पाऊस पडला नाही तर काय होईल? निबंध – Essay – if there is no rain

पाऊस पडला नाही तर काय होईल?

जेव्हा आपण पावसाळयात आजुबाजुला चिखल झालेला बघतो ररत्यांवर सर्वत्र पाणी साचलेले दिसते तेव्हा आपल्याला असे वाटते की पाऊसच पडायला नको.

कारण हा पाऊस पडला की सगळीकडे चिखल होऊन जातो.रस्त्यावर जागोजागी खडडे पडतात सर्व खडडे पाण्याने गच्च भरून जातात.अणि आजुबाजुचा सर्व परिसर चिखलाने खराब होऊन जातो.

अणि ह्या चिखलातुन पावसाच्या तुडुंब भरलेल्या डबक्यातुन खडडयांतुन आपली वाहने काढणे किंवा पायी चालणे देखील आपणास कठिन जाते.कधी कधी चालताना आपण एखाद्या पाण्याने भरलेल्या खडडयात देखील पडुन जात असतो.

प्रवास करणे अवघड होऊन जाते.मुलांना शाळेत काँलेजात जाता येत नाही ज्याने त्यांचा अभ्यासक्रम बुडतो.सर्वत्र चिख्खल झालेला असल्याने मुलांना बाहेर जाऊन पटांगणात खेळता बागडता येत नाही.त्यातच अचानक पाऊस आल्यावर आपले पावसात भिजल्याने कपडे ओले होतात.

चिखलाचे घाण पाय घरात येऊन घरातील स्वच्छ फरची खराब होत असते.अणि पावसाळयात कपडे देखील लवकर वाळत नाही अशा खुप समस्या उदभवतात.पावसात भिजल्याने आपणास सर्दी होते ही समस्या वेगळीच असते.

अचानक पाऊस पडेल अणि आपण ओले होऊ ह्या भीतीने रोज रेनकोट अणि छत्री घेऊनच फिरावे लागते बाहेर पडावे लागते.त्यातच अतिपाऊस पडल्याने नदीला पुर येतो.अणि ह्याच पुरात अनेक लोकांची घरे देखील वाहुन जातात.खुप आर्थिक अणि जीवित हानी होते.

पण मित्रांनो आपण एक बाजु तर समजुन घेतली की पाऊस पडल्यावर आपल्याला किती अडचणींना सामोरे जावे लागते.पण आपण ह्याचीच दुसरी बाजु देखील जाणुन घेणे गरजेचे आहे.

पाऊस पडला नही तर काय वाईट परिणाम होतील?

मित्रांनो आपला भारत देश हा शेतकरयांचा देश आहे.कारण इथे अधिकतम लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती ह्या व्यवसायावर अवलंबुन आहे.

अणि शेतीमधील लागवड केलेल्या पिकांची वाढ होण्याकरीता त्याला भरपुर पाण्याची आवश्यकता असते.

अणि अशा परिस्थितीत पाऊसच पडला नाही तर
ही कल्पणा करणे देखील अंगावर काटा आणते कारण पाण्या अभावी पिकांची वाढ होणे आपले जिवंत राहणे जीवण जगणे हे शक्यच नाहीये.

See also  15 आँगस्टसाठी देशभक्तीपर कोटस अणि शायरी,स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा Independence Day Quotes,Shayri And Wishes In Marathi And Hindi

पाऊस पडला नही अणि जमिनीवर पाणीच राहिले नही तर शेतकरयांची सर्व पेरलेली पिक पाण्याअभावी वाया जातील.तसेच पाण्याअभावी शेतकरी पीकच काढु शकणार नाही.अणि शेतकरींनी पीक नाही काढले तर आपण सर्व जण खाणार काय?

आपल्याला धान्य तसेच भाजीपाला फळे इत्यादी कुठुन मिळणार?अणि अन्नच प्राप्त झाले नाही तर आपल्यावर दुष्काळाची परिस्थिती येऊन उपासमारीची वेळ येऊ शकते.

याचसोबत पाऊस पडल्यावर आपल्या आजुबाजुचे वातावरण पाण्याने चिंब होऊन अगदी हिरवेगार होऊन जाते.पण पाऊस जर पडलाच नाही तर आजुबाजुचे झाडे पाणी न मिळल्याने व्यवस्थित वाढणार नाहीत.तसेच पाण्या अभावी जास्त काळ ती जगणार देखील नाहीत.

अणि झाडे नसली तर आपणास आँक्सीजन कुठुन मिळणार?ही सुदधा एक गंभीर समस्या आपल्यासमोर उभी राहु शकते.तसेच इतर पर्यावरणाच्या समस्या उदभवतील.

जर पृथ्वीवर पाणीच नही राहिले तर आपण रोज अंघोळ करायला,कपडे धुवायला,भांडे धुवायला पाणी कुठुन आणणार?

पाऊसच पडला नाही तर आपल्या आजुबाजुचे सर्व तलाव नदया पाण्याअभावी कोरडया पडतील.अणि पृथ्वीवर पाणीच नही राहिले तर मानव तसेच इतर प्राणी आपली तहान कशी भागविणार?हा देखील प्रश्न
आपल्यासमोर उभा राहील.

बघा मित्रांनो पावसामुळे होणारे छोटे छोटे त्रास टाळण्यासाठी आपण डायरेक्ट काहीही मागचा पुढचा विचार न करता पाऊस नको पडायला असे म्हणतो.

पण पाऊस नही पडला तर आपले काय होईल आपल्या जगण्याचाच प्रश्न निर्माण होईल.हा विचार आपण कधी करतच नसतो.

आशा करतो की ह्या छोटयाशा वैचारिक निबंधातुन आपणास कळले असेल की आपल्या जीवणात पावसाचे-पाण्याचे महत्व काय आहे?आपल्या जगण्यासाठी,जिवंंत राहण्यासाठी जमिनीवर पाऊस पडणे किती गरजेचे आहे.

1 thought on “पाऊस पडला नाही तर काय होईल? निबंध – Essay – if there is no rain”

Comments are closed.