बी एस डब्लयु कोर्स, पात्रता, फि वेतन व नोकरीत संधी-?BSW full form in Marathi

बी एस डब्लयुचा फुलफाॅम काय होतो?BSW full form in Marathi

बी एस डब्लयुचा फुलफाॅम bachelor of social work असा होतो.यालाच सोप्या मराठी भाषेत सामाजिक कार्यात पदवीधर असणे असे देखील म्हटले जाते.

ज्यांना सामाजिक सेवेत,सामाजिक कार्यात सामाजिक क्षेत्रात आपले उत्तम करीअर घडवायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम कोर्स आहे.

बीएस डबल्युचा अर्थ काय होतो?

बीएस डबल्यु हा एक पदवीपुर्व अभ्यासक्रम आहे.बीएस डबलयू ही एक व्यावसायिक पदवी आहे.ज्यात आपणास सामाजिक सेवा सामाजिक कार्य यांचे ज्ञान दिले जाते.

हया कोर्समध्ये समाजात चांगल्या गोष्टी तयार करण्यासाठी सामाजिक कार्याचे,सामाजिक सेवेचे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.

बीएस डबल्यु ह्या अभ्यासक्रमाचा एकुण कालावधी तीन वर्षे इतका असतो.पण हा अभ्यासक्रम आपणास जास्तीत जास्त सहा वर्षांत देखील पुर्ण करता येईल.

हया कोर्ससाठी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेता येतो.बीएस डबल्यु ह्या अभ्यासक्रमासाठी आपण नियमितपणे तसेच मुक्त विद्यापीठाच्या मार्फत बाहेरून देखील प्रवेश घेऊ शकतो.

बीएस डबल्यु अभ्यासक्रमासाठी आपणास दहावी बारावीच्या गुणांच्या आधारावर किंवा इंट्रान्स एक्झॅम मधील गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो.

बीएस डबल्यु कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपणास यात मास्टर डिग्री MSW देखील प्राप्त करता येते.

बीएस डबल्यु कोर्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या जातात?

BSW full form in Marathi
BSW full form in Marathi

ह्या कोर्समध्ये समाजात अस्तित्वात असलेल्या विविध अडीअडचणी समस्यांचा परिचय करून दिला जातो.

See also  जीपीटी फोर म्हणजे काय? वैशिष्ट्य काय आहे ?GPT 4 meaning in Marathi

समाजातील जनतेस कुठल्या समस्येला सामोरे जावे लागते आहे त्यासाठी सध्या समाजात कोणकोणत्या संस्था संघटना कार्यरत आहे.हे देखील सांगितले जाते.

आपण चांगले कार्य करून समाजातील जनतेस कशापदधतीने मदत करू शकतो हे शिकवले जाते.शासना मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या समाज कल्याण योजनांची माहिती दिली जाते.

बीएस डबल्यु कोर्स करण्यासाठी कोणत्या शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते?

बीएस डबल्यु कोर्स करण्यासाठी आपले कुठल्याही एका मान्यताप्राप्त बोर्डातुन किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

उमेदवाराचे कुठल्याही एका शाखेतुन ५० टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.उमेदवाराचे किमान वय सतरा असणे आवश्यक आहे.

सामाजिक कार्य तसेच सेवेसाठी आवश्यक असणारे सर्व आवश्यक गुण त्याच्यात असायला हवे.

उदा समस्या सोडविण्याचे कौशल्य, उत्तम संवाद कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य,संयम, सामाजिक जागरूकता आत्म जागरूकता,भावनिक बुद्धिमत्ता इत्यादी

बी-एस-डब्लयु कोर्स मध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात?

यात आपणास पहिल्या वर्षाला सर्वप्रथम सामाजिक सेवा सामाजिक कार्य इत्यादीं विषयी परिचय करून दिला जातो.

याचसोबत कौटुंबिक शिक्षण एच आयव्ही एडस विषयी परिचय करून दिला जातो.

संवाद साधत सामाजिक कार्यात हस्तक्षेप कसा करायचा समूपदेशन कसे करायचे हे शिकवले जाते.

बीएस डबल्यु ह्या कोर्सच्या दुसरया वर्षात आपणास विज्ञान अणि तंत्रज्ञान, सामाजिक कार्याची मुलभूत अणि आणिबाणी,सामाजिक मानसशास्त्राच्या मूलभूत संकल्पना,

मानवी वर्तनाची मानसशास्त्र संकल्पना,सामाजिक कार्यात मानसशास्त्राची प्रासंगिकता,सामाजिक कार्याचा परिचय,फील्डवर्क, सामाजिक समस्या आणि सेवा,समकालीन सामाजिक समस्या आणि सामाजिक संरक्षण इत्यादी विषय शिकवले जातात.

बीएस डबल्यु कोर्सच्या तिसरया वर्षात समुदाय आणि संस्थेतील वर्तमान समस्या,सामाजिक कार्यात दृष्टीकोन,महिला सक्षमीकरण,लैंगिक आरोग्य शिक्षण,

पदार्थाचा दुरुपयोग प्रासंगिकता आणि परिणामांची तथ्यात्मक माहिती.संज्ञानात्मक आणि मनोविश्लेषण तंत्र,NGO ची भूमिका,धोरणांच्या हस्तक्षेपासाठी WWE कौशल्ये आणि क्षमता,कौटुंबिक जीवनात संस्कृती आणि सामाजिक मूल्ये इत्यादी विषय शिकवले जातात.

बीएस डबल्यु कोर्स करण्यासाठी किती फी लागेल?

बीएस डबल्यु कोर्स करण्यासाठी आपणास साधारणतः सात ते दहा हजार वर्षाला लागु शकतात.हा कोर्स आपण एखाद्या खाजगी महाविद्यालयातुन केला तर आपणास यापेक्षा अधिक फी लागु शकते.

See also  जागतिक तापीर दिवस का साजरा केला जातो, | World Tapir Day In Marathi

बीएस डबल्यु कोर्स केल्यानंतर प्राप्त होत असलेल्या नोकरीच्या संधी –

बी एस डब्लयु कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपणास समाजसेवक,सामाजिक शिक्षक,समुपदेशक,प्रकल्प समन्वयक,आरोग्य सेवा कर्मचारी,व्यवस्थापक,शिक्षक, समुदाय विकास कार्यकर्ता,सल्ला कार्यकर्ता,धर्मादाय अधिकारी अशा विविध पदांवर नोकरी करता येते.

बीएस डबल्यु झाल्यानंतर वेतन किती प्राप्त होते?

बीएस डबल्यु झाल्यानंतर आपणास वर्षाला एक ते दोन लाख रूपये इतके वेतन प्राप्त होते.यात आपल्या अनुभवानुसार कालांतराने अधिक वाढ केली जाते.