Nutrition म्हणजे काय – Nutrition Complete Information In Marathi
जीवन जगत असलेल्या प्रत्येक मानवाला जिवंत राहण्यासाठी अन्नाचे आणि पाण्याचे सेवन करण्याची आवश्यकता असते.
कारण अन्न आणि पाण्याचे सेवन केल्यानेच आपल्या शरीराला उर्जा प्राप्त होत असते.आणि आपण ज्या अन्नाचे तसेच आहाराचे सेवन करत असतो त्यात काही आपल्या शरीराला आवश्यक अशी पोषकतत्वे देखील समाविष्ट असतात.ज्याने आपल्या शरीराचे भरण पोषण होत असते.
म्हणजेच जेवण केल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेली व्हिटँमिन,प्रोटीन,मिनरल्स,कार्बोहायड्रेटस पाणी इत्यादी घटक पदार्थ प्राप्त होत असतात ज्यांना आपण पोषक तत्वे असे म्हणत असतो.
पण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवणात आपण इतके व्यस्त होऊन जात असतो की आपले आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष राहत नसते ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेली सर्व महत्वाची पोषणत्तवे प्राप्त होत नसतात.
आणि आपल्या शरीरात पुढे जाऊन आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात मग शरीरात पोषकतत्वांची कमतरता असल्याचे डाँक्टर आपल्याला सांगत असतात व पोषक आहाराचे सेवण करावयाचा सल्ला आपणास देत असतात.
आजच्या लेखात आपण ह्याच पोषकत्तत्व म्हणजेच न्युट्रीशन विषयी सविस्तरपणे Complete Information On Nutrition In Marathi माहीती जाणुन घेणार आहोत.ज्याचा समावेश आपण आपल्या आहारात करणे अत्यंत गरजेचे असते.
पोषण म्हणजे काय ? Nutrition म्हणजे काय
आपण आपल्या शरीरात आहारातुन विविध पोषणद्रव्ये घेत असतो.आणि त्याच पोषण द्रव्यांमुळे आपल्याला उर्जा प्राप्त होत असते.आणि आपले भरण पोषण होत असते याच संपुर्ण प्रक्रियेला आपण पोषण असे म्हणत असतो.
पोषण तत्वे म्हणजे काय? –What is nutrients?
आपल्या शरीराच्या वाढीसाठी भरण पोषणासाठी आवश्यक असलेल्या अन्नघटकांना आपण पोषणतत्वे असे म्हणत असतो.ज्यात विविध व्हिटँमिन,प्रोटीन,मिनरल्स,कार्बोहायड्रेट इत्यादींचा समावेश असतो.
पोषण तत्वांचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?त्यांचे महत्व काय आहे? Types of nutrition.
आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व्यवस्थित भरण पोषण होण्यासाठी आपल्याला अनेक पोषणतत्वांची आवश्यकता असते.आणि ही पोषकतत्वे पुढीलप्रमाणे असतात :
1) जीवनसत्व (व्हिटँमिन ) :
2) प्रथिने (प्रोटीन) :
3) खनिजे (मिनरल्स)
4) कर्बोदके (कार्बोहायड्रेट) :
5) पाणी (वाँटर) :
6) चरबी (फँट)
1)जीवनसत्व (व्हिटँमिन ) :
जीवनसत्व हा आपल्या आहारातील एक प्रमुख अन्नघटक असतो.ज्याची आवश्यकता आपल्या प्रत्येकाला असते.
जीवनसत्व हा असा एक घटक असतो जो आपले शरीर स्वता निर्माण करू शकत नसते.म्हणुन ही जीवनसत्वे शरीराला प्राप्त व्हावी यासाठी आपण व्हिटँमिनयुक्त आहाराचे सेवण करून त्याद्वारे ही प्राप्त करत असतो.
कारण व्हिटँमिनच्या कमरतरेमुळे आपल्याला विविध शारीरीक आजार देखील जडु शकतात.आणि आपले शारीरीक स्वास्थ्य देखील चांगले राहत नसते.तसेच शरीराची वाढ देखील व्यवस्थित होत नसते.म्हणुन आपण आहारात व्हिटँमिनचा समावेश हा करायलाच हवा.
चला तर मग जाणुन घेऊया व्हिटँमिनचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत.
व्हिटँमिनचे प्रकार – Types of Vitamin
1) व्हिटँमिन ए –
व्हिटँमिन ए आपल्या डोळयांच्या उत्तम आरोग्यासाठी फार महत्वाचे असते.तसेच व्हिटँमिन ए चे सेवण केल्याने आपल्या रोगप्रतीकारक क्षमतेत वाढ होऊन आपला अनेक संक्रमित आजारांपासुन बचाव देखील होत असतो.
डायबिटीस तसेच दम्या सारख्या आजारावर देखील व्हिटँमिन ए उपयुक्त ठरत असते.
व्हिटँमिन ए प्राप्त होणारे स्रोत –
व्हिटँमिन ए प्राप्त होणारे स्त्रोत पुढीलप्रमाणे आहेत:
- पपई
- चिकू
- टरबुज
- आंबा
- अंडे
- गाजर
- टमाटे
- हिरवा भाजीपाला
वरील इत्यादी अन्नपदार्थ हे व्हिटँमिन ए चे स्रोत आहेत.
व्हिटँमिन ए च्या कमतरतेने होणारे नुकसान :
- दात कमकुवत होणे
- थकवा येणे
- सर्दी खोकला होणे
- झोप देखील येत नसते
- वजनात घट होणे
- रातांधळेपणा येणे (रात्री अंधत्व आल्याने काहीही न दिसणे)
- न्युमोनिया देखील होतो.
व्हिटँमिन ए चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम-
- आपले डोके दुखत असते
- आपले केस गळतात
- आपली त्वचा खराब होते
- पाहताना डोळयांना त्रास होतो
- आपली हाडे दूखत असतात तसेच गुडघे देखील दुखत असतात.
- याचसोबत गर्भवती महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाला देखील याने नुकसान पोहचत असते.
- याचसोबत आपल्याला हदयाशी संबंधित विविध आजार देखील जडत असतात.
2) व्हिटँमिन बी 1 –
व्हिटँमिन बी 1 हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी देखील फार महत्वाचे असते.व्हिटँमिन बी 1 मुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होत असते.आणि याचसोबत याने आपला तणाव देखील कमी होत असतो.
व्हिटँमिन बी 1 चे प्रमुख स्रोत –
- मासे
- अंडे
- दुध
- मटण
- दाळी
- बदाम
- गहु
- वाटाणे
व्हिटँमिन बी 1 च्या कमतरतेने होणारे नुकसान –
- व्हिटँमीन बीच्या कमतरतेने आपल्याला चक्कर येतात.
- एकाग्रता कमी होणे
- स्वभाव देखील चिडचिडा होऊन जात असतो.
- डोळयांसमोर अंधारया येत असतात.
व्हिटँमिन बी 1 चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम-
- व्हिटँमिन बी चे अधिक सेवन केल्याने आपल्याला झोप येत नसते
- आपले ओंठ निळे पडत असतात.
- त्वचेच्या अ़ंँलर्जीचा त्रास होत असतो
- छाती दूखत असते
- श्वासासंबंधित विविध विकार जडत असतात
- गर्भवती स्त्रीच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या मेंदुवर देखील विपरीत परिणाम होत असतो.
3) व्हिटँमिन बी 2 –
व्हिटँमिन बी 2 मुळे डोकेदुखीचा त्रास कमी होत असतो.डोळयांचे केसांचे आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते.आणि शरीरातील उर्जेत देखील वाढ होत असते.कँन्सरसारख्या भयंकर आजारांपासुन आपले रक्षण होते.
व्हिटँमिन बी 2 चे स्त्रोत –
- दुध आणि दुधापासुन तयार केलेले इतर पदार्थ
- अंडे
- मासे
- चिकण
- मटण
- दही
- लाल मिरची
- किशमिश
व्हिटँमिन बी 2 च्या कमतरतेने होणारे नुकसान –
- डोळयात जळजळ होते
- नजर कमी होते
- ओठ जळजळ करीत असतात
- जिभेला फोड देखील येत असतात
- कानाच्या मागच्या बाजुस खाजव होते
व्हिटँमिन बी 2 चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम –
- लिव्हरविषयी समस्या उदभवू शकते.
4) व्हिटँमिन बी 3 –
व्हिटँमिन बी 3 चे सेवन केल्याने आपल्या त्वचेचे आरोग्य उत्तम राहते.व्हिटँमिन बी 3 हदय रोगासाठी देखील साहाय्यक ठरत असते.
व्हिटँमिन बी 3 चे स्त्रोत –
- भुईमुग
- मासे
- सुर्यफुलाच्या बिया
- वाटाणे
- बिन्स
- शिमला मिरची
- चिकण
- मटण
- धान्य
इत्यादी.
व्हिटँमिन बी 3 च्या कमतरतेने होणारे नुकसान –
- त्वचेवर सुज येत असते जळजळ होत असते
- त्वचा अतिसंवेदनशील बनत असते.
- त्वचेवर पुळया देखील येत असतात. -इत्यादी.
व्हिटँमिन बी 3 चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम :
व्हिटँमिन बी ३ चे अधिक प्रमाण असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्याने आपल्याला बहुदा कोणतेही नुकसान होत नसते पण व्हिटँमिन बी ३ असलेल्या गोळया औषधांचे अधिक सेवन केल्याने समस्या निर्माण होत असते.
- चक्कर येत असतात.
- हदयाची धड धड कमी जास्त होत राहते.
- उलटया होत असतात.
- खाजव येत असते.
- पोटाच्या खालच्या भागात दुखत असते.
5) व्हिटँमिन बी 6 –
व्हिटँमिन बी ६ चे सेवन केल्याने आपल्या रक्तवाहिन्या व्यवस्थित कार्य करत असतात.अँनिमियापासुन आपले रक्षण होते.आणि आपल्या डोळयांचे आरोग्य देखील चांगले राहते.
व्हिटँमिन बी 6 चे स्रोत –
- दुध
- मासे
- गाजर
- वटाणे
- केळी
- अंडी
- चिकन
व्हिटँमिन बी ६ च्या कमतरतेने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन बी ६ च्या कमतरतेमुळे आपले ओठ फुटत असतात.
- जीभेला देखील सुज येत असते.
- आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेत घट होते
- आपले हात तसेच पाय देखील खुप दुखतात.
व्हिटँमिन बी ६ चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम :
- सुर्याचा प्रकाश आपल्या अंगावर पडल्यावर आपल्या त्वचेवर जळ जळ होत असते.
- नवजात जन्मलेल्या बालकासाठी व्हिटँमिन बी ६ चे अधिक सेवण करणे घातक ठरत असते.
6) व्हिटँमिन बी 5 –
व्हिटँमिन बी ५ मुळे आपल्या शरीरातील हार्मोन उत्तेजित होत असतात.तणाव कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर ठरत असते.याचसोबत याने आपल्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होत असते.हार्टसाठी सुदधा व्हिटँमिन बी ५ हे खुप महत्वाचे असते.
व्हिटँमिन बी ५ चे स्त्रोत –
- सुर्यफुलाच्या बिया
- अंडी
- साखरचंद
- दाळ
- चिकन
- मासे
- दुपापासुन तयार करण्यात आलेले इतर पदार्थ
व्हिटँमिन बी ५ च्या कमतरतेने होणारे नुकसान –
- डोके दुखते
- शांतपणे झोप येत नसते.
- पोट दुखते.
- वांत्या होत असतात
- भुक देखील लागत नसते.
व्हिटँमिन बी ५ च्या अतीसेवनामुळे होणारे नुकसान –
- शरीरात पाण्याची कमतरता जाणवने
- सांधे दूखत असतात
- नैराश्य येते
7) व्हिटँमिन बी 7 –
व्हिटँमिन बी ७ मुळे आपल्या डाग पुळया निघून जात असतात.आपल्या शरीरात असलेले ग्लुकोजचे प्रमाण वाढवण्याचे व्हिटँमिन बी ७ करते.आपले केस,नखे आणि संपुर्ण त्वचा देखील हेल्दी राहते.
व्हिटँमिन बी ७ चे स्त्रोत :
- बदाम
- मासे
- पालक
- दुध
- दही
- भुईमुग
- केळी
व्हिटँमिन बी ७ च्या कमतरतेने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन बी च्या कमतरतेने आपल्या बोटाची नखे कमकुवत होऊन लवकर तुटु लागतात.
- व्हिटँमिन बी ७ च्या कमतरतेमुळे आपले केस देखील लवकर गळु लागतात.
- आपल्यामधील स्ट्रेस आणि डिप्रेशन मध्ये वाढ होते.
- शरीरातील रक्त कमी होते.आणि शारीरीक दुर्बलता निर्माण होते.
व्हिटँमिन बी ७ च्या अधिक सेवणाने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन बी ७ च्या अधिक सेवन केल्याने आपल्याला पुन्हा पुन्हा पाण्याची तहान लागत असते.
- वारंवार जुलाब देखील होतात.
8) व्हिटँमिन बी 12 –
व्हिटँमिन बी १२ मुळे आपल्या शरीरामधला थकवा कमी होत असतो.आणि शरीराला उर्जा देखील प्राप्त होत असते.शरीरामधील कोलेस्टेराँलचे प्रमाण देखील संतुलित राहत असते.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे व्हिटँमिन बी १२ च्या सेवणामुळे आपल्याला कँन्सर होण्याची शक्यता फार कमी असते.
व्हिटँमिन बी १२ चे स्त्रोत –
- दुध
- अंडी
- मासे
- चिकण
व्हिटँमिन बी १२ च्या कमतरतेने होणारे नुकसान –
- थकवा येतो
- भुक कमी लागत असते
- वजन।देखील कमी कमी होत जाते
- शरीरात अशक्तपणा निर्माण होतो
व्हिटँमिन बी १२ च्या अधिक सेवणाने होणारे नुकसान –
- लिव्हरसंबंधित प्राँब्लेम आपल्याला येऊ शकतो
- व्हिटँमिन बी १२ चे अधिक सेवण केल्याने आपली किडनी देखील खराब होऊ शकते.
9) व्हिटँमिन सी –
व्हिटँमिन सीचे आपल्याला अनेक फायदे होत असतात.व्हिटँमिन सीचे सेवन केल्याने आपल्या जखम लवकर भरत असते.त्वचा देखील सुरक्षित राहत असते.सुर्याच्या किरणांपासुन आपल्या त्वचेचे रक्षण होते.आणि हाडे देखील मजबुत होत असतात.
व्हिटँमिन बी चे स्त्रोत :
- संत्री
- पपई
- स्ट्राँबेरी
- टमाटा
- आवळा
- लिंबु
- केळी
व्हिटँमिन सी च्या कमतरतेने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन सी च्या कमरतेमुळे आपल्याला स्कर्वी नावाचा रोग होऊ शकतो.
- त्वचेविषयी विविध समस्या निर्माण होत असतात.
- शरीरातील रक्त कमी होते.
व्हिटँमिन सीचे अधिक सेवन केल्याने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन सीचे अधिक सेवन केल्याने आपली किडनी खराब होऊ शकते
- व्हिटँमिन सीचे अधिक सेवन केल्याने आपल्याला पोटाच्या विविध समस्या उदभवत असतात.
10) व्हिटँमिन डी –
व्हिटँमिन डीचे सेवन केल्यामुळे आपली हाडे मजबुत बनतात.आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील व्हिटँमिन डी चे सेवण केल्याने नियंत्रणात राहत असते.
व्हिटँमिन डी चे सेवण केल्यास आपल्याला कँन्सर होण्याची शक्यता देखील फार कमी असते.
व्हिटँमिन डी चे स्त्रोत –
- बदाम
- संत्री
- अंडी
- मासे
- दुध
- दही
व्हिटँमिन डीच्या कमतरतेने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन डी च्या कमतरतेने आपले ब्लड प्रेशर वाढ असते.
- सांधे आणि हाडे देखील खुप दुखतात.
- शरीरात कमजोरी आणि थकवा जाणवत असते.
व्हिटँमिन डी चे अधिक सेवन केल्याने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन डीचे अधिक सेवण केल्याने हाडे कमजोर होतात.
- आपली किडनी देखील फेल होण्याची शक्यता असते.
- पोटदुखीची समस्या उदभवू शकते.
- आपल्याला वांत्या देखील होऊ शकतात.
11) व्हिटँमिन ई –
व्हिटँमिन ई मुळे आपला मानसिक तणाव तसेच इतर समस्या देखील दुर होत असतात.याने आपल्या शरीरातील इम्युनिटी पावर देखील वाढत असते.व्हिटँमिन ई हे आपल्या त्वचेसाठी देखील खुप फायदेशीर असते.
व्हिटँमिन ई चे स्त्रोत –
- बदाम
- पालक
- सुर्यफुलाच्या बिया
व्हिटँमिन ई च्या कमतरतेमुळे होणारे नुकसान –
- पचना संबंधित विविध समस्या निर्माण होतात
- डोळयांना देखील कमी दिसत असते
- मांसपेशींमध्ये कमजोरी येत असते
व्हिटँमिन ई च्या अधिक सेवणाने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन ई चे अधिक सेवन केल्याने आपल्याला अधिक थकवा येत असतो.
- व्हिटँमिन ई चे अधिक सेवण केल्याने आपल्याला ब्लिडींगची समस्या उदभवू शकते.
12) व्हिटँमिन के –
व्हिटँमिन के पासुन आपल्याला अनेक फायदे होत असतात.प्रसुतीच्या वेळी ब्लीडिंग थांबवण्यासाठी व्हिटँमिन के चा उपयोग होत असतो.
व्हिटँमिन के हदयासाठी हाडांसाठी देखील फायदेशीर ठरत असते.आपल्याला कँन्सर होण्याची संभावना देखील याने कमी होत असते.
व्हिटँमिन के चे स्रोत :
- अंडी
- केळी
- मुळा
- लाल मिरची
व्हिटँमिन के च्या कमतरतेने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन के च्या कमतरतेने आपली हाडे कमकुवत बनत असतात.
- नाकातुन देखील रक्तस्राव होत असतो.
- गर्भवती महिलेच्या प्रसुतीच्या काळात रक्त स्रावाची समस्या उदभवत असते
व्हिटँमिन के चे अधिक सेवण केल्याने होणारे नुकसान –
- व्हिटँमिन के चे अधिक सेवण केल्याने आपले रक्त पातळ होत असते.
2) प्रथिने (प्रोटीन) : Complete Information On Nutrition In Marathi
प्रोटीनमुळे आपले शरीर पहिलवानासारखे धष्टपुष्ट आणि तंदुरस्त बनत असते.प्रोटीन्समुळेच आपले मसल्स देखील बिल्ड होत असतात.
प्रोटीन्सचे स्त्रोत :
- मासे
- अंडी
- दुध
- मांस
- भुईमुग
प्रोटीन्सच्या कमतरतेने होणारे नुकसान –
- प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे आपला शारीरीक विकास होत नसतो.आपल्या शरीरातील अवयवांची वाढ होत नसते.
- प्रोटीन्सच्या कमतरतेने आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असते.
- शरीरात प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे आपल्याला थकवा जाणवत असतो.
प्रोटीन्सच्या अधिक सेवणाने होणारे नुकसान –
- प्रोटीन्सचे अधिक प्रमाणात सेवण केल्याने आपले वजन वाढु शकते.
- डिहायड्रेशनची समस्या देखील आपल्याला होत असते.
- आपल्या किडनीसाठी देखील नुकसान दायी ठरत असते.
3) खनिजे (मिनरल्स ) :
खनिजांचे(मिनरल्सचे)सेवण केल्याने आपली हाडे दात,त्वचा केस मजबुत होत असतात.मिनरल्सचे सेवन करणे आपल्या शारीरीक वाढीसाठी तसेच विकासासाठी फार गरजेचे असते.
मिनरल्सचे प्रकार :
- सोडिअम
- पोटँशिअम
- मँग्नेशिअम
- आयर्न
- बोराँन
- आयोडीन
- काँपर
- फाँस्फरस
- क्रोमियम
- सिलिकाँन
मिनरल्सचे कमी सेवण केल्याने होणारे नुकसान –
- मिनरल्सच्या कमतरतेमुळे आपल्याला सांधेदुखी तसेच गुडघेदूखीचा त्रास होत असतो.
- मिनरल्सच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला थकवा तसेच अशक्तपणा जाणवत असतो.
- मिनरल्सच्या कमतरतेमुळे आपले केस देखील गळत असतात.
4) कर्बोदके(कार्बोहायड्रेट) :
कार्बोहायड्रेटचे सेवन केल्याने आपल्या शरीराला उर्जा प्राप्त होत असते.
कार्बोहायड्रेटचे स्त्रोत :
स्टार्च
- शुगर (साखरयुक्त पदार्थ)
- सेल्युलोज
कार्बोहायड्रेटचे कमी सेवन केल्याने होणारे नुकसान –
- कार्बोहायड्रेटचे कमी सेवन केल्याने आपल्या शरीराला पाहिजे तेवढी उर्जा प्राप्त होत नसते.
- शरीरात अशक्तपणा दुर्बलता निर्माण होते.
कार्बोहायड्रेटचे अधिक सेवन केल्याने होणारे नुकसान –
- कार्बोहायड्रेटचे अधिक सेवण केल्याने आपल्याला पोटदुखीचा त्रास होत असतो
- तसेच अपचनाची समस्या देखील निर्माण होत असते.
- लठठपणा उच्च रक्तदाब,डायबिटीस सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
5) पाणी :
पाणी पिण्याचे देखील अनेक फायदे असतात जसे की जर आपण पाणी जास्त पिले तर आपल्याला भुक कमी लागते ज्याचा फायदा ज्यांचे वजन अधिक आहे त्यांना वजन कमी करण्यासाठी होत असतो.
सकाळी उपाशी पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकले जात असतात.
पुरेसे पाणी न पिल्याने आपल्याला डिहायड्रेशनची समस्या उदभवू शकते.
पण अती प्रमाणात पाणी पिणे देखील आपल्या शरीरासाठी घातक ठरत असते जसे की खुप जणांना जास्त पाणी पिल्याने वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होत असतो म्हणुन आपण योग्य त्या प्रमाणात पाण्याचे सेवण करायला हवे.
6) चरबी :
शरीराची चरबी वाढवल्याने आपले वजन वाढण्यास मदत होत असते.शरीराची चरबी वाढवण्यासाठी आपण चरबीयुक्त पदार्थाचे सेवन करत असतो.
पण अती चरबी युक्त पदार्थाचे सेवन केल्याने आपले वजन अधिक प्रमाणात वाढत असते ज्याने आपल्याला स्वास्थ्या संबंधी विविध समस्या उदभवत असतात.म्हणुन ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी चरबीयुक्त पदार्थांचे सेवण करणे टाळायला हवे
2 thoughts on “Nutrition म्हणजे काय ? प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व – Nutrition Complete Information In Marathi”
Comments are closed.