बाजुला काँर्नरला आपल्याला एक +चे चिन्ह दिलेले असते.तिथे आपल्याला दोन पर्याय दिसुन येतात.

 1) क्रिएट क्लास :

 2) जाँईन क्लास

  1)क्रिएट क्लास :

जर आपण शिक्षक असाल तर आपण क्रिएट क्लास हे आँप्शन सिलेक्ट करायला हवे.यानंतर मग क्लासमध्ये कितव्या इयत्तेच्या विदयार्थ्यांसाठी क्लास तयार करायचा आहे.क्लासचे नाव,त्यांची तुकडी वर्ग काय आहे?त्यांचा विषय इत्यादी माहीती शिक्षकांनी येथे भरणे गरजेचे आहे.आणि क्रिएट आँप्शनवर क्लीक करावे याने आपला नवीन क्लासरूम तयार होऊन जातो.येथे आपण एकापेक्षा अधिक क्लासेस तयार करू शकतो.

इथे एक शिक्षक इतर शिक्षकांना देखील क्लास रूममध्ये अँड करू शकतो.त्यासाठी पीपल्स आँप्शनवर ओके करायचे आणि तिथे उजव्या बाजुला क्लीक केल्यावर ज्या शिक्षकाचा नंबर आपल्याला अँड करायचा आहे तो तिथे आपल्याला पर्यायात दिसुन जातो.आपण तो तिथे अँड करू शकतो.

2) जाँईन क्लास :

याचसोबत येथे आपण विदयार्थ्यांना क्लासरूम जाँईन करण्यासाठी त्यांच्या ईमेल आयडी वर इन्व्हिटेशन लिंक देखील पाठवू शकतो.किंवा आपण कोडद्वारे देखील विदयार्थ्यांना क्लासरूम जाँईन करण्यासाठी इन्व्हाईट करू शकतो.

आणि नंतर तोच कोड आपण डिलीट किंवा रिसेट करू शकतो.विदयार्थ्यांना कोडद्वारे इन्व्हाईट करण्यासाठी फक्त आपल्याला क्लास सेटिंगमध्ये जाऊन जनरल आँप्शनवर क्लीक करून दिलेला क्लासरूमचा कोड काँपी करायचा असतो.आणि तो कोड विदयार्थ्यांसोबत व्हाँटस अँप किंवा टेलिग्राम इत्यादी माध्यमांद्वारे शेअर करायचा असतो.मग विदयार्थी त्या कोडला क्लासरूम अँपवर लाँग इन करून झाल्यावर जाँईन क्लासमध्ये जाऊन टाईप करून इंटर करून क्लासरूमला लगेच सहजपणे जाँईन होऊ शकतात.

क्लास सेटिंगमधुन आपण आपल्या क्लासचे नाव इयत्ता तुकडी,डिस्क्रिप्शन इत्यादी देखील बदलु शकतो.इथे आपण किती विदयार्थी तसेच शिक्षक क्लासरूमला जाँईन झालेले आहेत हे देखील पीपल्स आँप्शन मध्ये जाऊन पाहु शकतो.

1 HOW TO JPOIN
गुगल क्रोम मधून गूगल अकाऊंट मध्ये SIGN करावे
3 YOU CAN ALSO JOIN BY CLASSROOM.GOOGLE.COM
2 SIGN IN GOOGLE ACCOUNT
4 CLICK ON ACCOUNT AND SCROLL TO FIND CLASSROOM
आपल्या गूगल अकाऊंट वर क्लिक करून , खलील ऑप्शन मधून गूगल क्लास रूम शोधा
ROM ALL OPTIONS CLICK ON CLASSROOM
आपल्या गूगल अकाऊंट वर क्लिक करून , खलील ऑप्शन मधून गूगल क्लास रूम शोधा व त्यावर क्लिक करून ओपेन करा
JOIN CLASS
गूगल क्लास रूम ओपेन करा
7 TYPE THE CLASS CODE OR ASK YOUR TEACHER
आपल्याकडील कोड नबर त्यात टाकावा – नसेल तर आपल्या शिक्षका कडे विचारून माहिती घ्यावी 7 TYPE THE CLASS CODE OR ASK YOUR TEACHER
9 CLICK ON JOIN TAB IN RIGHT CORNER AND YOU WILL GET JOIN
डाव्या बाजूला असेलया JOIN बटन क्लिक करावे . या नातर आण क्लास जॉइन झालेला असाल

WATCH VIDEO TUTORIAL

शिक्षक वर्ग विदयार्थ्यांना गुगल क्लासरूममधुन होम असाइनमेंट,प्रश्न उत्तरे अभ्यासाचे इतर साहित्य कशा प्रकारे देऊ शकतात?

 विदयार्थ्यांना आपल्या विषयाची असाइनमेंट देण्यासाठी  शिक्षकांनी क्लासवर्क मध्ये जायचे तिथे त्यांना असाइनमेंट,क्वेशन्स,मटेरिअल्स,टाँपिक रियुझ पोस्ट असे पर्याय दिसुन येतील.

  • सगळयात पहिले आपण विदयार्थ्यांना असाइनमेंट देण्यासाठी असाइनमेंट आँप्शनवर जावे तिथे आपण असाइनमेंटचे नाव,असाइनमेंटविषयी सविस्तर वर्णन,असाइनमेंट कधी सबमीट करायची त्याचा कालावधी देखील देऊ शकतो त्याच्यासोबतच एखादी फाईल देखील स्टडी मटेरिअल साठी अटँच करू शकतो.
  • मग त्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट कँन व्युव्ह,स्टुडंट कँन इडिट,मेक काँपी फाँर इच स्टुडंट असे पर्याय येतात त्यापैकी आपल्याला हवा तो पर्याय निवडुन शिक्षक आपल्या विषयाची असाइनमेंट विदयार्थ्यांना देऊ शकतात.
  • यानंतर दुसरे आँप्शन आपल्यासमोर येते क्वेशन्सचे यात देखील शिक्षक आपल्याला विदयार्थ्यांना सोडवायला प्रश्न देऊ शकतात सोबतच इन्स्ट्रक्शन मधुन काही सुचना देखील विदयार्थ्यांसाठी देऊ शकतात.तसेच प्रश्नाचे उत्तर कधीपर्यत विदयार्थ्यांनी सबमीट करावे हे देखील देऊ शकतात.
  • तिसरे आँप्शन असते मटेरिअलचे ज्यात आपण अभ्यासासाठी स्टडी मटेरिअल विदयार्थ्यांसाठी देऊ शकतो.

विदयार्थी गूगल क्लासरूममधून आपली होम असाइनमेंट तसेच होम वर्क म्हणुन सोडविण्यासाठी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी सबमीट करू शकतात?

 होम असाइनमेंट तसेच होम वर्क म्हणुन क्लासवर्कमध्ये सोडविण्यासाठी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सबमीट करण्यासाठी आपण दोन पदधतींचा वापर करू शकतो.

  • एक जी असाइनमेंट किंवा होमवर्क आपल्याला देण्यात आले आहे ते एका कागदावर लिहुन त्याचा फोटो काढुन युअर वर्कमध्ये जाऊन आपल्या वर्गशिक्षकाकडे आपण ते हँन्ड इन आँप्शनवर क्लीक करून सबमीट देखील करू शकतो.
  • किंवा याव्यतीरीक्त आपण क्वीज आँप्शनचा देखील वापर करू शकतो.ज्यात विषय शिक्षकांनी काही एमसीक्यु क्वेशन तयार केले असतात जे आपल्याला योग्य पर्यायावर टिक करून सोडवायचे असतात.
  • आणि त्यानंतर आपण टिक केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या विषय शिक्षकाकडे सबमीट करण्यासाठी सबमीट आँप्शनवर आपल्याला क्लीक करायचे असते.नंतर व्युव्ह स्कोअर मध्ये जाऊन आपण आपल्याला सोडविलेल्या प्रश्नांचे किती मार्क मिळाले आहे? आपण सोडवलेली किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत आणि किती प्रश्नांची उत्तरे चुकीची आहेत हे देखील व्युव्ह स्कोअर मध्ये जाऊन आपण बघु शकतो.

गुगल क्लासरूम ह्या अँपचे फायदे कोणकोणते आहेत? Google classroom Information in Marathi

 ह्या अँपचा वापर करून प्रत्येक शिक्षक आपल्या विदयार्थ्यांना आपल्या विषयाचा गृहपाठ,असाइनमेंट घरबसल्या देऊ शकतात.आणि तो गृहपाठ बरोबर केला आहे का नाही हे चेक देखील करू शकतात.

  • विदयार्थी आणि शिक्षक या दोघांमधील संवाद वाढतो.शिवाय विदयार्थी आहे तिथे बसुन अभ्यास करू शकतात आपल्या सर्व विषयाच्या अँक्टीव्हिटी पुर्ण करून विषय शिक्षकांकडे त्या सबमीट देखील करू शकतात.

गुगगूगल ल क्लासरूम अँपविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्नGoogle Classroom FAQ

 1) गूगल क्लासरूम ही अँप फ्री आहे का?

 गुगल क्लासरूम ही अँप आपण गुगल प्ले स्टोअर मधुन डाऊनलोड तसेच इंस्टाँल करून विनामुल्य वापरू शकतो.

2) गूगल क्लासरूम ही अँप सेफ आहे का?

 हो गुगल क्लासरूम ही अँप अत्यंत सेफ आणि सिक्युअर आहे आणि गुगल क्लासरूम ही अँप गुगल कंपनीचेच एक प्रोडक्ट आहे जी एक मोठी आणि ट्रस्ट्रेड कंपनी आहे.जिच्या प्रत्येक प्रोडक्ट सर्विसचा वापर आज जगभर मोठया विश्वासाने केला जातो.आणि हा वापर आपण सहजपणे विनामुल्य करू शकतो.

3) गूगल क्लासरूम ही अँप कोणासाठी अधिक फायदेशीर आहे?

 गुगल क्लासरूम ही अँप शिक्षक आणि विदयार्थी दोघांसाठी फायदेशीर आहे.यात शिक्षक आपल्या विषयाची असाइनमेंट,होमवर्क विदयार्थ्यांना देऊ शकतात आणि विदयार्थी देखील आपल्याला दिलेली असाइनमेंट होमवर्क पुर्ण करून आँनलाईन वर्ग शिक्षकाकडे सबमीट करू शकतात.याने शिक्षक आणि विदयार्थी दोघांचा वेळ वाचतो.आणि दोघांमधील बाँण्डिंग देखील वाढते.

गूगल वर्कप्लेस म्हणजे काय ?

1 thought on “गूगल क्लासरुम विषयी संपूर्ण माहीती – Google classroom Information in Marathi”

Comments are closed.