अतिवृष्टी म्हणजे काय?अतिवृष्टीची कारणे परिणाम अणि उपाययोजना. – Heavy rainfall and preventive measures

अतिवृष्टी म्हणजे काय?अतिवृष्टीची कारणे परिणाम अणि उपाययोजना – Heavy rainfall and preventive measures

मित्रांनो मागील एका वैचारिक निबंधात आपण पाऊस पडला नाही तर आपल्या जीवनावर याचे काय दुष्परिणाम होतील तसेच होऊ शकतात हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.

पण मित्रांनो जसे पाऊस पाऊस पडणे आपल्यासाठी गरजेचे आहे.तसेच त्या पावसाचे एक ठाराविक प्रमाण असणे ठाराविक प्रमाणातच पाऊस पडणे देखील गरजेचे आहे.

कारण जर प्रमाणापेक्षा अधिक मुसळधार पाऊस पडला तर पृथ्वीवर अतिवृष्टीचा धोका संभवत असतो.

आज आपण रोज न्युज चँनलवर बातमी बघतो ऐकतो आहे की अमुक विभागात मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडुन देण्यात आला आहे.

तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न निर्माण होत असतो की हे अतिवृष्टी म्हणजे काय?अतिवृष्टीचे काय दुष्परिणाम होत असतात.याची कारणे कोणती?

चला तर मग जाणून घेऊ याविषयी थोडक्यात आजच्या लेखातुन.

अल्पवृष्टी म्हणजे काय?

ठाराविक प्रमाणापेक्षा खुपच कमी प्रमाणात पाऊस पडणे याला अल्पवृष्टी असे म्हणतात.

अतिवृष्टी म्हणजे काय?heavy rain meaning in Marathi

अतिवृष्टी म्हणजे एका ठाराविक प्रमाणापेक्षा, कालावधीपेक्षा अधिक वेळ पाऊस पडणे होय.

समजा एखाद्या ठिकाणी चोवीस तासाच्या कालावधीत पन्नास मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर त्यास अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस असे संबोधित केले जाते.

अतिवृष्टीचे कोणकोणते दुष्परिणाम होत असतात?

अतिवृष्टी म्हणजेच चोवीस तासापेक्षा अधिक कालावधीसाठी पडणारा मुसळधार पाऊस असतो.

ह्या पावसाचे प्रमाण खुप अधिक असल्याने अनेक अडचणी ह्यामुळे निर्माण होत असतात

1)पिकांची हानी होते –

See also  हात धुण्याचे महत्व - 15 ऑक्टोबर ग्लोबल हँड वॉशिंग डे - Global Hand Washing Day Marathi

अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका हा शेतकरींना बसत असतो.

कारण शेतकरींचे उदरनिर्वाहाचे साधन हे शेती आहे.पण शेतकरींच्या पिकाचे ह्या अतिवृष्टीमुळे खुप नुकसान होत असते.

त्यांचे शेकडो हेक्टर असलेली पिके पाण्याखाली जात असतात.शेतीत पाणी साचुन सर्व पिके कुजुन जात असतात.पिकांची नासाडी होते.ज्याने सर्व शेतकरींचे आर्थिक नुकसान होते.अनेक शेतकरयांची मेहनत वाया जाते.शेतकरींच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला जातो.

2) महापुराचे संकट ओढावते –

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महापुराचे संकट येते.ज्यात कित्येक लोकांची घरे संसार पाण्यात वाहुन जातो.खुप लोकांना आपले घर सोडुन जीव वाचविण्यासाठी दुसरया एखाद्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागते.

काही लोकांना,प्राण्यांना तर या महापुरात आपले प्राण देखील गमवावे लागत असतात.ज्या शहर गावात पाणी साठवायला धरण बांधले गेले नाहीये तिथे महापुर येण्याची शक्यता अधिक असते.

3) इतर आर्थिक हानी –

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होते अनेकांच्या घराचे,दुकानाचे आर्थिक नुकसान होते.

वाहतुक रहदारी कोंडीस येते.जागोजागी भर ररत्यावर अतिवृष्टीमुळे झाडे तुटुन पडलेली दिसतात.लोकांचे घराबाहेर पडणे कामावर नोकरीवर जाणे मुलांचे शाळेत जाणे अवघड होऊन जाते.

अनेक व्यवसायीकांच्या मालाचे नुकसान होते.अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना देखील अतिवृष्टीमुळेच घडतात.

अतिवृष्टीची कारणे कोणकोणती आहेत?

1) हवामानात झालेला बदल –

अनेक पर्यावरण अभ्यासक तसेच हवामान तज्ञांचे असे मत आहे की अतिवृष्टी अणि अतिवृष्टीमुळे येणारया पुराचे मुख्य कारण हवामानातील बदल आहे.

ज्यात कधीही अवेळी अवकाळी पाऊस पडणे,त्रतुमानात अवेळी होणारे अनैसर्गिक बदल यास कारणीभुत आहे.

दिवसेंदिवस आपल्या जीवनशैलीत होत असणारा बदल,वाढते शहरीकरणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे तज्ञांकडुन सांगण्यात येत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात?

● जर आपल्या शेतात पुराचे पाणी घुसले तर त्यात चारी काढावी अणि ते पाणी बाहेर काढावे.

● पाण्याचा योग्य पदधतीने निचरा होईल याची विशेष काळजी घ्यावी.

See also  कृष्ण जन्माष्टमी का अणि कशी साजरी केली जाते?तिचे महत्व काय आहे? - Why do we celebrate Krishna Janmashtami ?

● पुराच्या पाण्यामुळे काही प्लास्टिक वगैरे तसेच कचरा आला असेल तर तो बाहेर काढावा.

● पाण्याच्या अतिव्यापामुळे शेतातील बांध फुटला असेल तर तो देखील दुरूस्त करून घ्यायला हवा.

● पिके पाण्यात राहिल्यामुळे कुजुन जाण्याची शक्यता अधिक असते.अशावेळी आपण कार्बनडायझिम दहा ग्रँम दहा ग्रँम पाण्यात मिसळुन त्याची पिकास आळवणी करायला हवी.

● जे पीक पुराच्या पाण्यात बुडाले आहे त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवायला ०.५ पीपीएम ब्रासीनोलाईडची फवारणी करून घ्यावी.

● पिकांवरील रोगांचे व्यवस्थापण करायला बुरशी नाशकाची फवारणी करून घ्यायला हवी.

● जास्त पाणी साठुन असलेल्या ठिकाणी किडयांचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन किटकनाशकांची फवारणी करून घ्यावी.

● जर एखादे पीक सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासुन पाण्यात बुडुन असेल तर लवकरात लवकर त्या पिकाची विल्हेवाट करणे गरजेचे आहे.