ज्येष्ठ निरूपणकार पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे १५ अनमोल विचार – Appsaheb Dharmadhikari yanche Anmol Vichar

ज्येष्ठ निरूपणकार पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे १५ अनमोल विचार –

  1. मी कुठलाही महाराज वगैरे नाहीये.माझ्याकडे दर्शन वगैरे असा कुठलाही प्रकार चालत नाही मी तुमच्या सारखाच सर्वसामान्य मनुष्य आहे.मी फक्त लोकांना चांगले विचार देण्याचे काम करतो.त्यांच्यापर्यंत चांगले विचार पोहोचवण्याचे काम करतो.चांगल्या विचारांमध्ये उभे करून उत्तम विचारांनी तुम्हाला मनुष्य म्हणून तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम फक्त मी करतो.
  2. मनुष्याचे मुख्य कर्तव्य काय आहे हे सांगण्याचे काम मी करतो.मी कधीही माझ्या कार्याची कामाची जाहीरात वगैरे करत नाही अणि करणारही नाही कारण मला त्याची कुठलीही आवश्यकता देखील भासत नाही.
  3. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करणार आहे अखेरच्या क्षणापर्यंत समाजकार्य करीत राहणार.
  4. आपण सर्वांनी संताची वचने वाचायला हवीत जात अणि धर्म यात केला जाणारा भेदभाव समाजात कमी व्हायला हवा.
  5. मनुष्य ही आपली जात आहे अणि मानवता हा आपला परमधर्म आहे.
  6. आपण चांगल्या विचारांमधुन लोकांचे भले केले तर आपलेही चांगलेच होणार आहे.आपले मन उत्तम असेल तर आपल्या देशाची जडणघडण देखील उत्तम प्रकारेच होणार आहे.
  7. आपण कशापदधतीने फसले जात असतो हे आपण प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे.मनाला एका जागी स्थिर करण्यासाठी आपल्या मनात चांगले विचार असणे खुप गरजेचे आहे.
  8. आपण सर्व अडचणींवर मात करायला शिकायला हवे कारण हेच आपल्या देशाच्या हितासाठी उत्तम ठरणार आहे.
  9. मानवता हाच आपला धर्म आहे याचा आपणास विसर पडायला नको.
  10. मनाला एका जागी स्थिर करण्यासाठी चांगल्या विचारांची अंतकरणामध्ये धारणा देणे खुप गरजेचे आहे.एकदा मनात चांगल्या विचारांची धारणा घेतली मन स्थिर व्हायला वेळ लागत नाही अणि मन स्थिर झाल्यावर आपल्या अंतःकरणात एक समृद्धी तयार होते ही समृदधी आपणास चांगला समाज घडवायला राष्ट घडवायला मदत करत असते.
  11. मनाला निश्चयाची संकल्पाची भुमिका प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रत्येकाने संतवाडमयाचा संतवचनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
  12. संतवाडयम संतवचने ही धार्मिक ग्रंथ नसतात तर ही सर्व समाजासाठी तयार करण्यात आलेली ग्रंथ आहेत.यांचा अभ्यास आपण प्रत्येकाने करायला हवा.
  13. अज्ञानातुन बाहेर पडण्यासाठी आपण प्रत्येकाने पुर्ण अंतकरणाने संतवाडमयाचा संतवचनांचा अभ्यास करायला हवा.
  14. आपले चांगले विचार आपणास सदगतीकडे नेत असतात इतर कोणीही आपणास सदगतीकडे आपणास नेऊ शकत नाही.
  15. आपापसात केले जाणारे हेवेदावे बंद व्हायला हवेत जातीय तसेच धर्माचे भेद भाव असे सर्व प्रकारचे भेदभाव समाजातुन नाहीसे होणे गरजेचे आहे.
  16. सुरूपी राहणे हाच मानसाचा खरा सदधर्म आहे.
See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती स्टेटस- बायो इन्फोग्राफिक्स डाऊनलोड | Dr. Babasaheb Ambedkar Bio infographics Download