आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज गौरव, कधी, कुठे जाणून घ्या । Appasaheb Dharmadhikari is honored today

Appasaheb Dharmadhikari is honored today

अप्पासाहेब धर्माधिकारी हे एक ज्येष्ठ निरूपणकार समाज प्रबोधक तसेच समाजसेवक म्हणून ओळखले जातात.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या विविध उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे.

राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 

Appasaheb Dharmadhikari is honored today
Appasaheb Dharmadhikari is honored today

महाराष्ट्र भुषण पुरस्कार विजेते अप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत

कोठे होणार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव?

हा गौरव संमारभ खारघर येथे होणार आहे

या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळ सदस्यांसह राज्यभरा आमदार, खासदार आणि काही उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या व्हीआयपींना कार्यक्रमस्थळी पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी खारघर येथे ८ हेलिपैड उभारण्यात आले आहेत.

हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

सकाळी साडे १० च्या सुमारास या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.