रेन फाँल अँलर्ट म्हणजे काय?याचे प्रकार कोणकोणते – Rain Fall and Alert meaning and it’s types in Marathi

रेन फाँल अँलर्ट म्हणजे काय?याचे प्रकार कोणकोणते – Rain Fall and Alert meaning and it’s types in Marathi

रेनफाँल कशाला म्हणतात?rainfall meaning in Marathi

रेनफाँल हा एक इंग्रजी शब्द आहे ज्याचा मराठीत अर्थ पर्जन्यमान असा होत असतो.
एखाद्या ठाराविक कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडेल त्याचे प्रमाण यालाच पर्जन्यमान असे म्हणतात.पावसाचे प्रमाण मोजायला पर्जन्यमापक हे यंत्र वापरले जात असते.
जेव्हा एखाद्या स्थळी खुपच अधिक प्रमाणात पाऊस पडत असतो.तेव्हा त्यास रेनफाँल असे म्हणण्यात येत असते.

हवामान विभाग कोणते अणि किती अँलर्ट जारी करत असते?

कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडणार आहे कुठले हवामान सौम्य असेल किंवा तीव्र तसेच धोकादायक असेल हे सुचित करायला हवामान विभाग विविध अलर्टचा वापर करत असते.
ज्यात रेड,आँरेज,ग्रीन अणि येलो अशा विविध अलर्टचा समावेश होत असतो.

Rain Fall and Alert meaning and it's types in Marathi
म्हणजेच हे चारही हवामानाचे,पाऊसाबाबतचे संकेत आहे जे हवामान विभाग आपल्याला सुचित करण्यासाठी देत असते.

कोणत्या ठिकाणी हाय अँलर्ट जारी केला जात असतो?

ज्या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडत असतो किंवा तिथे पाऊस पडण्याची शक्यता असते अशा ठिकाणी हाय अलर्ट जारी केला जात असतो.

See also  इस्टर शनिवार काय आहे? । इतिहास । Easter Saturday Info In Marathi

रेड अँलर्ट कशाला म्हणतात?रेड अँलर्ट कधी अणि कुठे जारी केले जाते?

जेव्हा चक्रीवादळ हे अधिक वेगाने येते अशा वेळेला वारयाची गती ही 130 कि.मी असते.अणि जोरात वादळासह पाऊस येत असतो.
अशा वेळेला ह्या वादळाच्या कक्षेत ज्या ज्या विभागांचा समावेश होत असतो.त्या ठिकाणी हवामान विभाग रेड अलर्टची घोषणा करत असते.
कारण अशा परिस्थितीत तेथील हवामान हे धोकादायक स्वरूपाचे असते.ज्याने आर्थिक तसेच जिवहानी देखील होण्याची संभावना असते.
म्हणुन यावर मात करण्यासाठी योग्य ती पाऊले लवकर उचलावी अशी सुचना देखील प्रशासनास करण्यात येते.ही सुचना साधारणत तेव्हा करण्यात येते जेव्हा तीन ते चार तासापेक्षा अधिक कालावधी पाऊस पडेल असा संकेत हवामान विभागास प्राप्त होत असतो.
कारण यात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण होत असते.ज्यामुळे त्या ठिकाणात वास्तव्य करत असलेल्या लोकांना स्थलांतर देखील करावे लागत असते.

आँरेज अँलर्ट कशाला म्हणतात?आँरेंज अँलर्ट कधी अणि कुठे जारी केले जाते?

जेव्हा एखाद्या ठिकाणातील हवामानात बदल होऊन ते खराब होऊ लागते तेव्हा त्याबाबत त्या विभागातील जनतेस सुचित करण्यासाठी आँरेज अँलर्ट जारी केला जात असतो.
आँरेज अँलर्ट तेव्हा जारी करण्यात येतो जेव्हा एखाद्या ठिकाणी अचानक चक्रीवादळ आल्याने मुसळधार पाऊस पडुन त्या विभागातील रस्ते झाडे वाहतुक रहदारी यांचे नुकसान होण्याची संभावना असते.
अशा परिस्थितीत हवामान विभाग आपणास घरातच राहा बाहेर निघु नका असा आदेश देखील देत असते.

एलो अँलर्ट कशाला म्हणतात?एलो अँलर्ट कधी अणि कुठे जारी केले जाते?

येलो अलर्ट हा लोकांनी निश्चिंत अणि गाभील राहु नये सावधगिरी बाळगावी हे सांगण्यासाठी एलो अलर्ट जारी केला जात असतो.
समजा एखाद्या ठिकाणी काही तासांत मुसळधार पाऊस पडणार असेल तशी शक्यता वर्तवली गेली असेल तेव्हा तेथील लोकांनी सावध राहावे हे कळविण्यासाठी हा अलर्ट जारी केला जातो.

See also  प्रज्ञानंदला हरवून बुद्धीबळ विश्वचषक २०२३ जिंकणारा मॅगनस कार्लसन कोण आहे? - Magnus Carlsen

ग्रीन अलर्ट कशाला म्हणतात?ग्रीन अँलर्ट कधी अणि कुठे जारी केले जाते?

जो विभाग सुरक्षित आहे जिथे कुठल्याही प्रकारचा हवामान बिघाड,मुसळधार पाऊस,अतिवृष्टीचा धोका असल्याची शक्यता नसते अशा झोनला ग्रीन अँलर्ट जारी केला जात असतो.

हवामान विभागाकडून अँलर्ट का जारी केला जातो?

अचानक एखाद्या विभागात अतिवृष्टी झाल्याने चक्रीवादळ आल्याने त्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांची आर्थिक तसेच जीवित हानी होऊ नये यासाठी हवामान विभाग जनतेच्या सुरक्षेसाठी हवामानाच्या अंदाजानुसार विविध अ़ँलर्ट जारी करत असते.