फेमिना मिस इंडिया 2023 मधील विजेत्यांची यादी – Femina Miss India 2023 winner list in Marathi

फेमिना मिस इंडिया 2023 मधील विजेत्यांची यादी femina miss india 2023 winner list in Marathi

काल १५ एप्रिल २०२३ रोजी ५९ व्या फेमिनी मिस इंडिया स्पर्धेत विजेता ठरलेल्या स्पर्धकांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

आजच्या लेखात आपण फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये विजेता ठरलेल्या सर्व महिलांची नावे जाणुन घेणार आहोत.

नंदिनी गुप्ता कोण आहे?

 Femina Miss India 2023 winner list in Marathi

नंदिनी गुप्ता ही एक १९ वर्षीय मुलगी आहे जी राजस्थान येथे कोटा येथे राहणारी आहे नंदीने हिने नुकतेच मिस इंडिया २०२३ बनण्याचा मान पटकावला आहे.

प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असे सांगितले जाते आहे की सदर स्पर्धेत राजस्थान येथील १९ वर्षीय नंदिनी हिने काळया रंगाचा गाऊन परिधान करून स्टेजवर रॅम्प वॉक केला होता.

मागील वर्षी २०२२ मध्ये मिस इंडिया ठरलेल्या सिननी शेटटी हिने नंदिनीला क्राऊन म्हणजे मुकुट घालत तिचा ह्या विजयासाठी सत्कार केला.

फेमिना मिस इंडिया स्पर्धेत विजेता ठरलेल्या नंदिनीला आता मिस वर्ल्ड ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

असे सांगितले जाते आहे की नंदिनीला लहानपणापासूनच फेमिना मिस इंडिया बनायचे होते.बालपणापासूनच तिला माॅडलिंग करण्याची अत्यंत आवड होती.

अणि आता फेमिना मिस इंडिया बनल्याने तिचे हे बालपणापासूनचे बघितलेले स्वप्र पुर्ण देखील झाले आहे.

नंदिनी हिने अवघ्या १९ वर्ष इतक्या कमी वयात हा मान पटकावून मिस इंडिया बनण्याचे स्वप्न बघणारया लाखो मुलींची प्रेरणा बनली आहे.

आपल्या ह्या विजयानंतर नंदिनीला आता संयुक्त अरब अमीराती पार पडणार असलेल्या ७१ व्या मिस वर्ल्ड ह्या सौंदर्य स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

See also  भारतीय निवडणूक आयोगाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बनवले नॅशनल आयकाॅन _ Sachin Tendulkar appointed as the National Icon of Election Commission of India.

नंदिनीचे शिक्षण –

नंदीनी हिने तिचे शिक्षण राजस्थान येथेच केले आहे.नंदिनी गुप्ता हिने राजस्थान येथील एका महाविद्यालयात बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स देखील केला आहे.

नंदीनी हिने तिच्या घेतलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की तिच्या नजरेत रतन टाटा सर्वात प्रभावशाली आहेत.

रतन टाटा हे मानवता ह्या धर्माचे पालन करतात.रतन टाटा जे काही धन उद्योग व्यवसायातुन प्राप्त करतात त्यातील काही धन गरजुंना दान देखील करतात असे नंदिनी हिने मुलाखती दरम्यान सांगितले आहे.

मिस इंडिया बनण्यासाठी नंदिनी हिने प्रियंका चोप्रा यांना देखील आपली प्रेरणा मानले असल्याचे तिने सांगितले आहे.

नंदिनीचे सोशल मिडिया स्टेटस –

नंदीनी सोशल मिडिया वर देखील खुप अॅक्टिव्ह तिचे इंस्टाग्रामवर १० के पेक्षा जास्त फाॅलोवर्स आहेत आता हा मान मिळाल्याने तिच्या फॅन्स अणि फाॅलोवर्स मध्ये अधिक वाढ होताना दिसुन येणार आहे.

नंदीनी तिच्या सोशल मिडिया अकाऊंट वरून वेगवेगळ्या प्रकारच्या लूकमध्ये काढलेले तिचे फॅशनेबल फोटो नेहमी अपलोड करत असते.

फेमिना मिस इंडिया स्पर्धेतील इतर विजेता –

फेमिनी मिस इंडिया ह्या स्पर्धेत उपविजेता बनण्याचा मान दिल्लीच्या श्रेया पुंजा हि