पुश अप करण्याचे फायदे- Benefits Of Push Ups In Marathi

व्यायाम – पुश अप करण्याचे फायदे- Benefits Of Push Ups In Marathi

मित्रांनो ही एक गोष्ट आपल्या सर्वानाच चांगली माहीत आहे की जर आपणास आपले शरीर सदैव निरोगी आणि तंदुरस्त ठेवायचे असेल तर यासाठी आपण पौष्टिक आहारासोबत नियमित व्यायामही करणे फार गरजेचे आहे.

आणि पुश अप्स हा एक असा शारीरीक व्यायाम आहे जो आपण व्यायामशाळेत तसेच घरीसुदधा करू शकतो.जो केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात.जे आपल्यापैकी बहुतेक जणांना अजिबात माहीत देखील नसते.

म्हणुन याचकरीता आज आपण पुश अप केल्याने आपल्या बाँडीला कोणकोणते फायदे होत असतात?हे जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपल्याला देखील ह्याचा लाभ उठविता येईल.आणि आपले शरीर अधिक मजबुत आणि तंदुरस्त बनवता येईल.

चला तर मग जाणुन घेऊया पुश अप्स केल्याने होत असलेल्या फायद्यांविषयी अधिक सविस्तरपणे.

पुश अप करण्याचे फायदे किती आणि कोणते आहेत? – Benefits Of Push Ups In Marathi

पुश अप करण्याचे पुढीलप्रमाणे काही महत्वाचे फायदे आहेत जे आपणास होत असतात-

● आपल्या स्नायुंची वाढ घडवून आणण्याचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणजे पुश अप्स असतो.आपल्या शरीरात जे बायसेप्स असतात त्यांच्यामुळे आपले मागचे स्नायु आणि छातीचे स्नायु या दोघांवरही ताण पडत असतो.ज्याचे परिणामस्वरूप आपले मागील आणि छातीचे स्नायु अधिक कणखर आणि मजबुत बनत असतात.आणि जर आपण नियमित पुश अप्स केले तर नवीन स्नायुंची देखील निर्मिती होत असते.

  • ● रोज पुश अप्स केल्याने आपल्या शरीराचा वरील भाग आणि धड हे अधिक मजबुत आणि कणखर होत असतात.पुश अप करण्याचे फायदे किती आणि कोणते आहेत? - Benefits Of Push Ups In Marathi
See also  जागतिक आरोग्य दिन २०२३ । तारीख । इतिहास । World Health Day 2023 In Marathi

● रोज पुश अप्स केल्याने आपल्या स्नायु तंतुमध्ये सुधारणा होत असते.ज्याचे परिणामस्वरूप आपले शरीर नेहमी स्थिर आणि संतुलित राहत असते.

● पुश अप्स केल्याने आपल्या शरीरातील सर्व स्नायु नेहमी सक्रीय राहत असतात.कारण जेव्हा आपण पुश अप्स करत असतो तेव्हा आपल्या शरीरातील सर्व स्नायु एकाचवेळी सक्रिय असतात.ज्याचे परिणाम स्वरूप आपल्या शरीराच्या कार्य करण्याच्या क्षमतेत वाढ होत असते.

● पुश अप्स करण्याचा अजुन एक फायदा असतो तो म्हणजे पुश अप्स केल्याने आपल्या हदयाचे आरोग्य नेहमी चांगले राहत असते.आणि एक गोष्ट आपल्याला सर्वानाच चांगले माहीत आहे की जर आपल्याला नेहमी निरोगी आणि तंदुरस्त जीवन जगायचे असेल तर त्यासाठी आपल्या हदयाचे आरोग्य चांगले राहणे किती महत्वाचे असते.आणि एका संशोधनातुन हे सिदध झाले आहे की पुश अप्स केल्याने आपल्या हदयाचे आरोग्य नेहमी उत्तम राहत असते.

● जर आपण रोज पुश अप्स मारल्या तर याने आपली हाडे देखील अधिक मजबुत होत असतात.

● रोज पुश अप्स मारल्याने आपल्या शरीरात असलेले एचजीएचचे उत्पादन वाढत असते.आणि आपल्या शरीराची व्यवस्थित पुर्णपणे वाढ होण्यासाठी त्याचा संपुर्ण होण्यासाठी एचजी एच हे फार महत्वाचे असते.कारण जर आपल्या शरीरामध्ये एचजीएचचे प्रमाण जर कमी असेल तर आपल्या हाडांची स्नायुंची पाहिजे तितके वाढ होत नसते.

● दररोज पुश अप्स मारण्याचा अजुन एक फायदा आहे तो म्हणजे याने आपले खांदे देखील अधिक कणखर आणि मजबुत बनत असतात.आणि आपल्या शरीराचा बांधा देखील नेहमी सुडौल राहत असतो.

● जर आपल्याला आपले वजन कमी करायचे असेल तर आपण रोज पुश अप्स मारायलाच हव्यात कारण पुश अप्स मारल्याने आपल्या शरीरातील सर्व मांसपेशी तर निरोगी राहतातच सोबत आपल्या शरीराच्या वजनात देखील घट होत असते.तसेच ते नेहमी नियंत्रणात राहत असते अधिक जास्त प्रमाणात वजन आपले वाढत नसते.

See also  न्यूट्रिशन बार म्हणजे काय ? Nutrition Bars information Marathi

● पुश अप्स केल्याने आपल्या शरीरातील फँट म्हणजेच चरबीसुदधा अधिक वाढलेली असेल तर ती कमी होण्यास मदत होत असते.

● पुश अप्स केल्याने आपल्या शरीरामधील सर्व आळस निघुन जात असतो.कारण पुश अप्स केल्याने आपल्या शरीराचे सर्व अवयव सक्रिय आणि अधिक कार्यक्षम बनत असतात ज्याचे परिणामस्वरूप कोणतेही काम करताना आपल्याला आळस तसेच कंटाळा येत नाही.

● पुश अप्स केल्याने आपल्या शरीरातील रक्ताचा प्रवाह हा नेहमी सुरळीतपणे चालु राहत असतो ज्याचे परिणाम स्वरूप आपल्याला हदयाशी संबंधित कुठलाही विकार जसे की हार्ट अटँक वगैरे सारखे विकार जडत नसतात.

तसेच आपणास आँस्टिओपाँरिसिसचा धोका देखील जाणवत नाही.जेव्हा हाडांची घनता कमी होत असते तेव्हा ऑस्टिओपोरोसिस हा आजार आपणास जडत असतो.हा आजार अधिकतम वृदध लोकांना जडत असतो.अशा परिस्थितीत आपण जर यावर उपाय म्हणुन चांगल्या आहाराचे सेवन केले आणि नियमित पुश-अप्स आणि वजन उचलण्याचे व्यायाम केले तर आपणास ऑस्टिओपोरोसिसचा आजार जडण्याचा धोका कमी असतो .

● पाठदुखी तसेच कंबरदुखीचा कुठलाही त्रास आपणास जाणवत नाही.कारण पुश अप्स केल्याने आपल्या पाठीचे आणि कमरेचे स्नायु बळकट झालेले असतात.

● पुश अप्स केल्याने आपल्या शरीरातील टेस्टोस्टेराँन हार्मोन्सची पातळी वाढत असते.ह्या हार्मोन्समुळे आपली हाडे आणि स्नायु बळकट होत असतात.

● पुश अप्स केल्याने आपल्या शरीराला एक चांगला आकार प्राप्त होतो तसेच त्याच्या लवचिकतेत देखील वाढ होत असते.

अशा प्रकारे आजच्या लेखात आपण पुश अप्स केल्याने आपणास जेवढेही शारीरीक आणि आरोग्यदायी फायदे होत असतात त्या सर्वाविषयी जाणुन घेतले आहे.

पुश अपस करणे कोणी टाळायला हवे?

पुश अप करणे जरी आपल्या शरीरासाठी आणि हदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी खालील काही व्यक्तींनी पुश अप करणे शक्यतो टाळायला हवेत-

  • ज्यांचा खांदा किंवा सांधा दुखतो आहे.

  • ज्यांचे मनगट दुखते आहे.

  • किंवा ज्यांच्या खांदयाचे तसेच मनगटाचे एखादे आँपरेशन झाले आहे अशा व्यक्तींनी पुश अपस मारणे टाळायला हवे.
  • ज्यांना एखादी गंभीर शारीरीक दुखापत झाली आहे.अशा व्यक्तींनी देखील पुश अपस मारू नये.
See also  दिवसभर उत्साही राहण्यासाठी हे Energy Booster पदार्थ लाभदायक