श्रीलंका आर्थिक संकटाविषयी माहीती- Sri Lanka Economic Crises Information In Marathi

श्रीलंका आर्थिक संकट का ओढवले – Sri Lanka Economic Crises Information In Marathi

आज आपण सध्या चर्चेत असलेल्या एक अत्यंत महत्वाच्या गंभीर विषयावर सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.आणि तो विषय आहे श्रीलंका देशावर ओढावलेले आर्थिक संकट.

आपल्या सर्वानाच माहीत आहे की श्रीलंका देश सध्या खुप मोठया आर्थिक संकटाला तोंड देत आहे.अवघी 2.1 कोटी एवढीच लोकसंख्या असलेला हा देश आज खुप मोठया आर्थिक अडचणीत अडकला आहे.

श्रीलंका मधील आर्थिक संकट परिचय-Introduction About Sri Lanka Economic Crises In Marathi

श्रीलंका ह्या देशात खाण्यापिण्याच्या वस्तु,गँस,पेट्रोल ह्या सर्वाचे भाव येथे गगनाला भिडलेले आहे.आणि महागाईच्या दरात देखील येथे दुप्पट पटीने वाढ होताना दिसत आहे.त्यातच रशिया आणि युक्रेन या दोन देशात चालत असलेल्या युदधाने हा देश दूरवर फेकला गेला आहे.

नियमित वीजपुरवठा खंडित केला जाणे,पेट्रोल पंपावर लांबसडक गर्दी हे दृश्य आता रोजच श्रीलंका ह्या देशात पाहायला मिळत आहे.

श्रीलंका हा देश गँस,पेट्रोल पासुन साखरेपर्यत सर्वच वस्तुंची बाह्य देशात निर्यात करणारा देश आहे.पण श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटाने ह्या सर्वच गोष्टी विस्कळीत झालेल्या दिसुन येत आहे.

त्यामुळे श्रीलंका ह्या देशात प्रचंड महागाई वाढली आहे.आणि येथील वास्तव्यास असलेल्या लोकांना आपल्या जीवणावश्यक वस्तुंची प्राप्ती करण्यासाठी सुदधा मोठया लांबलचक रांगेत उभे राहावे लागत आहे.संघर्ष करावा लागत आहे.

See also  MMS म्हणजे काय? MMS Information In Marathi

श्रीलंका सेंट्रिल बँकेने याबाबद आपले असे मत प्रतिपादीत केले आहे की कोविड १९ ची साथ सुरू होण्याच्या कालावधीत महागाई दर फक्त 5 ते 6 टक्के अधिक जास्त होता.

  • पण फेब्रुवारी 2022 पासुन येथील चलनवाढीच्या टक्केवारीमध्ये तब्बल 18 ते 19 टक्के इतका बदल झालेला दिसुन येत आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यात 12 ते 13 टक्के इतकी वाढ झाली आहे.
  • याचसोबत श्रीलंका देशामध्ये वस्तुंच्या पुरवठयाचे प्रमाण कमी झाले असुन त्यांच्या मागण्या अधिक वाढु लागल्या आहेत.
  • आणि अलिकडेच श्रीलंकेकडुन एक घोषणा देखील करण्यात आली होती ज्यात श्रीलंकेने असे सांगितले होते की सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंका देश सध्या कुठल्याही प्रकारच्या विदेशी कर्जाची परतफेड करू शकणार नाही.
  • ज्याचे कारण कोरोना आणि युक्रेनचे संकट आहे असे सांगितले गेले आहे.
  • सध्या श्रीलंका ह्या देशामध्ये वाढती महागाई,जीवनावश्यक खाण्या पिण्याच्या वस्तुंचा वाढता तुटवडा,कमी विज पुवठा ह्यामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांकडुन मोठया प्रमाणात निदर्शने केल्याच आढळुन येत आहे.
  • श्रीलंका देशावर ओढावलेल्या ह्या आर्थिक संकटातुन बाहेर पडुन देशाची आर्थिक परिस्थिती पुन्हा रूळावर आणण्यासाठी श्रीलंकेकडुन आंतरराष्टीय नाणेनिधी संघटनेसोबत चर्चा देखील घडुन येणार असल्याचे मागील काही महिन्यात ऐकु येत होते.

जेव्हापासुन श्रीलंका ह्या देशाने 1948 मध्ये इंग्लंड ह्या देशापासुन स्वातंत्र्य प्राप्त केले तेव्हापासुन कर्ज परतफेडीच्या बाबतीत श्रीलंका हा देश नेहमी अग्रेसर असलेला दिसुन येत होता.

पण देशावर अचानक ओढावलेल्या ह्या आर्थिक आपत्तीमुळे श्रीलंका देशाची अवस्था इतकी कमकूवत आणि बिकट झाली आहे की ह्या देशाला कर्जाची परतफेड करणे देखील शक्य राहिले नाहीये.

पण श्रीलंकेत अशी परिस्थिती कायमस्वरूपी राहणार नाही याबाबत आम्ही लवकरात लवकर काहीतरी ठोस पाऊल उचलू असे श्रीलंकेने म्हटले आहे.

श्रीलंकेत जीवनावश्यक तसेच खाण्या पिण्याच्या वस्तुंच्या किंमतीत झालेली वाढ –

कुठलाही खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी वाळलेली मिरची नेहमी लागत असते.पण ह्या मिरचीच्या किंमतीत सध्या मागील वर्षाच्या तुलनेत 195 टक्के इतकी वाढ झालेली आहे.ज्यामुळे ही मिरची खरेदी करणे सर्वसामान्य आणि गरीब नागरीकांना कठिन जात आहे.

See also  मातृत्व दिनासाठी स्पेशल गिफ्ट आयडिया - Mothers day special gift ideas 2023 in Marathi

● एक किलो सफरचंद हे 2021 मध्ये 55 ते 56 प्रति किलो रूपये इतके होते.पण त्यात सुदधा आता दुप्पट पटीने वाढ झाली आहे ज्यामुळे हे आरोग्यदायी फळ सफरचंद खरेदी करणे देखील येथील जनतेस शक्त होत नाहीये.

● खोबरेल तेल खरेदी करायला जिथे येथील नागरीकांस 520 रुपये लागायचे तिथे आज येथील स्थानिक लोकांना प्रति लीटर 820 ते 825 रुपये मोजावे लागत आहे.

● तांदुळ आधी 120 ते 125 रूपये किलो मिळायचे पण ते देखील आता 206 रुपये किलो इतके झाले आहे.

● कांदे आधी 220 ते 225 रूपये किलो मिळायचे पण ते देखील आता 350 रुपये किलो इतके झाले आहे.

● तांदुळ आधी 96 रूपये किलो मिळायचे पण ते देखील आता 185 रुपये किलो इतके झाले आहे.

● साखर इथे आधी 115ते 120 रूपये किलो मिळायचे पण ती देखील आता 230 रुपये किलो इतकी झाली आहे.

म्हणजेच जीवनावश्यक वस्तु खरेदी करणे देखील नागरीकांना वाढत्या महागाईमुळे शक्य होत नाहीये.ज्याचे परिणाम स्वरूप येथील गरीब सर्वसामान्य जनतेला अन्नाचा त्याग करायची वेळ आली आहे.

श्रीलंकेने सर्वात जास्त कर्ज आत्तापर्यत कोणत्या देशाकडून घेतले आहे?

जसे की आपणा सर्वानाच माहीत आहे की आर्थिक संकटामुळे श्रीलंका हा देश सध्या कर्जाच्या जाळयात अडकलेला आहे.

श्रीलंकेतील सरकारी विभागाच्या आकडेवारीचा अंदाजा घेतल्यास आपणास हे दिसुन येते की श्रीलंकेने सर्वात जास्त कर्ज चीन ह्या देशाकडुन घेतले आहे.

आणि आंतराष्टीय संघटनांमध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेने श्रीलंकेला अधिक कर्ज प्रदान केलेले दिसुन येत आहे.

श्रीलंका देशावर ओढावलेल्या आर्थिक संकटाचे कारण काय आहे?- Reason Of Economic Crises Arise In Sri Lanka In Marathi

  • परकीय देशाचे डोक्यावर असलेले अवाढव्य कर्ज हेच श्रीलंकेतील ह्या आणीबाणीच्या परिस्थितीचे कारण मानले जात आहे.
  • तसेच 2022 मधील फेब्रूवारी महिन्यात 75 टक्के पेक्षा अधिक युरोपियन लोकांनी श्रीलंकेला भेट दिली होती.जर शासनाच्या मासिक पर्यटन अहवालाचा आढावा घेतला तर आपणास असे दिसुन येईल की ह्या वर्षी तब्बल 15 हजार 350 पर्यटक हे रशिया ह्या देशामधून श्रीलंकेत आले होते.आणि ही फेब्रूवारी महिन्यात कुठल्याही देशामधुन श्रीलंकेत आलेल्या पर्यटकांच्या संख्येतील सर्वाधिक संख्या होती.
  • पण आता रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे या दोन्ही देशातील श्रीलंकेला भेट देत असलेल्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.
  • याआधी सुदधा कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे येथील पर्यटन व्यवसायाला खुप मोठया नुकसानाचा फटका सहन करावा लागला होता.त्यातच चहा,रबर,मसाले आणि कपडे इत्यादी वस्तुंच्या निर्यातीला देखील कोरोनाच्या काळात फटका बसला होता.
  • एकंदरीत श्रीलंकेत येत असलेल्या रशियातील पर्यटकांची वर्दळ थांबल्याने येथील पर्यटन व्यवसाय नुकसानाला सामोरे जात आहे.शिवाय युदधाच्या नंतर पेट्रोल,गहु यासारख्या वस्तुंच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
See also  डयुओ म्हणजे काय - Duo meaning in Marathi

आणि देशाचे व्यापार तुटीतील असंतुलन देखील श्रीलंकेतील आर्थिक संकटास कारणीभुत असल्याचे आपणास दिसुन येते.कारण श्रीलंकेच्या रूपयाची अमेरिकन डाँलरच्या तुलनेमध्ये घसरण झालेली आहे.

श्रीलंका ह्या देशाला ह्या आर्थिक संकटाच्या काळात कोण मदत करत आहे?

अनेक महिने,राजपक्षे यांच्या प्रशासनाकडुन आणि सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका (CBSL) कडुन वाढत्या रिस्क असून देखील आय एम एफ कडून मदत घेण्यास स्पष्ट विरोध केला जात होता.

परंतु फेब्रुवारीच्या उत्तरार्धात रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्लयाची पार्श्वभूमी बघता,आणि अचानक तेलाच्या किमती मध्ये झालेल्या वाढीनंतर,श्रीलंका सरकारने अखेरीस एप्रिल महिन्यामध्ये आयएमएफकडे मदतीसाठी जाण्याची योजना तयार केली आहे.

भारत देशाकडुन देखील 500 मिलियन डाँलर्सची आर्थिक मदत श्रीलंकेला केली जात आहे.

श्रीलंका आर्थिक संकटाची मे महिन्यातील सध्याची स्थिती काय आहे?

  • सध्या येथील आर्थिक संकटाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे.ज्याचे परिणाम स्वरूप प्रदर्शन कारींकडुन येथे हिंसा तसेच जागोजागी तोडफोड जाळपोळ देखील केली गेली होती.
  • राष्टपती कार्यालयाच्या भोवती जमावाकडुन गर्दी केली जात आहे.ज्यात राष्टपती आणि प्रधानमंत्री या दोघांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती.
  • संतप्त नागरीकांकडुन अनेक नेत्यांच्या घराला आग देखील लावण्यात आली आहे.ज्यामुळे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे.
  • यातच 6 मे रोजी आपातकालीन परिस्थितीची घोषणा देखील करण्यात आली होती.