किवी फळाचे फायदे- Benefits Of Kiwi In Marathi

किवी फळ- Benefits Of Kiwi In Marathi

आज आपल्याला डाँक्टर देखील नेहमी हा सल्ला देत असतात की आपण पौष्टिक आणि सकस आहाराचे सेवण करण्यासोबत फळांचे देखील सेवण करायला हवे.

वेगवेगळया फळांचे फ्रुट ज्युस घेण्याचा सल्ला आज आपणास विविध आहारतज्ञ देत असतात.

कारण आपल्याला आपले शरीर जर नेहमी निरोगी आणि तंदुरस्त ठेवायचे असेल तर आपल्या शरीराला सर्व जीवनसत्वे असलेल्या आहार आणि फळांचा खुराक आपण देणे अत्यंत आवश्यक असते.

आज असे अनेक आजार आहेत ज्यांवर उपचार म्हणुन डाँक्टर देखील आपणास काही महत्वाची फळे खाण्यासाठी सांगत असतात.

आजच्या लेखात आपण अशाच एका आरोग्यदायी फळ किवी ह्या फळाचे फायदे जाणुन घेणार आहोत.

चला तर मग मित्रांनो क्षणाचाही विलंब न करता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.

किवी फळाचे फायदे किती आहेत आणि कोणकोणते आहेत? – Benefits Of Kiwi In Marathi

किवी हे एक अत्यंत आरोग्यदायी फळ आहे ज्यात अनेक प्रकारची पोषकतत्वे समाविष्ट आहेत.आणि हे फळ खाल्ल्याने आपल्याला अनेक आरोग्यविषयक फायदे प्राप्त होत असतात.जे पुढीलप्रमाणे आहेत-

● जर आपल्याला कुठल्याही आजाराशी,विकाराशी लढा द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्या शरीरात भरपुर रोग प्रतिकारक क्षमता असणे गरजेचे असते.कारण त्याशिवाय आपण कुठल्याही आजाराशी लढा देऊन त्यावर यशस्वीपणे मात करून बरे होऊ शकत नसतो.आणि किवी हे एक असे फळ आहे ज्याच्यात अशा अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता ही वाढवण्याचे कार्य करत असतात.

किवी ह्या फळामध्ये व्हटँमिन सी असते.ज्याचे काम आपल्या शरीरामध्ये असलेल्या रोगप्रतिकारक पेशींना अधिक मजबुत करणे आणि आपल्या शरीराला अपायकारक आणि घातक ठरत असलेल्या विषाणुंसोबत लढा देण्यासाठी उर्जा प्रदान करणे हे असते.

● किवी ह्या फळामध्ये आपल्या शरीराला आवश्यक अशी अनेक पोषकतत्वे आहेत ज्यांच्यामुळे वेगवेगळया आजारांपासुन आपले आणि आपल्या शरीराचे संरक्षण होत असते.

See also  शरीरातील लोहाची पातळी त्वरीत कशी वाढवायची? - How to increase iron levels quickly in Marathi

● किवी हे फळ खाण्याचा अजुन एक तिसरा फायदा हा आहे की हे फळ खालल्याने आपली नजर म्हणजेच डोळयांच्या दृष्टीत सुधारणा घडुन येत असते.कारण ह्या फळात ल्युटिन नावाचा एक पदार्थ असतो जो आपल्या डोळयांच्या उत्तम आरोग्यासाठी फार उत्तम मानला जात असतो.
● हा पदार्थ आपल्या डोळयांमधील रँटिनाला सुरक्षित ठेवण्यासोबत डोळयांच्या विविध आजारांपासुन आपले रक्षण करत असतो.ज्यांना डोळयांविषयी,दृष्टीविषयी काहीही समस्या तसेच आजार असेल त्यांनी हे फळ नक्कीच खायला हवे.

● किवी हे फळ खाण्याचा अजून एक फायदा हा आहे की हे फळ खालल्याने आपल्याला डायबिटीसचा त्रास होत नसतो.कारण या फळात काही असे घटक असतात जे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करत असतात.
● याचसोबत किवी  या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी आहे जो साखरेच कमी प्रमाण दर्शवतो म्हणुन जर आपणास डायबिटीसची समस्या असेल तर आपण आपल्या आहारात ह्या फळाचा नियमित समावेश करायलाच हवा.

● कँन्सर हा एक असा जीवघेणा आणि भयानक आजार आहे ज्यामुळे आज जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत.
पण जर आपण नियमित आपल्या आहारात किवी ह्या फळाचा समावेश केला तर आपल्याला ह्या कँन्सरचा धोका राहत नसतो.कारण किवी ह्या फळामध्ये अँण्टी कँन्सरचे गुणधर्म देखील समाविष्ट असतात जे आपल्या शरीराचे कँन्सरपासुन रक्षण करत असतात.

● किवी ह्या फळाचा अजुन एक फायदा हा असतो की हे फळ एकदम पाणीदार असते आणि हे खालल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नसते.

● ज्यांना चेहरयावर डाग तसेच चटटे पडणे ही समस्या असेल त्यांनी हे फळ नक्की खायला हवे.कारण ह्या फळात काही अँण्टी आँक्सीडंटसचा समावेश असतो जे आपल्या चेहरयावरील डाग चटटे कमी करत असतात.आणि आपल्या त्वचेस नैसर्गिक सौदर्य बहाल करत असतात.

See also  पीसी ओएस म्हणजे काय? PCOS in Marathi

● ज्यांच्या त्वचेला सुर्याच्या उष्णतेमुळे त्रास होत असेल अशा व्यक्तींनी हे फळ तर आवर्जुन खायला हवे कारण ह्या फळाचे सेवण केल्याने सुर्याची जी हानीकारक किरणे असतात त्यांच्यापासुन आपल्या कातडीचे रक्षण होत असते.

ज्या महिला तसेच पुरूषांना केसांची वाढ न होणे.केस गळणे अशा समस्येला सामोरे जावे लागत असते अशा महिला तसेच पुरूषांनी जर रोज किवीच्या फळाचे सेवण केले तर त्यांची ह्या वरील सर्व समस्यांपासुन लवकरात लवकर सुटका होत असते
● .कारण किवी ह्या फळामध्ये व्हिटँमिन बी आणि व्हिटँमिन ए ही दोघे पोषकतत्वे असतात जी आपल्या केसांच्या उत्तम आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानली जात असतात.

● किवी हे फळ खाल्ल्याने आपले ब्लड प्रेशर हे नेहमी नाँरमल राहत असते.कारण ह्या फळात असे काही गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशरला सदैव नाँरमल ठेवण्याचे काम करत असतात.

● किवी हे फळ खालल्याने आपल्या पाचनक्रियेत देखील उत्तम सुधारणा घडुन येत असते.ज्याने आपल्याला कधीही अपचनाशी संबंधित समस्या उदभवत नाही.

● ज्यांना अचानक वजन वाढण्याची समस्या उदभवत असेल त्यांच्यासाठी देखील हे फळ खुप फायदेशीर आहे.कारण किवी हे फळ जर आपण खाल्ले तर आपले वजनदेखील संतुलित राहत असते.कारण यात असे काही गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील कँलरीजचे प्रमाण संतुलित राखायचे काम करत असतात.

● ज्या व्यक्तींना झोप न येण्याची समस्या उदभवत असेल त्यांनी हे फळ खावे कारण याने आपल्याला झोप देखील चांगली लागण्यास मदत होते.

● ज्या महिला गर्भवती आहेत अशा महिलांना देखील ह्या फळाचा खुप फायदा आहे.किवी ह्या फळात फोलेट नावाचे पोषकतत्वे असते.एखादी महिला गर्भवती असल्यावर तिच्या शरीराला फोलेट ह्या पोषकतत्वाची नितांत गरज असते.
● गर्भधारणेच्या वेळी जर आईने किवी ह्या फळाचे सेवण केले तर तिच्या जन्मणारया बाळाला कुठलाही मेंदु तसेच पाठीच्या कण्याचे आजार जडत नसतात.शिवाय याचे सेवण केल्याने गर्भपाताची समस्या कमी होण्यास बरीच मदत होत असते.

See also  चिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे - Egg – Fish – Chicken –health benefits.

● दमा ह्या श्वासाशी संबंधित विकारासाठी देखील किवी फळ फार फायदेशीर असते.कारण ह्यामध्ये व्हिटँमिन सी विपुल प्रमाणात असते जे आपल्या दम्याच्या समस्येला कमी करण्यास उपयुक्त ठरते.

● याचसोबत किवी ह्या फळाचे सेवण केल्याने आपल्याला यकृताशी संबंधित कुठलीही समस्या उदभवत नसते.कारण यातील गुणधर्म हे आपल्या शरीरातील यकृताच्या समस्यांची जोखिम कमी करायला साहाय्य करीत असतात.