कमी वेळात जास्त अभ्यास कसा करावा? (How To Study More In Less Time)

विध्यार्थी जीवन – वेळेचं महत्व – How To Study More In Less Time

 आपल्यापैकी खुप जणांची अशी तक्रार असते की मी खुप जास्त अभ्यास करतो तरी देखील मला नेहमी परिक्षेत कमी गुण मिळत असतात.

पण माझा एक मित्र आहे जो खुप कमी अभ्यास करतो आणि दिवसभर खेळत असतो उंडारक्या करतो वर्षभर पुस्तकाला हात देखील लावत नाही तरी देखील त्याला माझ्यापेक्षा चांगले गुण मिळत असतात हे कसे का होत असते?हा एकच प्रश्न आपल्या मनात सतत घोळत असतो.

अशावेळी आपल्या मनात सतत एकच प्रश्न उदभवत असतो की माझा मित्र असे काय करतो की कमी अभ्यास करून देखील त्याला परिक्षेत चांगले गुण मिळत असतात.आणि मी दिवसरात्र पुस्तकात डुबुन राहुन देखील मला नेहमी कमीच गुण मिळत असतात.

माझा मित्र असे काय करतो जे मी करत नाहीये?तर ह्या आपल्या ह्या प्रश्नाचे एकच उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे स्मार्टवर्क जे करून आपला एखादा मित्र कमी अभ्यास करून देखील चांगले गुण प्राप्त करतो आणि ज्याच्या अभावामुळे आपल्याला दिवसभर अभ्यास करून देखील परिक्षेत कमी गुण प्राप्त होत असतात

 एखादा विदयार्थी स्मार्ट वर्क करतो आणि कमी अभ्यास करून देखील परिक्षेत कसा चांगले गुण प्राप्त करतो तर याचठिकाणी एखादा विदयार्थी दिवसरात्र अभ्यास करून म्हणजेच हार्ड वर्क करून देखील चांगले गुण प्राप्त का करत नसतो?यामागचे गुपित आपण आजच्या लेखात जाणुन घेणार आहोत.

See also  डीम्ड विद्यापीठ म्हणजे काय -मानद विद्यापीठ | What is Deemed University

 कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा केला जातो?

नेहमी आपल्या मनात एक खंत असते की माझे इतर मित्र फार कमी अभ्यास करतात तरी देखील त्यांना परिक्षेत चांगले गुण मिळवून उत्तम यश संपादन करता करतात.

आणि आपण दिवसरात्र मेहनत करून देखील नेहमी अपयशी ठरत असतो किंवा आपल्याला नेहमी परिक्षेत कमीच गुण मिळत असतात.आपल्या अपेक्षेप्रमाणे कधी आपल्याला गुण प्राप्त होतच नाही.

आपल्या मनातील हीच खंत दुर करण्यासाठी आज आपण कमी वेळात जास्त अभ्यास कसा करायचा? म्हणजेच स्मार्ट वर्क करून इतर विदयार्थीप्रमाणे उत्तम यश संपादन कसे करायचे?ही टिक्स शिकुन घेणार आहोत.

पण एक गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी यश मिळविण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम हे करावेच लागते.फक्त ते परिश्रम योग्य दिशेने केले जात असेल तर त्याला स्मार्ट वर्क म्हटले जाते.

आणि चुकीच्या दिशेने केले जात असेल तर मग ते आपल्यासाठी हार्ड वर्क ठरते.ज्यात आपल्याला काही रिझल्ट देखील मिळत नसतो आणि आपली मेहनत देखील त्यात वाया जात असते.

चला तर मग जाणुन घेऊया कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा केला जातो?

1) एकाच वेळी सर्वच शिकण्याचा तसेच वाचण्याचा प्रयत्न करू नये :

जेव्हा आपल्याकडे अभ्यासासाठी खुप कमी वेळ असतो तेव्हा आपण सर्व विषयांच्या सर्व धडयांचा सविस्तर अभ्यास करण्याचा अजिबात प्रयत्न करू नये.आणि तसे केले तर नरवस नेसमध्ये आपण जो अभ्यास केला आहे तो देखील विसरून जाण्याची शक्यता असते.

म्हणुन जेव्हा परिक्षा आठवडा दोन आठवडा एवढया कालावधीच्या अंतरावर येऊन ठेपली असेल अशा वेळी आपण प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धडयाचा सविस्तर अभ्यास करण्यापेक्षा फक्त त्याच्यातील महत्वाचे मुददे वाचायला हवेत.जे लक्षात घेतल्यास आपण पाहिजे तेवढे उत्तर कोणत्याही प्रश्नावर लिहु शकतो.

2) मार्क्स वेटेज :

प्रत्येक विषयातील अशा धडयांचा अभ्यास आपण करायला हवा ज्यावर परिक्षेत जास्तीत जास्त गुणांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात.

See also  पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५० जागांसाठी भरती सुरू - Bhagini Nivedita Co Operative Bank Recruitment In 2023

आणि अशा धडयांचा अभ्यास करणे आपण टाळायला हवे ज्याचे मार्क्स वेटेज खुपच कमी आहे.आणि ज्याचा अभ्यास करून आपल्याला जास्त गुण देखील मिळणार नसतात.आणि त्यात आपला खुप वेळ देखील वाया जाऊ शकतो.याचसोबत ज्या धडयांना स्कीप केल्याने आपल्या पर्सेंटेजवर फारसा काही परिणाम देखील पडु शकत नाही.

अशा धडयांचा अभ्यास करणे सोडुन आपल्याला ज्या महत्वाच्या धडयांचा अभ्यास केल्याने जास्तीत जास्त मार्क्स कव्हर करता येणार असतात.असे धडे आपण पहिले टारगेट करायला हवे.

3) अभ्यासाचे एक निश्चित वेळापत्रक तयार करायला हवे :

आपल्याला जर कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर आपण आपल्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे एक फिक्स वेळापत्रक तयार करायला हवे.

आणि त्या वेळेत आपण सोशल मिडियावर चँट करणे,मोबाईलवर मँसेज चेक करणे इत्यादी कामे करणे टाळायला हवे आणि त्या वेळेत पुर्ण एकाग्रतेने फक्त आपल्या अभ्यासावर फोकस करायला हवा.

आणि अभ्यास करताना आपण थकुन जाऊ नये म्हणुन आपण अधुनमधुन छोटासा पाच दहा मिनिटांचा ब्रेक देखील घ्यायला हवा.आणि त्यातच आपल्या मोबाईलवर आलेले मँसेज चेक करणे,काँल करणे इत्यादी कामे आपण पार पाडुन घ्यावीत जेणेकरून ब्रेकनंतर आपण पुन्हा एकाग्रतेने आपल्या अभ्यासावर फोकस करू शकतो.

4) स्वताच्या नोटस तयार करायला हव्या :

 आपल्याला जर कमी वेळात जास्त अभ्यास करायचा आहे तर आपण पुस्तकातुन अभ्यास करण्या व्यतीरीक्त आपल्या स्वताच्या छोटछोटया का होईना नोटस तयार करायला हव्यात.

कारण जेव्हा आपण स्वता नोटस तयार करतो तेव्हा एकाच टाँपिकचा आपला दोन वेळा अभ्यास होत असतो.म्हणजेच आपली डबल रिव्हीझन याने होत असते.

आणि नोटसमध्ये सर्व काही लिहिण्याची अजिबात गरज नसते.नोटसमध्ये आपण फक्त महत्वाचे मुददे,महत्वाचे वाक्य हेच लिहायला हवेत.जेणेकरून त्या मुददयांवरून आपण काय वाचले होते हे परिक्षेच्या काळात आपल्या चटकन लक्षात येत असते.

5) मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे :

 आपल्याला जर कमी वेळात जास्त अभ्यास करायचा असेल तर आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा देखील आढावा घ्यायला हवा.

See also  बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू - Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment

कारण याने आपल्याला परिक्षेत कोणते प्रश्न अधिक विचारले जातात?कशा पदधतीचे प्रश्न विचारले जातात?कोणत्या चँप्टरवर अधिक प्रश्न विचारले जातात हे लक्षात येत असते.ज्याने आपल्याला कोणत्या चँप्टरला किती महत्व द्यायला हवे हे कळण्यास मदत होते.

याने आपला वेळ वाचतो आणि कमी वेळात आपला जास्त आणि महत्वपुर्ण अभ्यास देखील होत असतो.

गूगल क्लासरुम विषयी संपूर्ण माहीती – Google classroom

Students useful blog

Leave a Comment