महाराष्ट्र भुषण पुरस्कार म्हणजे काय? -Maharashtra Bhushan award
रविवारी १६ एप्रिल २०२३ रोजी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकार कडुन महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
आजच्या लेखात आपण हा महाराष्ट्र भुषण पुरस्कार म्हणजे नेमके काय असते याचे स्वरूप कसे असते हा पुरस्कार कोणाला अणि कुठल्या कार्यासाठी दिला जातो हे जाणुन घेणार आहोत.
महाराष्ट्र भुषण पुरस्कार म्हणजे काय?
महाराष्ट्र भुषण हा महाराष्ट्र शासना कडून दिला जात असलेला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
हा पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींना दिला जात असतो.
१९९६ मध्ये प्रथमतः हा पुरस्कार देण्यात आला होता यानंतर आतापर्यंत अठरा जणांना शासनाकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती -Maharashtra bhushan award list
- पु.ल देशपांडे यांना साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी १९९६ मध्ये हा पुरस्कार सर्वप्रथम देण्यात आला होता.
- लता मंगेशकर यांना कला अणि संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी १९९७ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता.
- विजय भाटकर यांना आपल्या विज्ञान क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी १९९९ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- सुनिल गावसकर यांना २००० मध्ये क्रिडा क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.
- सचिन तेंडुलकर यांना आपल्या क्रिडा क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००१ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- भीमसेन जोशी यांना आपल्या कला अणि संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००२ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- अभय बंग राणी बंग -यांना आपल्या समाजसेवा क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००३ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- रघुनाथ माशेलकर -यांना आपल्या विज्ञान क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००५ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- बाबा आमटे-यांना आपल्या समाजसेवा क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००४ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- रतन टाटा यांना आपल्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००६ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- रामराव कृष्णराव पाटील-यांना आपल्या समाजसेवा क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००७ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- नानासाहेब धर्माधिकारी -यांना आपल्या समाजसेवा क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००८ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- मंगेश पाडगावकर-यांना आपल्या साहित्य क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००८ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- जयंत नारळीकर-यांना आपल्या विज्ञान क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २०१० मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- सुलोचना लाटकर -यांना आपल्या कला सिनेमा क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २००९ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- बाबासाहेब पुरंदरे-यांना आपल्या साहितय क्षेत्रातील इतिहास लेखन ह्या उत्तम कामगिरीसाठी २०१५ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- अनिल काकोडकर -यांना आपल्या विज्ञान क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २०११ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- राम सुतार यांना २०१९ मध्ये शिल्पकला क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.
- आशा भोसले -यांना आपल्या कला संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २०२१ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता
- अप्पासाहेब धर्माधिकारी -यांना आपल्या समाजसेवा क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी २०२२-२०२३ मध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे स्वरूप कसे असते?
महाराष्ट्र भुषण पुरस्कारात २० लाख रुपये इतकी रोख रक्कम दिली जाते अणि स्मृती चिन्ह अणि प्रशस्तीपत्रक सुदधा दिले जाते.
ह्या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीद्वारे केली जाते.
सुरुवातीला प्रत्येक वर्षी साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रांत हा पुरस्कार दिला जात होता.नंतर सामाजिक कार्य,पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला.