महाराष्ट्र भुषण पुरस्कार विजेते अप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत?
अप्पासाहेब धर्माधिकारी हे एक ज्येष्ठ निरूपणकार समाज प्रबोधक तसेच समाजसेवक म्हणून ओळखले जातात.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या विविध उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे.
२०२३ मध्ये १६ एप्रिल रोजी त्यांना समाजसेवा क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
आजच्या लेखात आपण ह्याच अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
सत्यपाल मलिक कोण आहेत? सध्या ते एवढ्या चर्चेत का आहे?
अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे संपुर्ण तसेच मुख्य नाव दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी असे आहे.त्यांचा जन्म १४ मे १९५१ मध्ये रायगड जिल्ह्यात रेवदंडा ह्या ठिकाणी झाला होता.
अप्पासाहेब यांचे बालपण प्राथमिक माध्यमिक शिक्षण ह्या सर्व गोष्टी रेवदंडा इथेच पुर्ण झाल्या.
अप्पासाहेब धर्माधिकारी हे रायगड जिल्ह्यात समाजसेवेची विविध कार्य करत असल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे सांगण्यात आले आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज गौरव, कधी, कुठे जाणून घ्या
व्यसन तसेच अंध्रश्रदधेत अडकलेल्या गरीब जनतेला ह्या अंध्रश्रदधेतुन व्यसनाधीन लोकांना व्यसनातुन बाहेर काढण्यासाठी आप्पासाहेब यांच्या वडिलांनी हे समाजसेवेचे कार्य सुरू केले होते.
असे सांगितले जाते की नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पाऊलावर पाऊल टाकत अप्पासाहेब यांनी आतापर्यंत वृक्षारोपण रक्तदान शिबीर आयोजित करणे,स्वच्छता मोहीम राबवणे व्यसन मुक्ती केंद्र उघडणे अंधश्रद्धा निर्मूलन करणे वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे अशी विविध सामाजिक कार्ये पार पाडली आहेत.
याचसोबत बेरोजगार व्यक्तींना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी रोजगार मेळावे भरवण्याची कामे देखील त्यांनी केली आहेत.
टायटॅनिक जहाज का बुडाले याचे संशोधनातुन समोर आलेली काही महत्वाची रहस्ये
अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे संपुर्ण महाराष्ट्रात अनुयायी असल्याचे सांगितले जाते.समर्थ रामदास स्वामी लिखित समर्थ दासबोध ग्रंथ ह्याच्या माध्यमातून लोकांचे निरूपण करण्याचे काम अज्ञानी लोकांना अध्यात्मिक ज्ञान प्रदान करण्याचे काम अप्पासाहेब धर्माधिकारी हे करतात.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वडिलांचे नाव नानासाहेब धर्माधिकारी असे आहे.
नानासाहेब धर्माधिकारी यांना देखील २००८ मध्ये मृत्यूनंतर महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
आता वडिलांनंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
१९४३ मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब यांनी श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती खेदंडा अलिबाग मार्फत आपल्या ह्या समाजसेवेच्या निरूपणाच्या कार्यास सुरुवात केली होती.
आतापर्यंत धर्माधिकारी कुटुंबातील व्यक्तींकडुन बालसंस्कार बैठक देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत ह्या बैठकी बालमनावर संस्कार करण्यासाठी घेण्यात आल्या आहेत.
याचसोबत आदिवासी वस्ती मधील लोकांना व्यसन मुक्त करण्यासाठी व्यसन मुक्तीची मोहीम देखील राबविण्यात आली आहे.
असे सांगितले जाते की आपल्या पित्याकडून कुटुंबाकडुन प्राप्त झालेला अध्यात्मिक अणि सामाजिक बांधिलकीचा वसा जपण्याचे काम अप्पासाहेब धर्माधिकारी करीत आहेत.
ज्येष्ठ निरूपणकार पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे १५ अनमोल विचार
असे सांगितले जाते की अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी आहेत आतापर्यंत त्यांनी कित्येक समाजकार्य परोपकार देखील केली आहेत पण एवढे करूनही अप्पासाहेब यांनी प्रसिद्धी नाव प्राप्त करण्यासाठी कुठलाही गाजावाजा केला नसल्याचे सांगितले जाते.
अणि आज त्यांच्या ह्याच निस्वार्थ सेवेचे फळ म्हणून त्यांना हा महाराष्ट्र शासनाकडुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची यादी २०२३ । List of Chief Ministers of Rajasthan In Marathi
ह्या पुरस्कार वितरण सोहळयासाठी खारगर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.असे सांगितले जाते आहे की अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जात असलेल्या ह्या पुरस्कार सोहळ्यात २० लाखापेक्षा अधिक अनुयायी उपस्थित असणार आहे.
त्यादृष्टीने तयारी देखील शासनाकडुन करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
अनुयायी वर्गासाठी सर्व मुलभुत सोयी सुविधा जसे की पिण्याचे पाणी शौचालयास जाणे इत्यादींची व्यवस्था केली जाणार आहे.रेल्वे स्टेशन पासून पुरस्कार स्थळी अनुयायांना आणण्यासाठी अतिरीक्त बसेसची सोय देखील करण्यात आली आहे.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार –
२०१४ मध्ये डाॅक्टरेट पदवी.
२०१७ मध्ये पदमश्री पुरस्कार
आता महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन देखील त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.