CIF म्हणजे काय – Customer Information File Number mhanje kay ?

 सी आय एफ नंबर विषयी माहीती  – CIF – Customer Information File Number

जेव्हा आपण बँकेत आपले खाते ओपन करत असतो तेव्हा आपल्याला अकाऊंट नंबर,आय एफ एससी कोड तसेच एम आय सीआर कोड बँकेकडुन दिला जात असतो.पण ह्या सर्वा व्यतीरीक्त अजुन एक महत्वाचा नंबर आहे जो बँकेकडुन आपल्याला प्रदान केला जातो आणि ज्याचे देखील महत्व अनन्यसाधारण आहे.

आणि तो नंबर आहे आपला सी आय एफ नंबर ज्याला इंग्रजीत (Customer Information file number) असे म्हटले जाते.

CIF म्हणजे Customer Information File हि एक संगणकीय ,डिजिटल फाईल असते ज्यात ग्राहकांची बँक खात्याची माहिती व वैयक्तिक माहिती साठवलेली असते. या माहितीत ग्राहकाने घेतलेली ऋण,खरेदी व्यवहार, डिमॅट खाते तसेच केवायसी यांचा समावेश होतो.

CIF क्रमांक सहसा 9 ते 11 आकडी असून तो बँकेकडून प्रत्येक ग्राहकांना दिला जातो.

 

सी आय एफ नंबर हा काय असतो?तो बँकेकडुन आपल्याला का दिला जातो?त्याचे महत्व काय आहे?ह्या विषयी आपल्यातील बरेच बँक खाते धारकांना अजुनही सविस्तर माहीत नाहीये.

आणि आज आपल्या सगळयांचेच बँकेत एक तरी अकाऊंट हे असतेच म्हणुन आपल्याला ह्या सी आय एफ नंबर विषयी माहीती असणे फार गरजेचे आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण सीआय एफ नंबर विषयी सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

सी आय एफ नंबर म्हणजे काय? Customer Information File Number mhanje kay

 

सीआय एफचा फुल फाँर्म (customer information file) असा होतो.सी आय एफ हा एक युनिक कोड तसेच अकरा अंक असलेला नंबर असतो.जो बँकेत आपले खाते ओपन करत असलेल्या प्रत्येक खाते धारकाला म्हणजे अकाऊंट होल्डरला बँकेकडुन प्रदान केला जात असतो.

  • सी आय एफ नंबर द्वारे कुठल्याही बँक खाते धारकाची सविस्तर बँक माहिती आपण प्राप्त करू शकतो.
  • जेव्हा आपण कुठल्याही बँकेत आपले खाते ओपन करत असतो तेव्हा बँकेकडुन अकाऊंट नंबर,आय एफ एससी कोड,एम आय सीआर कोड यांच्यासमवेत आपल्याला अजुन एक नंबर दिला जात असतो ज्याला सीआय एफ नंबर असे म्हणतात.
  • सी आय एफ नंबर हा एक असा नंबर असतो ज्यात आपली सर्व बँकिंग डिटेल दिलेली असते.ज्यात आपल्या अकाऊंटचे नाव काय आहे?अकाऊंट आपण कधी आणि किती तारखेला ओपन केले होते?आपला नाँमिनी कोण आहे?इत्यादी सर्व आपली फँमिली डिटेल तसेच पर्सनल डिटेल यात दिलेली असते.
  • फक्त फरक एवढाच आहे की हा नंबर प्रत्येक बँकेत विविध नावाने ओळखला जात असतो म्हणजे समजा एस बी आय बँकेत जर ह्याला सीआय एफ नंबर असे म्हटले जाते तर त्याच ठिकाणी कोटक महिंद्रा बँकेत यालाच सी आर एन नंबर असे संबोधिले जाते.
  • तर इतर बँकेत जसे की बँक आँफ बडोदा,आयसी आयसीआय,एचडी एफसी अशा विविध बँकेत ह्या नंबरला कस्टमरचा आयडी नंबर म्हटले जाते.
See also  काही लोकांना खडू किंवा माती खाण्याची इच्छा का वाटते?

माहिती

बँक अकाऊंट  किती प्रकारचे असतात ?

प्रत्येक बँक खाते धारकाला आपला सी आय एफ नंबर माहीत असणे का गरजेचे आहे?

  • आजचे जग हे पुर्णपणे आँनलाईन होत चालले आहे म्हणुन आपल्याला देखील आँनलाईन पैशांची देवाण घेवाण करायची असेल तर आपल्याला आपली नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंगची सुविधा चालु करणे फार आवश्यक असते.
  • आणि जेव्हा आपण नेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंगची फँसिलिटी स्टार्ट करत असतो तेव्हा तिथे देखील आपल्याला आपला कस्टमर आयडी नंबर म्हणजेच सीआय एफ नंबर इंटर करावा लागत असतो.कारण त्याशिवाय आपले रेजिस्ट्रेशन होत नसते.
  • याव्यतीरीक्त जेव्हा आपल्याला बँक खात्याविषयी काही समस्या असेल तेव्हा ती समस्या सोडविण्यासाठी बँक आपल्याला आपला कस्टमर आयडी विचारत असते कारण त्यात आपली पुर्ण बँक डिटेल दिलेली असते.

आपल्याला आपला सी आय एफ नंबर कुठुन मिळु शकतो?

  • आपल्याला आपला युझर आयडी कस्टमर आयडी नंबर आँफलाईन तसेच आँनलाईन ह्या दोन्ही पदधतीने प्राप्त करता येत असतो.
  • आँफलाईन सी आय एफ नंबर प्राप्त करण्यासाठी आपण आपल्याला बँकेकडुन जे पासबुक दिले गेलेले असते ते चेक करू शकतो कारण त्याच्या पहिल्याच पानावर आपला सीआय एफ नंबर तसेच कस्टमर आयडी नंबर दिलेला असतो.
  • जो युझर आयडी नंबर,कस्टमर आयडी नंबर,सीआर एन ,सी आय एफ अशा विविध नावांनी आपल्या बँकेच्या पासबुकमध्ये पहिल्याच पानावर दिलेला असतो.
  • याशिवाय सीआय एफ नंबर प्राप्त करण्यासाठी आपण बँकेला काँल करू शकतो तसेच बँकेत जाऊन बँक मँनेजरला भेट देऊ शकतो.
  • आणि याच ठिकाणी आँनलाईन सीआय एफ नंबर प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या बँकेच्या आँफिशिअल अँपद्वारे अकाऊंट स्टेटमेंट चेक करू शकतो.
  • तसेच आपण मोबाईल बँकिंग नेट बँकिंग अकाऊंटमध्ये लाँग इन करून देखील आपला सी आय एफ नंबर प्राप्त करू शकतो.
  • यासाठी आपल्याला आपल्या नेट बँकिंग अकाऊंटवर वर प्रथम आयडी पासवर्ड टाकुन लाँग इन करावे लागते
  • मग त्यानंतर आँफर अकाऊंट समरी मध्ये जाऊन नाँमिनी अँण्ड पेन डिटेल वर ओके करायचे असते.
  • मग नाँमिनी अँण्ड पेन डिटेल मध्येच आपला सी आय एफ नंबर देखील दिलेला असतो.
See also  पीएम मित्रा योजना काय आहे? -PM MITRA scheme meaning in Marathi