मधुमेहाची लक्षणे-Diabetes Symptoms In Marathi

मधुमेहाची लक्षणे-Diabetes Symptoms In Marathi

आजच्या ह्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवणामध्ये आपले प्रत्येकाचेच आयुष्य खुपच अस्थिर बनत चालले आहे.आणि याच सर्वाचा परिणाम आपल्या शारीरीक आरोग्यावर होत असतो.

कारण आपण आपल्या शरीराची कुठलीही निगा राखत नसतो,काळजी घेत नसतो.ज्याचे परिणामस्वरूप आपणास विविध शारीरीक आजारांना सामोरे जावे लागत असते.

आणि शारीरीक आजारांचा जर विषय निघला तर सर्वात प्रथम क्रमांक डायबिटीस ह्या आजाराचा लागत असतो.

डायबिटीस हा एक असा आजार आहे ज्याच्यामुळे आपणास अनेक इतर आजारांना बळी पडावे लागत असते.कारण हा एकच आजार इतर आजारांना निमंत्रण देण्याचे काम करत असतो.

आणि डायबिटीस ह्या आजाराची मुख्य आणि विशेष बाब अशी आहे की ह्या आजाराचे सुरूवातीला कोणतेही लक्षण दिसुन येत नसते.

आणि जेव्हा आपल्याला याची लक्षणे दिसुन येतात आणि आपल्याला मधुमेह झाला आहे असे कळते.तेव्हा हा आजार नियंत्रणाच्या बाहेर गेलेला असतो.

पण जर वेळ असताच आपल्याला ह्या आजाराची लक्षणे समजली आणि आपण यावर वेळ असताच उपाय केले तर तर आपण कायमचे ह्या आजारापासुन मुक्त होऊ शकतो.

याचसाठी आजच्या लेखात आपण मधुमेह ह्या आजाराच्या काही प्रमुख लक्षणांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्याला ह्या आजारापासुन नेहमी सतर्क आणि सजग राहता येईल.

चला जाणुन घेऊया मधुमेहाच्या प्रमुख लक्षणांविषयी अधिक सविस्तरपणे.

मधुमेह ह्या आजाराची लक्षणे किती आणि कोणकोणती आहेत?(Diabetes Symptoms In Marathi)

मधुमेह ह्या आजाराची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-

1) कुठलेही लक्षण सुरूवातीला दिसून न येणे-

मधुमेह ह्या आजाराचे सर्वात पहिले आणि गंभीर लक्षण तसेच धोका हा आहे की ह्या आजाराचे आपणास सुरूवातीला कुठलीही लक्षण दिसुन येत नसते.याचमुळे मधुमेह हा आपल्या शरीरात अनेक वर्षापासुन असून सुदधा आपल्याला हे कळत नसते.

म्हणुन ह्या डायबिटीसला सायलेंट किलर म्हणुन देखील ओळखले जात असते.जेवढे मधुमेह झालेले रूग्ण आज भारतात आहे त्यापैकी पन्नास टक्के मधुमुही हे मधुमेहाचे रूग्ण हे मधुमेहाचे रूग्ण म्हणुन तपासले जात असतात.

म्हणजेच त्यांना माहीत असते की आपणास मधुमेह झाला आहे पण उरलेल्या पन्नास टक्के रूग्णांना हे सुदधा माहीत नसते की त्यांना मधुमेह झालेला आहे.कारण त्यांना मधुमेहाचे कधी कुठलेही लक्षण आपल्या शरीरामध्ये दिसुनच आलेले नसते.

  • ज्यामुळे योग्य वेळी त्यांच्या मधुमेहावर कुठलेही निदान होत नसते.आणि हे खुप धोक्याचे असते कारण मधुमेहाचे निदान न होता तो आपल्या शरीरात राहिला आपल्या नकळत आपल्या रक्तामधील साखर जर वाढत राहीली तर आपल्या शरीरावर मधुमेहाचे विविध दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
  • म्हणुन आपण वेळ असताच जागरूक असायला हवे आणि वेळेतच रुटीन पदधतीने आपल्या शरीरातील साखरेची तपासणी नियमित करत राहायला हवी.कारण हाच एक मधुमेहापासुन बचाव करण्याचा तो आटोक्याच्या बाहेर जाण्याआधी त्यावर निदान तसेच उपचार करण्याचा एक उत्तम उपाय आहे.जो तज्ञ डाँक्टर देखील आपणास नेहमी सांगत असतात.
  • जेव्हा आपल्या शरीरातील साखर खुप वाढत असते किंवा वर जायला लागत असते तेव्हा पुढील काही लक्षणे आपणास आपल्या शरीरामध्ये दिसुन येत असतात.
See also  केटो डाएट म्हणजे काय ? केटो आहार - Keto Diet Plan Information In Marathi

2) जास्तीत जास्त लघवी होणे –

जेव्हा आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचा बिघाड होत असतो जसे उदा आपल्या रक्तातील एखादा घटक अधिक वाढतो तेव्हा आपले शरीर तो घटक काढुन टाकण्याचा प्रयत्न करत असते.आणि आपल्या शरीरातील कुठलाही घटक काढुन टाकण्याचे काम आपली किडनी करत असते.

लघवीवाटे हे शरीरात जास्त झालेले घटक बाहेर फेकण्याचे काम आपल्या किडनीदवारे केले जाते.

  • याचाच अर्थ जेव्हा आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढत असते.तेव्हा हे साखरेचे वाढलेले अतिरीक्त आणि त्रासदायी प्रमाण आपल्या किडनीला समजत असते.
  • तेव्हा आपली किडनी त्या शरीरात झालेल्या अतिरीक्त साखरेला लघवीवाटे तसेच युरिनदवारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते.आणि ह्याच शरीरात झालेल्या अतिरीक्त साखरेच्या प्रमाणाला कमी करण्याकरीता आपली किडनी जास्तीत जास्त लघवी तयार करू लागते.जेणेकरून आपल्या शरीरातील जास्तीत जास्त साखर बाहेर टाकली जाईल.आणि आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण पुन्हा नाँरमल कंडिशनवर येईल.
  • आणि खुप मधुमेहाच्या रूग्णांना आपल्या लघवीला जायच्या रोजच्या प्रमाणापेक्षा जास्त लघवी होत असते म्हणुन जर आपणास आपल्या लघवीला जायच्या रोजच्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त लघवी होत असेल वारंवार रात्री अपरात्री सुदधा उठुन लघवीला जावे लागत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असु शकते.

अशा वेळी आपण डाँक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यायला हवा.मधुमेह ह्या आजाराची लक्षणे किती आणि कोणकोणती आहेत Diabetes Symptoms In Marathi

3)वारंवार पाण्याची तहान लागणे,सतत पाणी पिण्याची ईच्छा होणे –

डायबिटीसमध्ये जास्तीत जास्त लघवी होणे हे पहिले लक्षण ह्या दुसरया लक्षणाशी एकदम संबंधित आहे.कारण जेव्हा आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण अधिक वाढत असते.

तेव्हा आपली किडनी त्या अतिरीक्त साखरेच्या प्रमाणाला लघवीवाटे बाहेर टाकण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लघवी तयार करत असते.

आणि साहजिकच गोष्ट आहे की जर आपणास लघवी जास्त झाली तर आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते.ज्याच्यामुळे आपल्याला वारंवार पाण्याची तहान लागते,सतत पाणी पिण्याची ईच्छा देखील होत असते.

  • म्हणजेच सतत लघवी झाल्याने तसेच होत असल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन आपल्याला वारंवार पाण्याची तहान लागत असते,तसेच सतत पाणी पिण्याची ईच्छा होत असते.
  • लघवी सारखी सारखी होत असल्याने तहान लागणे,जिभ कोरडी पडणे.तोंड कोरड पडणे ही लक्षणे जन्माला येत असतात.म्हणुन जर प्रमाणापेक्षा जास्त आणि वारंवार लघवीचा जाण्याचा त्रास होत असेल तर आपण याकडे दुर्लक्ष न करता वेळ असताच डाँक्टरांना एकदा नक्की दाखवायला हवे.
See also  ट्रोपोनिन टी टेस्ट म्हणजे काय? ट्रोपोनिन टी टेस्ट का केली जाते? - What is the troponin T test for?

4) सारखा थकवा येणे,शरीरात अशक्तपणा येणे,मरगळल्यासारखे वाटणे –

जेव्हा आपल्याला मधुमेह होत असतो आपल्या रक्तातील साखर रक्तातच राहुन जात असते ती पेशींपर्यत पोहचत नसते.किंवा पेशींना ती साखर वापरता येत नसते.

आणि पेशींना साखर वापरता न आल्यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळत नसते.म्हणजेच आपण जे अन्न खातो त्याची साखर होऊन ते पेशीत जात असते आणि त्याचीच उर्जा आपल्या शरीराला प्राप्त होत असते.

आणि ही प्रक्रिया घडुन आली नाही तर आपल्या शरीराला पुरेशी उर्जा प्राप्त होत नसते.त्यामुळे आपल्याला सतत थकवा येत असतो आणि सतत मरगळल्यासारखे देखील वाटत असते.शरीरात अशक्तपणा जाणवत असतो.

5) जास्तीत जास्त भुक लागणे –

पेशींना जेव्हा अन्न,साखर जेव्हा प्राप्त होत नसते तेव्हा आपल्या मेंदुला असे वाटत असते की आपल्या शरीराला पुरेसे अन्न प्राप्त होत नाहीये त्यामुळे पेशींपर्यत साखर पोहचत नाहीये.

मग मेंदु आपल्याला साखर प्राप्त करण्यासाठी अधिक जास्त खाण्याच्या सुचना देऊ लागतो.म्हणजेच याने आपल्याला जास्तीत जास्त भुक लागत असते.

6) वजन कमी होणे :

मधुमेहाचे अजुन एक लक्षण आहे ते म्हणजे खुप जणांचे यात काहीही वजन कमी करण्याचा प्रयत्न न करता वजन कमी होत असते.

मधुमेहात आपण जे खात असतो ते अंगाला लागत नसते कारण शरीरात साखरेचे प्रमाण खुप जास्त वाढल्याने किडनी ते कमी करण्यासाठी सर्व साखर लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम करत असते.

लहान मुलांच्या टाईप १ डायबिटीस ह्या मध्ये हे लक्षण पाहायला मिळत असते.कारण मूले लहान असल्याने त्यांचे वजन कमी झाल्यावर पालकांच्या चटकन लक्षात येत असते.कारण यात मुलाचे वजन कमी होणे,सतत खात राहणे तरी वजन कमी होणे,वारंवार लघवीला जाणे ही प्रमुख लक्षणे पालकांना दिसुन येत असतात.

7) डोळयांना धुसर दिसणे,डोळयांसमोर अंधारया येणे-

मधुमेहाचे अजुन एक महत्वाचे आणि सामान्य लक्षण म्हणजे डोळयांना धुसर दिसणे तसेच डोळयांसमोर अंधारया नेहमीच्या दृष्टीमध्ये बदल घडुन येणे हे असते.

See also  हेमोटोक्रिट टेस्ट विषयी माहिती - Hematocrit test information in Marathi

कारण रक्तात साखर वाढलेली असल्याने ती आपल्या डोळयांच्या रक्तवाहिनींपर्यत लेन्सपर्यत पोहचत असते.ज्याने डोळयांना रोजच्या दिसण्याच्या प्रमाणात बदल घडुन येतो.

डोळयांना सर्व काही धुसर दिसु लागते तसेच डोळयांसमोर अंधारया येऊ लागतात.

8) त्वचेला खाज येणे,काही इंस्फेक्शन होणे –

शरीरातील साखर वाढल्यामुळे किडनी ती अतिरीक्त साखर लघवीवाटे बाहेर टाकु लागते ज्यात आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील कमी कमी होत असते ज्याने आपली त्वचा कोरडी पडत असते.आणि आपल्या त्वचेला खाज येत असते.

9) कुठलीही झालेली जखम त्वरीत बरी न होणे –

जर आपल्या शरीरातील साखर वाढली असेल तर अशा वेळी आपल्याला झालेली कुठलीही इजा तसेच जखम त्वरीत बरी होत नसते.कारण कुठलीही जखम भरून निघण्यासाठी चांगला रक्तपुरवठा लागत असतो.शरीराला रक्त पुरवठा चांगला झाल्यावर त्या जखमेमधील घटक निघुन जात असतात.

पण शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीराला रक्त पुरवठा चांगला न मिळल्याने आपल्याला झालेली कुठलीही जखम तसेच ईजा लवकर भरली जात नसते.

1 thought on “मधुमेहाची लक्षणे-Diabetes Symptoms In Marathi”

Comments are closed.